फायदे पाहून पायाखालील जमीन सरकून जाईल, एक पान १३ रोग बरे करते…

आज जी वनस्पती पाहणार आहे ती खास आहे. ज्या वनस्पतीचा वापर बहरीन मध्ये, बहरीन सारख्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. तर ती वनस्पती कोणती आहे? तर ती वनस्पती आहे बोरीची पानं. बोरीचे अनेक प्रकार असतात, एक सुधारित बोर असते तर एक गावठी बोर असते. गावठी बोर ची पाने खास असतात.

या बोरीचे शास्त्रीय नाव आहे झिझिपस जुजबी. इंग्रजी नाव आहे रेड डेट आणि स्थानिक नाव बोर म्हणतात. आयुर्वेदामध्ये बोराचे मुळ, फुल, फळ औषध बनवण्यासाठी वापरलं जातं. विंचु जर चावला तर बोरीचा पाला घ्यायचा, उंबराचा पाला घ्यायचा आणि एकत्र करायचे आणि त्याची गोळी बनवायची. ज्या ठिकाणी विंचु चावला त्या ठिकाणी लावायची. लावल्यानंतर विंचु चावल्याचा त्रास आहे तो नक्कीच कमी होऊन जाईल.

बोरीच्या पानाचा काढा बनवायचा आणि त्याने जर गुळण्या केल्या, तुम्हाला जर तोंड आलं असेल तर बोरीचे तीन चार पाने घ्यायची आणि एक ग्लास पाणी घ्यायचं, त्यात थोडंस मीठ टाकायचं. ते थोडं कोमट करून घ्यायचं आणि त्याने गुळण्या करायच्या. याने गुळण्या केल्यामुळे तोंड कमी येईल. वातावरण बदलल्यामुळे सर्दी, खोकला होत असतो.

मग आपण खोकल्यासाठी कोणते ना कोणते औषध घेत असतो. बोरीचे पान तुपात परतून, भाजून घ्यायचं. त्यावर थोडं सैंधव मीठ टाकायचं आणि ते चघळायच. चघळल्यामुळे खोकला कमी होतो. पिंपल्सचा त्रास बऱ्याच जणांना असतो. तर बोरीच्या फळाची पावडर मिळते, ती गुळासोबत खायची. त्याच्यामुळे पिंपल्स कमी व्हायला मदत होते.

जर तुमची एखादी जखम भरत नसेल समजा, दवाखण्यात दाखवली तरी जखम भरत नसेल तर बोरीच्या मुळाचे चूर्ण घ्यायचे आणि ते चूर्ण जर लावले तर ती जखम सुद्धा कमी होऊ शकते. बोरीच्या मध्ये जी गुठली असते, त्याच्यामध्ये गर असतो त्या गराचे सेवन केले तर पित्ताचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो. बोरीचे मुळ वाटून त्याची पेस्ट डोक्याला लावली तर आपली डोकेदुखी कमी होते. ओली मुळ काढून वाटायची ती पेस्ट लावायची. तुमची डोकेदुखी तात्काळ बंद होते.

लघवीच्या अनेक समस्या असतात. जसं की लघवी करताना त्रास होणे, लघवी थांबून थांबून येणे तर यासाठी बोरीची पाने खुपच फायदेशीर आहे. बोरीचे पान वाटून बेंबीच्या चोही बाजूने लेप लावायचा. यामुळे तुमचा लघवीचा त्रास आहे तो कमी होऊ शकतो. केसगळती थांबण्यासाठी याच्या पानाचा वापर करू शकतो. बोरीचे पाने टाकून पाणी उकळायचे आणि पाणी कोमट झाल्यानंतर केस धुवून घ्यायचे. याने आपली केसगळती थांबते.

जर केस तोड झाला असेल केसतोड झाला की आपण काय करतो, गोळ्या खातोच. कारण त्याचा त्रासच तेवढा असतो. तर यासाठी बोरीचे पान घ्यायचं आणि या पानावर थोडंस तेल टाकायचं, गरम करायचे. गरम केल्यानंतर त्याला थंड करायचे. थंड झाल्यानंतर रात्री झोपताना हे पान लावायचं आणि त्यावर काहीतरी बांधायचे. सकाळी उठल्यानंतर तुमचे किस्तुड गायब होईल.

तुमचा घसा बसला असेल तर काय करायचे? सैंधव मीठ घ्यायचं, बोरीचे पान घ्यायचं आणि ते भाजून घ्यायचं आणि चघळायच. याने घसा मोकळा होतो. जर तुम्हाला रांजणयेडी झाली असेल तर बोरीच्या देठाचा रस तो हळुवार पणे काढायचा, बोटावर घ्यायचा आणि ज्या ठिकाणी रांजणयेडी त्यावर हळुवारपणे लावायचे, डोळ्याला लावायचे नाही. अशा पद्धतीने केले तर तुमची रांजणयेडी कमी होऊ शकते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *