फक्त 7 दिवसात रक्त एवढे वाढेल की HB, आयर्न कमी, अनेमिया या समस्या मुळापासून निघून जातील…

नमस्कार मित्रांनो रक्त कमी असणे ही जगभरातील जाणवणारी समस्या आहे. आता झालेल्या सर्वेक्षणानुसार जगातील पाच अब्ज लोकांना ही रक्त कमीची समस्या निर्माण झालेली आहे. या मध्ये पंच्याहत्तर (७५%) टक्के महिलांचा समावेश आहे. महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे यालाच रक्त कमीची समस्या किंवा अनेमिया म्हटले जाते. मराठीमध्ये याला पांडुरोग असे म्हटले जाते.

आपण शरीराची तुलना एका गाडीशी जर केली गाडीला ज्या पद्धतीने इंधनाची गरज असते चालण्यासाठी त्याचपद्धतीने रक्तामुळे आपल्या शरीरातील सर्व ऑर्गन्सचे कार्य उत्तमरीत्या चालले जाते. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोषकतत्वे त्याचपद्धतीने ऑक्सिजन पोहचवण्याचे काम हे रक्त करत असते. आपण जे खातो त्याचे रक्त बनत असते. बऱ्याच जणांना समस्या असते खाल्लेलं अन्न पचत नाही. ज्या पोषनमुल्यांचं शरीरात शोषण व्हायला पाहिजे ते होत नाही त्यामुळे त्यांचे खाल्लेलं रक्त बनत नाही आणि त्यामुळे त्यांना ही अनेमियाची समस्या निर्माण होते. त्यांचा हिमोग्लोबिन हा कमी असतो.

हा आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात जाणवतो. कारण दर महिन्याला त्यांच्या होणाऱ्या पिरियडसमध्ये रक्तस्राव असतो त्यामुळे रक्त कमीची समस्या जाणवत असते. बाहेरून जरी माणूस नॉर्मल दिसत असला तरी त्याच्यात रक्त कमी असू शकते. तर याची कोणती लक्षणे आहेत की तुम्हाला समजेल की रक्त कमी आहे. तुम्हाला अशक्तपणा जाणवत आहे, उत्साह वाटत नसेल एखाद्या कामामध्ये, थकवा सतत येत असेल, डोक्यामध्ये गरगर फिरल्यासारखे होत असेल, चक्कर येत असेल, तुमच्या शरीराचा जो रंग आहे तो मंद आणि फिकट दिसतो, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडलेल्या दिसतात, श्वास घेण्यास त्रास होतो.

शरीरामध्ये रक्त कमी असल्यामुळे हे रक्त आपले जे हृदय आहे पूर्ण शरीरपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न करते. त्यामुळे त्याला जास्त काम करावं लागतं. म्हणून जर तुमच्या शरीरामध्ये रक्त जर कमी असेल तर तुमच्या छातीमध्ये जास्त धडधड वाढते. त्याचपद्धतीने तुमच्या शरीरावर जास्त जखमा झालेल्या असतील तर त्या जखमा लवकर भरून येत नसतील तर तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी आहे हे आपल्या लक्षात येते.

तर साधा सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. ज्या उपायाने सात दिवसात तुमच्या शरीरामधील रक्त जे आहे चांगल्या प्रमाणे वाढवू शकता. तुमच्या या थकवा येण्याच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जाऊ शकतील. सर्वात महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे नाष्टा बरोबर तुम्ही करू शकता बिट रस. बिट सर्वत्र उपलब्ध असतं. या बीटमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम असते, लोह आणि गंधक सुद्धा यामध्ये असते. सकाळी नाष्टा झाल्यानंतर एक बीटाचा ज्युस बनवायचा आहे, त्या जूसमध्ये लिंबू पिळायचा आहे. लिंबू हे पिळण फार महत्त्वाचे असते.

लिंबू पिळल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे शोषण होणार आहे ते चांगल्या पद्धतीने होते. सलग सात दिवस जरी केलं तरी तुमच्या शरीरातील रक्त कमीची समस्या थांबून जाते. सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे काळे तीळ. काळे तीळ किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते. हे काळे तीळ तुम्हाला दोन चम्मच काळे तीळ आणि एक कप गरम पाणी करून घ्यायच आहे. एक कप गरम पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ एक वाटी गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर एक तास ठेवल्यानंतर ते फुगून येतील.

फुगून आल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायच आहे. हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते एक कप दुधामध्ये टाकायचे आहे. तुम्हाला जर डायबेटीस नसेल तर थोडासा गूळ टाकायचा आहे. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. तर हे तुम्हाला संध्याकाळी झोपताना घ्यायच आहे. डायबेटीस असेल तर हे असेच घेतले तर चालेल. सलग सात ते आठ दिवस हा उपाय केला तर तुमच्या शरीरामधील रक्त कमीची जी समस्या आहे ती त्वरित भरून येते.

रक्त तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने वाढते. दुसरा आणि साधा उपाय करण्यासारखा की सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला जेवणानंतर दोन चम्मच मध खायचा आहे. या मधामध्ये लोह आणि तांबे मोठ्या प्रमाणात असते. रक्त बनण्यासाठी लोहाची गरज असते. मध अशा पध्दतीने खाल्ला तर रक्त कमीची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते रक्त वाढ होते. या उपायांपैकी तुम्ही उपाय केले तर तुमची रक्त कमीची समस्या निघून जाईल. धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *