फक्त 1 फळ या पद्धतीने वापरा, आयुष्यात पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही, जुलाब, खोकला बंद…

आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्ती निरोगी केव्हा समजली जाते? ज्यावेळी आपल्या शरीरातील त्रिदोषाचे संतुलन होते त्यावेळेस ती व्यक्ती कायम निरोगी राहते. त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. जर या त्रिदोषांपैकी कोणताही एक दोष जास्त प्रमाणात वाढला तर त्या व्यक्तींना असंख्य प्रकारच्या व्याधी पाहायला मिळतात.

या त्रिदोषांमध्ये वात, कफ, पित्त हे तीन दोष येतात. यातील आपल्या शरीरातील पित्त वाढल्यामुळे असंख्य प्रकारच्या वेदना शरीरास जाणवतात. आपल्या शरीरामध्ये पित्त दोष का वाढतो? याचं कारण म्हणजे आपली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, पूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे ऍसिडिटी आणि अपचन होते. यामुळेच पित्त, अपचन, ऍसिडिटी अशा समस्या पाहायला मिळतात.

यावरती असंख्य व्यक्ती औषध, गोळ्या घेतात तरी फरक जाणवत नाही. वारंवार त्या व्यक्तींच्या छातीमध्ये जळजळ होते, ऍसिडिटी होते अशा सर्व व्यक्तींचे ऍसिडिटी, पित्त कमी करण्यासाठी आजचा उपाय अत्यंत रामबाण ठरतो. प्रत्येक पित्त प्रकृत्ती असणाऱ्या व्यक्तीला हे माहीत पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्या आहारामध्ये फायबर युक्त पदार्थ जास्त प्रमाणात घेतले पाहिजेत.

त्या व्यक्तीने चहाचे प्रमाण अत्यल्प घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे तूरडाळ आहारामध्ये जास्त प्रमाणात असेल किंवा उष्णता वाढवणारे जे पदार्थ आहेत ते जर त्या व्यक्तींनी कमी घेतले तर त्या व्यक्तींच्या शरीरातील वाढलेले पित्त कमी होण्यासाठी अत्यंत फायदा होतो. फायबर युक्त पदार्थांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की केळी तसेच नारळ पाणी बऱ्याच व्यक्तींना ज्यावेळेस पित्त होते त्या व्यक्तींनी नारळपाणी घ्या.

नारळपाणी घेतल्यानंतर पित्ताचं क्षमन होते. छातीमध्ये होणारी जळजळ कमी होते, पचनही चांगल्या प्रकारे होते. अशा फायबरयुक्त पदार्थांमध्ये काकडी, कलिंगडाचा वापर करू शकता. आजच्या उपायासाठी जे फळ पाहणार आहे ते फळ बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. या फळाचे नाव आहे डाळिंब. डाळिंब आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी सोबतच आपल्याला असंख्य आजारापासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरते.

या डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, फायबर, व्हिटॅमिन K, B, लोह, पोटॅशियम, जस्त, फॅटी ऍसिडस् सारखे असंख्य प्रमाणात शरीराला फायदेशीर ठरणारे गुण असतात. म्हणून आजच्या उपायासाठी डाळिंब लागणार आहे. हे डाळिंब घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून सोलून घ्यायचे आहे. यानंतर हे दाणे मिक्सरच्या मदतीने एकदम बारीक करून घ्यायचे आहे. असे हे बारीक केलेला ज्युस गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचा आहे.

यातील रस आपल्याला घ्यायचा आहे, चोथा घ्यायचा नाही. असा हा रद्द आपल्याला साधारण चार चमचे घ्यायचा आहे. डाळिंबाची साल फेकू न देता वाळवून ठेवा. याचा फायदा कधीही होऊ शकतो. अचानक घरातील कोणत्याही व्यक्तीस जुलाब किंवा संडास लागली असेल तर ही साल मधामध्ये दिल्यास त्या व्यक्तींना लगेच आराम मिळतो. सोबतच खोकला असेल तर ही साल तोंडात ठेवून रस गिळल्याने खुप फायदा होतो.

म्हणून ही साल फेकून न देता ती नेहमी घरामध्ये ठेवा. यानंतर आपल्या उपायासाठी दुसरा घटक लागणार आहे साखर. साखर साधारण एक चमचा साखर चार चमचे रसामध्ये टाका. हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करा. हे मिश्रण सकाळी उठल्यावर घ्यायचे आहे किंवा दिवसातून कधीही घेऊ शकता. याचा अत्यंत चांगला फायदा होतो. हा उपाय सलग सात दिवस करा. कसल्याही प्रकारचे पित्त कमी होईल. परंतु जे पथ्य आहे ते पाळा. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *