फक्त ५ मिनिटे जाळा या तीन वस्तू आणि पहा चमत्कार , या उपायाने डास दूर पळून जातील

आता हिवाळा संपून उन्हाळा सुरु होतोय. उन्हाळा सुरु झाल्यावर लगेच डास यायला सुरुवात होते. संध्याकाळच्या वेळी घरात जास्त डास येतात. डासांमुळे अनेक आजार होऊ शकतात. डासांना जगातील सर्वात घातक जीव मानतात. कारण जगात डासांच्या जवळजवळ तीन हजारांहून अधिक जाती सापडतात. यातील सगळ्याच डासांच्या जाती चावणार्या नसतात.

परंतु जर तुमच्या घरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया पसरवणारे डास घुसले आणि तुम्हला किंवा तुमच्या मुलांना चावले तर ते घातक ठरू शकते. त्यामुळे डासांना घरातून पळवून लावणे फारच आवश्यक आहे. डासांना पळवून लावण्यासाठी विविध उपाय केले जातात. काही उपाय घरगुती असतात. काही उपाय नैसर्गिक घटक वापरून केले जातात तर कधी कधी डासांना पळवण्यासाठी केमिकलहि वापरली जातात.

यासाठी जर बाजारात मिळणाऱ्या डासांच्या उदबत्त्यांचा वापर केला तर त्यातून येणारा धूर हा नुकसानकारक असतो. त्यामुळे आम्ही आता तुम्हाला डासांना पळवून लावायचा एक नैसर्गिक, घरगुती उपाय सांगणार आहोत. यात वापरलेल्या सगळ्या वस्तू आपल्या घरात सहज आणि नेहमीच उपलब्ध असतात. याचा १००टक्के परिणाम दिसतो.

या गोष्टी एकत्र जाळल्याने यातुन एक प्रकारचा विचित्र धूर आणि वास येतो, जो डासांना सहन होत नाही. विश्वास बसत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघाच. यासाठी तुमच्या घराजवळच्या कुंभाराकडून एक थोडा मोठासा मातीचा दिवा , छोटेसे मातीचे भांडे आणा. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा ओवा घ्या. ओव्याचे अनेक फायदे आहेत. ओवा पोटाचे अनेक विकार दूर करतो, पचनशक्ती सुधारतो. मातीच्या भांड्यात अर्धा चमचा ओवा घ्या.

याच बरोबर तीन लसूण पाकळ्याही घ्या. या पाकळ्या सालासकट थोड्याश्या जाडसर कुटुन घ्या. या लसणीच्या पाकळ्या मातीच्या भांड्यातील ओव्यात घाला. यात एक चमचा साजूक तूप घाला. घरात साजूक तूप नसल्यास तुम्ही कडूनिम्बाचे तेल किंवा मोहरीचे तेलही घेऊ शकता. आता यात दोन कापराच्या गोळ्या बारीक चुरडून घाला. हे सगळे घटक व्यवस्थित एकत्र करून घ्या.

नंतर यावर अजून दोन कापराच्या गोळ्या ठेऊन पेटवा. जेव्हा हे जळू लागेल तेव्हा याचा धूर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल याची काळजी घ्या. हा उपाय फारच प्रभावीपणे काम करतो. जिथे जिथे हा धूर पोहोचेल, तुम्ही पहाल कि घरातून डास पळून जातील. ज्या ठिकाणी या वस्तू जाळणार असाल तिथे कपडे,पडदे किंवा इतर ज्वलनशील वस्तू नसतील याची काळजी घ्या. हा उपाय केल्यास कोणतीही हानी होत नाही आणि याच्या वासाने घरातील डास पळून जातात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *