फक्त २ पाने खा, असा कोणताच आजार नाही जो याच्यापुढे टिकाव धरेल, कुठेही ही वनस्पती दिसली तर सोडू नका…

नमस्कार मित्रांनो, प्रकृतीचा खजाना हा अनमोल व अमर्यादित आहे. प्रकृती म्हणजेच निसर्ग आपल्यामध्ये अशा कितीतरी वनस्पतींना जन्म देते, वनस्पति उगवतात, ज्या मनुष्याला रोगमुक्त करतात व या सगळ्या वनस्पति आपल्या आसपास असतात पण आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसते. आपण सगळेच या वनस्पतींना निरोपयोगी समजतो.

पण आम्ही आमच्या या पेजच्या माध्यमातून या सगळ्या वनस्पतींबद्दल माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतो. तर ह्या माहितीच्या क्रमाला अनुसरून आज आम्ही तुम्हाला हिंदीत पत्थरचट्टा म्हणजेच पानफूटी याबद्दल माहिती देणार आहोत. पानफूटीचे रोप पूर्ण भारतात आढळते. पत्थरचट्टाची म्हणजेच पानफुटीची झाडे लोक आपल्या घराच्या जवळपास कुंडीत लावतात.

पानफुटी सरळ, उंच १२ महीने उगवणारे रोप आहे. या झाडाची ऊंची ३ ते ४ फुट असते. ह्याची पाने विविध प्रकारच्या औषधांसाठी ओळखली जातात. ह्या झाडाचे खोड आतून पोकळ असते ज्याचा रंग पुर्णपणे हिरवा असतो किंवा लाल असतो. पानफुटीची फुले साधारणपणे थंडी व वसंत ऋतुत येतात. ह्या झाडाची खास गोष्ट ही आहे की ओल्या मातीत जर या झाडाची पाने लावली तर नवीन झाड उगवते.

पानफुटीचे खूप जास्त आयुर्वेदिक फायदे आहेत. तुम्ही या वनस्पतीच्या सहाय्याने डोकेदुखी बरी करू शकता. तुम्हाला जर मूतखडयाची समस्या असेल, तर खडे शरीरातून बाहेर काढण्याचे काम पानफुटी करते. जर हातापायावर सूज असेल, तर सूज नाहीशी करू शकता. जखम झाली असेल व ती लवकर भरून येत नसेल, तर याच्या पानांचा उपयोग करून तो ठीक होऊ शकतो.

सगळ्यात पहिले आपण बोलूया, जर शरीरात कुठेही जखम झाली असेल व ती जखम भरत नसेल, तर ते आपण कसे ठीक करू शकतो ते बघूया. मित्रांनो, तुम्ही पानफुटीची पाने घ्या व पाट्यावर वरवंट्याच्या मदतीने ती पाने वाटून घ्या. हलके हे मिश्रण गरम करा व जिथे घाव किंवा जखम झाली आहे त्यावर हे लेप लावा.

घाव किंवा जखम हळू हळू भरून निघेल व ठीक होईल. त्याचबरोबर जर तुम्ही सुजेच्या समस्येने हैराण असाल, तर पानफुटीच्या पानांना हलके गरम करून सूज जिथे असेल त्या भागावर ती पाने बांधून ठेवल्यामुळे सूज बरी होते. हातावर किंवा पायावर बांधू शकता, त्यामुळे सूज कमी होत जाईल.

तसेच लघवी संबंधी कोणताही आजार असेल, लघवी वारंवार लागत असेल, तर पुरुषांनी या पानांच्या रसात काही प्रमाणात मध मिसळून त्याचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे मूत्रविकार ठीक होतो. नियमित काही दिवस याचे सेवन केल्यामुळे मूत्रविकार ठीक होतो.

त्याचबरोबर डोकेदुखीची समस्या असेल तर पाने वाटून त्याचा लेप कपाळावर लावल्यामुळे डोकेदुखी थांबते. तर आज आम्ही तुम्हाला पत्थरचट्टा या वनस्पतीची माहिती दिली. माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *