फक्त १ वेळा लावा या पानाचा रस, कसलाही त्वचारोग चुटकीत जळून जाईल…

अगदी कसल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झालं असेल, कितीही लहान वय असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल, कुठल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन असेल, गजकर्ण असेल, नायटा असेल, खरूज असेल तर पूर्णपणे नष्ट करणारा उपाय आज आपण पाहणार आहे.

आयुर्वेदामध्ये यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. ज्याचा वापर करून कसल्याही प्रकारचा त्वचारोग अगदी दोन तीन वेळेस हे औषध लावले तरी पुर्णपणे नष्ट होऊ शकतो. यासाठी पहिला घटक लागणार आहे कडुलिंबाची पाने. कडुलिंब हा सर्वत्र आढळणारा एक अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. याच्या पानांमध्ये बुरशीनाशक गुणधर्म आहेत, अँटीफंगल गुणधर्म आहेत.

अगदी रक्तामधली बुरशी सुद्धा नष्ट करणारी यांच्यामध्ये गुणधर्म आहेत. त्याचबरोबर रक्तशुद्धीचे काम करणारे गुणधर्म या कडुलिंबाच्या पानामध्ये आहेत. अशी कडुलिंबाची पाने आपल्याला घ्यायची आहेत. कडुलिंबाची पाने जास्त जुनाट किंवा कवळी न वापरता मध्यम वापरायची आहेत.

एक वेळेस तुम्ही हा रस बनवून ठेवू शकता आणि सहा ते सात दिवस वापरू ही शकता. त्यामुळे जास्तीत जास्त लिंबाची पाने घ्यायची आहेत. लिंबाची पाने कुटून घ्यायची आहेत. मिक्सरमधून काढू शकता, तुमच्याकडे जे साधन असेल त्याने अगदी बारीक कुटायचे आहे. ज्यामुळे त्याचा आपल्याला रस निघणार आहे. परंतु हे कुटत असताना त्यामध्ये दुसरा पदार्थ मिक्स करायचा आहे तो आहे तुरटी.

तुरटीमध्ये फंगलनाशक गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे असतात. जे फंगल इन्फेक्शन्स आहेत ते पुर्णपणे नष्ट होण्यासाठी या तुरटीच्या आणि लिंबाच्या पानाचा अत्यंत महत्त्वाचा वापर होतो. तर हे कुटत असताना साधारण पाच ते दहा ग्रॅम किंवा एक छोटासा खडा, कमी जास्त जरी प्रमाण झालं तर याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही.

चांगल्या रीतीने एकदम बारीक मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपल्याला त्याचा रस निघेल. जर तुमच्याकडे अगदी जुनाट पाने असतील तर दोन तीन चमचे पाणी टाकू शकता. जर तुमच्याकडे मध्यम स्वरूपाची असतील तर पाणी वापरण्याची गरज पडणार नाही आणि जर तुमच्याकडे लिंब चांगला नसेल तुम्हाला रस निघत नसेल तर थोडंस पाणी त्यामध्ये वापरू शकता.

कुटून घेतल्यानंतर त्याला सुती कपड्यात टाकून त्याला गाळून घ्यायचे आहे. हा रस आहे तो अगदी घट्ट निघतो, मलमासारखा निघतो. हा जो रस आहे तो कसल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन मग जांघेत असेल, त्वचेवर कुठेही असेल, गजकर्ण असेल, नायटा असेल, खाज येत असेल त्यावर लावायचे आहे आणि त्याला सुखु द्यायचं आहे. किमान दोन तीन तास ते राहू द्यायचं आहे.

साधारण रात्री हा उपाय केला तर रात्रभर तुमच्या अंगावर राहील आणि अत्यंत चांगला रिजल्ट तुम्हाला मिळेल. याने सर्वात आधी तुमची खाज बंद होते, जे रोगजंतू आहे ते नष्ट करते. तर हे तुम्ही एकदा सुद्धा बनवून ठेवू शकता. काचेच्या बरणीमध्ये बनवून ठेवा.

साधारण तीन दिवसामध्ये तुमचे फंगल इन्फेक्शन आहे, त्वचारोग आहे तो नष्ट होतो. तरी तुम्हाला सात दिवस उपाय करायचा आहे. ज्यामुळे हे फंगल इन्फेक्शन पुन्हा कधीही होणार नाही. तर हा साधा उपाय अवश्य करा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *