फक्त चिमूटभर खा, पोटात गॅस होणे, वारंवार पाद येणे 2 मिनिटात बंद…

मित्रांनो आज विषय तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे, आजचा आपला विषय ज्यांना बद्धकोष्ठता आहे , गॅस सारखा होत अशा लोकांना उपयोगी आहे. त्यासाठी आपल्याला एक चूर्ण बनवायचे आहे ते आपण दोन प्रकारे बनवू शकतो. ते कसे बनवायचे, कधी कधी घ्यायचे हे सगळे मी या मध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याने तुमची गॅसची समस्या दूर होईल. सकाळी जर पोट साफ झाले तर ही नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि आपण निरोगी आहोत. पण जर सकाळी पोट साफ होत नसेल हे चांगले नाहीय , ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे याने बऱ्याच रोगांना आमंत्रण मिळू शकते.

बद्धकोष्ठता जर जास्त दिवस असेल तर याने आपल्या लिव्हर वर परिणाम होऊ शकतो. ते कमकुवत होऊ शकते आणि आपण जे काही अन्न खाऊ त्याचे नीट पचन होणार नाही. यासाठी घरी असणारे मसाले वापरणार आहे, त्यात पहिला मसाला मी ओवा घेणार आहे, याच्यामुळे आपले पचन नीट होते , गॅस असेल तर कमी होतो आणि बद्धकोष्ठतादेखील कमी करते. छोटे छोटे दाणे असलेला ओवा हा स्वस्त असतो आणि नेहमीच आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असतो. दुसरा पदार्थ बडीशेप घेणार आहे तीसुद्धा आपल्या पचनक्रियेसाठी उपयोगी आहे, चयापचय क्रिया वाढवते. बडीशेप खाल्ल्याने जे काही खाल्ले असेल ते पचते.

तुम्ही पाहिले असेलच की खूप लोक जेवल्यानंतर पचनासाठी बडीशेप खातात. तर हे चूर्ण बनवण्यासाठी आपण बडीशेप वापरणार आहोत. बडीशेप मुळे आतड्याला चिकटलेले अन्ननपदार्थ सुद्धा निघून जातात ते स्वच्छ होते. यानंतर आपण जिरे घेणार आहोत, जिऱ्यामुळे खाण्यातील स्वाद तर वाढतोच ,तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.आजारपणात जिरे आपल्याला खूप उपयोगी पडते त्याने शक्ती मिळते. जिरे हे दोन प्रकारचे येतात पण आपण आता रोजच्या वापरतील जिरे घेतला आहे. दुसऱ्या प्रकारच्या जिऱ्याला शहाजीरे म्हणतात किंवा काळा जिरा. हा नेहमीच्या जिऱ्यापेक्षा चारपटीने पोषक असतो. पण सगळयांना हा काळा जिरा मिळू शकत नाही म्हणून आपल्याकडे जो नेहमीचा जिरं आहे ते आपण वापरू शकतो. पण जर शहाजीरे मिळाले तर खूपच उपयोगी आहे.

ज्यांना बद्धकोष्ठता आहे, गॅस आहे अशा लोकांना हे शहाजीरे खूप उपयोगी आहेत. यानंतर आपण घेणार आहोत ते काळ मीठ , कधी मळमळत असेल किंवा गॅस झाला असेल तर हे मीठ आणि बडीशेप उपयोगी पडते. बद्धकोष्ठतेला जास्त दिवस आपण नजरअंदाज नाही करू शकत कारण त्याने लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. याने बाकीचे रोग होऊ शकतात , त्वचारोग होऊ शकतो , चेहऱ्यावर मुरुमे येऊ शकतात . केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते, चेहरा , त्वचा निस्तेज दिसू शकते. हे चूर्ण बनवण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात साहित्य घ्यायचे आहे हे आता पाहू .कोणताही एकच चमचा वापरून हे प्रमाण घ्यायचे आहे. 2 चमचे ओवा जो की बद्धकोष्ठता दूर करेल, 2 चमचे जिरे ज्याला मसाल्यांचा राजा म्हणतात हा खूप फायदा करतो ,खाण्याचा स्वाद वाढवतो , बऱ्याच रोगात जिऱ्याचा उपयोग होतो.

2 चमचे बडीशेप याचा आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी खूप उपयोग होतो. काळ मीठ खूप उपयोगी आहे , जे गॅस बद्धकोष्ठतोवर खूप उपयोगी पडते.काळामीठ अगदी पाव चमचा घ्यायचे आहे. ज्यांना रक्तदाब असेल त्यांनी खूप कमी मीठ घालावे अगदी चिमुटभर मीठ देखील बास होईल. जास्त मीठ आपल्याला घ्यायचे नाही आहे, कब्ज असेल तर बरे होण्यासाठी म्हणून थोडेसे मीठ वापरयाच आहे. याने पोट साफ होण्यासाठी देखील मदत होते . हे सगळे मिक्स करून आता आपल्याला या सगळ्याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. अशारितीने हे चूर्ण तयार होते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हे चूर्ण नेहमीच गरम पाण्यात घ्यायचे आहे. हे चूर्ण कोणत्याही एका हवाबंद डब्यात ठेवायचे आहे आणी रोज फक्त अर्धा चमचा गरम पाण्यात मिसळून घ्यायचे आहे.कोणतेही औषध घेण्याची गरज नाही , फक्त रोज एक आठवडा अर्धा चमचा हे चूर्ण घ्यायचे आहे.

हलक्या अशा कोमट पाण्यात हे मिसळून घ्यायचे आहे. दुपारी जेवण झाल्यानंतर 1 तासाने हे पाणी प्यायचे आहे. रात्रीच्या जेवणानंतर अर्धा किंवा एक तासाने हे चूर्ण घातलेले पाणी प्यायचे आहे. दोन्ही वेळेला जेवण झाल्यानंतर हे पाणी जरूर प्या म्हणजे जे काही जेवण जेवले आहे ते पचण्यास मदत होईल आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.

पोटात गॅस होणार नाही , पोट साफ रहाणे खूप महत्त्वाचे असते कारण सगळे आजार हे पोट साफ न झाल्यामुळे होत असतात. पोट साफ असेल तर आरोग्याच्या शंभर तक्रारी दूर होतील. कब्ज आणि गॅस बरे करण्यासाठी हा अगदी अचूक आणि रामबाण उपाय आहे .बाकी पावडर एका डब्यात ठेवून दयायची आहे.एक आठवडा रोज घ्या , याने नक्की आराम मिळेल. बद्धकोष्ठता दूर होईल त्यामुळे अधूनमधून हे चूर्ण घेत राहा. आमची माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *