मित्रांनो, जर तुम्हाला गुड्घ्यांमध्ये, सांध्यांमध्ये जास्त प्रमाणात वेदना असतील किंवा तुम्हाला पोटासंबंधी कोणताही आजार आहे जसे की अॅसिडिटी, अपचन, जेवण योग्य प्रकारे पचत नसेल, आंबट ढेकर येत असतील किंवा पूर्ण शरीर दुखत असेल, तर मी एकदम सोपा असा उपाय तुम्हाला करून दाखविणार आहे, ज्याच्या वापराने तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून सुटका तर मिळेलच त्याचबरोबर तुम्ही रोगप्रतिकारशक्ति वाढेल.ज्यामुळे तुम्ही छोट्या मोठ्या आजारांपासून नेहमीच स्वत:ला वाचवू शकता. या उपायाने तुमच्या शरीरात कोणताही दुष्परिणाम होणार नाही, त्रास होणार नाही.
खास करून या थंडीच्या ऋतुत हे पेय तुम्ही जरूर करून बघा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया, सांधेदुखी, गुडघेदुखी, हाडांमधील कमजोरी किंवा पोटासंबंधी कोणताही आजार जसे की अॅसिडिटी, अपचन, गॅस यावर उत्तम उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी आपण इथे एका पातेल्यात एक ग्लास पाणी घेऊन ते गॅसवर तापत ठेवायचे आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहे तमालपत्र म्हणजेच बेलीफ. तमालपत्र हे शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करते.
तुमच्या लिव्हरसाठी हे उत्तम प्रकारे काम करते. एक तमालपत्र फक्त तुम्हाला घ्यायचे आहे. आता दुसरी वस्तु आहे अर्धा चमचा ओवा. मित्रांनो, ओवा आपल्या शरीरातून वात तत्वे बाहेर काढतो. वाताशी संबंधीत जितके पण आजार आहेत, जसे की गुड्घ्यांमधील वेदना, संधिवात, अथरायटीस, नसांसंबंधी कोणताही आजार, रक्ताभिसरण योग्य होत नसेल, किंवा पोटासंबंधी कोणताही आजार जसे की अॅसिडिटी, गॅस, अपचन हे सगळे आजार दूर करण्याचे काम ओवा करतो. आता हा ओवा ह्या पाण्यात टाका. हा उपाय ज्यांना नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या आहे ते पण करू शकतात.
शरीरात कोलेस्ट्रॉल, ट्राईग्लिसराइड वाढले आहे ते लोक जरूर हे पेय घेऊ शकतात. आता हे पाणी आरामात ४ ते ५ मिनिटे मंद गॅसवर उकळू द्या. हे पेय ज्यांना उच्च रक्तदाब आहे ते लोक पण घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचे रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होईल व रक्तदाब नियंत्रणात राहील. आता यामध्ये आपण टाकणार आहोत १ चमचा गूळ. तुम्ही जर मधुमेही रुग्ण असाल, तर गूळ वापरू नका. पाणी थोडे अजून उकळायचे आहे. आता ह्या काढयाचा रंग उत्तम आला आहे. आता हा काढा किंवा पेय आपण गाळून घ्यायचे आहे. ह्याचे सेवन कसे करायचे आहे ते मी तुम्हाला सांगतो.
तुम्हाला नियमित हे साधारण २० दिवस घ्यायचे आहे. तुम्हाला रोज सकाळी हे रिकाम्या पोटी घ्यायचे आहे. तुमचे पोट योग्य रीतीने साफ होईल. गॅस, अॅसिडिटी ह्या समस्या होणार नाहीत. शरीरातून वात असेल तर तो ठीक होईल. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी हे हळूहळू कमी होईल. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले असेल, तर ते हळू हळू कमी होईल. वजन कमी होण्यास मदत होईल, चरबी कमी होईल. गर्भवती महिलांनी हा काढा पिऊ नये. आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.