प्रेमाचे ढोंग करणाऱ्या लोकांना कसे ओळखालं ?

नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती कधींना कधीतरी कोणावर तरी प्रेम करते आणि बर्‍याच वेळा ती गोंधळून जाते की तिच्यावर/त्याच्यावर प्रेम करणारी स्त्री/पुरुष खरे प्रेम करतात की खोटे प्रेम करतात आणि जर प्रेम असल्याची खोटी बतावणी करीत असेल तर आज आम्ही तुम्हाला खोटे प्रेम करणार्‍यांच्या ५ सवयी किंवा चिन्हे सांगणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल की आपला प्रियकर किंवा प्रेयसी खरी आहे की खोटी. खोट्या प्रेमीची पहिले सवय आहे

१. खोट्या प्रियकराने भविष्याची तरतूद केलेली नसते. आपण अगदी बरोबर ऐकत आहात, त्यांच्याकडे कोणतीही भविष्यातील योजना नसते, आपल्याबद्दल किंवा स्वत:बद्दल किंवा आपल्या नातेसंबंधाबद्दल कोणतीही तरतूद नसते, जेव्हा जेव्हा आपण त्यांना आपल्या नातेसंबंधाविषयी किंवा भविष्याबद्दल विचारतो, तेव्हा ते आपल्याशी सर्व साधारण चर्चा करतील, जे प्रत्येक सामान्य माणूस करतो. तो तुम्हाला म्हणेल की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो किंवा करते, पण तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तसेच तो/ती म्हणेल की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो किंवा तुझ्यावर प्रेम करते , पण घरातील माणसे आपले प्रेम स्वीकारणार नाहीत.

मी तुमच्यावर खूप प्रेम करतो किंवा तुमच्यावर प्रेम करते, पण जर आपल्या जातीची समस्या असेल तर त्याच्याकडे तुमच्यासाठी कोणतीही भविष्य योजना नसते. खोटे प्रेम करणार्‍या लोकांमध्ये ही दुसरी सवय असते ती म्हणजे २. लैंगिकतेविषयी चर्चा: आपण दिवसभर जे काही बोलतो, त्यामध्ये जास्त बोलणे असते, ते लैंगिक संबंधांबद्दल. तुम्ही नक्की लक्षात घ्या, की जो कोणी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, तो तुमच्याशी तुमच्या कुटूंबाविषयी बोलेल, तुमच्या करिअरविषयी बोलेल, तुमच्या भविष्यातील योजनेविषयी बोलेल. फक्त लैंगिक गोष्टी करणार नाही. परंतु, एक खोटा माणूस, खोटा प्रियकर या गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाही, त्याला आपल्याकडून फक्त एक गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे लैंगिक संबंध. तिसरी गोष्ट खूप महत्वाची आहे.

३. खोटे प्रेम करणार्‍या व्यक्तिमध्ये कधीच चांगला समजूतदारपणा नसतो. दिवसाचा बहुतेक वेळ ते एकमेकांच्या चुका सांगण्यात आणि एकमेकांशी वादविवाद करण्यात घालवतात. त्यांना तुमच्या अडचणी, जीवन आणि तुमचे करिअर यामध्ये काही स्वारस्य नसते. त्यांना फक्त स्वत:पुरते बघायचे असते. त्यामुळे त्यांच्याकडे समजूतदारपणा नसतो. खरे प्रेम करणार्‍यांमध्ये समजूतदारपणा असतो आणि ते दोघेही एकमेकांचे विचार ऐकून घेतात आणि समजून घेतात. पुढचे चिन्ह असे आहे की खोट्या प्रेमात एक अट नेहमीच असते, म्हणजेच ते प्रेम अटींवर टिकलेले असते.

४. खोट्या प्रेमामध्ये नेहमी अटी असतात: खोटे प्रेम हे सशर्त असते, त्यात काहीही बिनशर्त नसते. तसे तर या या दुनियेत आईवडिलांशिवाय कोणीही बिनशर्त प्रेम करू शकत नाही, प्रत्येक नात्यात काही न काही अटी असतात. पण त्या अटी इतक्या जास्त नकोत, की त्याचा तुमच्या नात्यावर परिणाम होईल. आपण पुढील गोष्टी नक्कीच लक्षात घ्या.

५. बदलू आणि नियंत्रित करू इच्छितो: तो आपल्याला बदलू इच्छितो, तसेच आपल्याला नियंत्रित करू इच्छितो. जेव्हा कोणी तुमच्यावर प्रेम करते तेव्हा त्याला आपल्या सर्व सवयी आवडतात, परंतु हळू हळू तो आपल्याला बदलू इछितो आणि त्याला आपल्यावर नियंत्रण ठेवायचे असते. आपल्याला आपली वाईट सवय सांगून आणि त्यात बदल घडवून आणत असेल, तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येक नात्यातही ती घडली पाहिजे.

परंतु जर एखादी व्यक्ती आपल्यामध्ये नसलेल्या चुका सांगत असेल, ज्या आपल्यात नाहीच आहेत, आणि आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर टे अतिशय चुकीचे आहे. म्हणूनच या पाच गोष्टी जाणून घेऊन तुम्ही तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी खरी आहे की खोटी हे जाणून घेऊ शकता. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला यापैकी काही सवयी आहेत की नाही हे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन आम्हाला सांगायलाच हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *