Monday, November 28
Shadow

पोट साफ आणि बद्धकोष्टता याला मूळापासून समाप्त करण्याचा व आतड्यांची सफाई करण्याचा अचूक उपाय…

द्धकोष्टता या समस्येने आजच्या काळात प्रत्येक व्यक्ति हैराण आहे. कोणाकोणाला तर बद्धकोष्टता ही समस्या थंडीच्या ऋतुत जास्त प्रमाणात होते कारण थंडीच्या दिवसात पाणी कमी प्यायले जाते व कोणाच्या शरीरात जर फायबरची मात्रा कमी झाली त्यामुळे बद्धकोष्टता होऊ शकते. बद्धकोष्टतेमुळे दिवसभर आपल्याला पोट भारी वाटते, जड वाटते, व आपण काही खाल्ले तर ते उलट आपल्या गळ्याशी येते, अॅसिडिटीची समस्या वाढते. पोटाला गॅसची समस्या वाढते. म्हणून जुन्यात जुन्या बद्धकोष्टतेपासून तुम्ही कशी सुटका करून घेऊ शकता व तुम्हाला आराम मिळू शकतो ते आपण बघूया. साधा उपाय आहे,

तुम्हाला तो आवडेल व आपण अशा वस्तु घेतल्या आहेत ज्या सहजपणे उपलब्ध असतील. हे बनविण्यासाठी तुम्हाला फक्त ५ मिनिटे पाहिजेत. आम्ही येथे घेतली आहे मुलेठी. मुलेठी तुम्हाला माहीतच असेल. ही एक प्रकारची औषधी वनस्पति आहे व पोटासाठी एकदम रामबाण आहे. बद्धकोष्टतेची समस्या थंडीत जास्त होते, पण ही मुलेठी तुमची सर्दी ठीक करेल व शरीर गरम ठेवेल. एका वेळच्या वापराने तुम्हाला फायदा होईल. तुमच्या जवळच्या किराणा दुकानात ही मिळेल. माझ्या इथे याला मुलेठी म्हणतात,तुमच्या भागात याला काय म्हणतात ते कमेन्ट करून सांगा.

दुसरी वस्तु आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे ओवा. ओवा आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असतोच. ओवा पोटासाठी, अॅसिडिटी, यासाठी खूपच फायदेशीर आहे. थोडासा ओवा तुम्हाला वापरायचा आहे. आता हे कसे तयार करायचे आहे ते बघूया. तुम्हाला १ ग्लास थोडे गरम पाणी घ्यायचे आहे. सकाळी तुम्हाला हे पेय तयार करून ठेवायचे आहे व संध्याकाळी घ्यायचे आहे. अर्धा टीस्पून तुम्हाला ओवा घ्यायचा आहे. ती त्या पाण्यात टाका. नंतर तुम्ही जी मुलेठी घेतली आहे ती तशीच पाण्यात टाकू नका. त्यावर माती असते त्यामुळे मुलेठी अगदी चोळून चोळून स्वछ धुवून घ्या. नंतर एकदा स्वछ पाण्याने धुवून घ्या. नंतर ती वापरा.

आता ज्या पाण्यात तुम्ही ओवा टाकला आहे, त्याच पाण्यात ही मुलेठी २ तुकडे टाका. या मुलेठीचे तुकडे मिळतात. याचे जास्त सेवन करायचे नाही नाहीतर पोटात गर्मी जास्त होईल. आता दिवसभर ही भिजवून ठेवा. आता हे तयार कसे करायचे आहे. एक पातेले घ्या. ते गॅसवर ठेवा. आता ग्लासातील पाणी, ओवा, मुलेठी त्या पातेल्यात घ्या. थोडे पाणी वरुन थोडे घाला. आता कमीत कमी ५ ते ७ मिनिटे हे उकळवा. आता मी यामध्ये १ छोटा आल्याचा तुकडा किसून टाकणार आहे. गॅस, पचन यासाठी आले उत्तम आहे. उकळी आली की गॅस बंद करा.

जेवण झाल्यानंतर कमीत कमी एक ते दीड तासाने हे पेय तुम्हाला प्यायचे आहे. ते गाळून ठेवून द्या व जेवण झाल्यावर एक तासाने ते प्या. झोपण्याच्या आधी १ तास घ्या. आता यामध्ये १ वस्तु अजून टाकायची आहे ती म्हणजे काळे मीठ. ४ चिमुट हे मीठ त्यामध्ये टाकायचे आहे. रात्री जेवणानंतर १ ते दीड तासाने हे पेय प्या. दिवसभरात तुम्हाला भरपूर पाणी प्यायचे आहे. हिरव्या पालेभाज्या व फायबर पदार्थांचे सेवन करायचे आहे. रोज हे पेय घेऊ नये. आमची माहिती आवडली तर लाइक व शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.