पोटात वारंवार होणारा गॅस अपचन, अजीर्ण यावर घरगुती रामबाण उपाय…

आताच्या काळात बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उद्भवणार्‍या कितीतरी स्वाथ्यविषयक समस्या आहेत. आताच्या धावपळीच्या जीवनात व आजच्या प्रदूषणाच्या काळात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. माणसाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे, अनेक आजाराना त्यांना तोंड द्यावे लागते आहे. अशा धावपळीच्या जीवनशैलीमुळे बाहेरचे फास्ट फूड खाणे, रस्त्यावरील गाड्यांवर उभे राहून खाणे हे सर्वसाधारण झाले आहे. मुले सुद्धहा आजकाल पिझ्झा, पास्ता, हे असे पदार्थ मोबाइल वरुन घरपोच मागवु लागली आहेत. परिणाम, व्हायचा तोच होतो आहे. गॅस म्हणजेच पोटात अॅसिडिटी होणे ही समस्या सर्वसाधारण झाली आहे.

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जर आपल्या पोटात वारंवार गॅस होत असेल तर तो होऊ नये या साठी आपण आज एक आयुर्वेदिक काढा म्हणा किंव्हा चहा म्हणा तो तयार करणार आहोत. हा काढा कसा बनवायचा? तो कधी प्यायचा? किती प्रमाणात प्यायचं? ते आपण पाहणार आहोत. वारंवार गॅस होत असेल, आपल्याला अपचन होत असेल, अजीर्ण वाटत असेल, जर आपले पोट फुगल्यासारखे वाटत असेल, आपलं जर पोट व्ययस्थित साफ होत नसेल, तर या समस्या समाप्त करण्यासाठी आम्ही आज एक साधा सरळ उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर आपलं पोट व्यवस्थित तर आपले आरोग्य व्यवस्थित. यासाठी आपलं पोटातील समस्या कडे दुर्लक्ष न करता व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या पोटामध्ये जो काही गॅस होत आहे त्याला कमी केले पाहिजे. चला तर पाहुयात हा घरगुती काढा कसा बनवायचा.. मित्रांनो यासाठी आपल्याला लागत ते एक ग्लास पाणी. पाणी तुम्हाला साधं घ्यायचं आहे.

एक ग्लास पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे वापरल्यानंतर त्या मध्ये दुसरा घटक वापरायचा आहे धने पावडर. धने पावडर अर्धा चमचा वापरायचा आहे. तिसरा जो घटक वापरायचा आहे तो आहे काळी मिरी. आपण चार काळी मिरी यामध्ये वापरायची आहे. चौथा जो घटक वापरायचा आहे तो म्हणजे लवंग. दोन लवंग तुम्हाला वापरायच्या आहेत. आणि आपला जो शेवटचा घटक आहे तो म्हणजे हळद पावडर. एक चिमूटभर हळद पावडर वापरायची आहे.

हे सर्व तुम्हाला मिक्स करून घ्यायचा आहे. एक ग्लास पाणी म्हणजे 250 ग्राम आपण पाणी घेतलं आहे. हे पाणी आपण आता उकळून घ्यायचं आहे. हा जो काढा आहे तो आयुर्वेदिक आहे. कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती होणार नाही. ह्या काढ्याचे आपण सेवन केल्यानंतर जे आपले पोटाचे विकार आहेत ते कमी होतात. हा काढा खळखळ उकळून घेतल्यानंतर नंतर तुम्हाला हा काढा गाळून घ्यायचा आहे.

हा काढा तुम्हाला थोडा कोमट झाल्यानंतर प्यायचा आहे. तुम्हाला या काढ्याच सेवन संध्याकाळी जेवल्यानंतर करायचं आहे. या मुळे तुमच्या पोटातील जो काही अपचन, अजीर्ण, गॅस, पोटातील घाण काढण्यासाठी हा काढा अत्यंत उपयुक्त ठरतो. तर मित्रांनो हा साधा सरळ उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *