पांढरे केस कितीही प्रमाणात असुदेत, १ मिनिट लावा म्हातारपणात पण तरुणपणाची आठवण करून देईल….

नमस्कार मित्रांनो. ही वस्तु केसांमध्ये लावा, केस मूळापासून कायमसाठी काळे होतील. पांढर्याि केसांची समस्या दिवसेंदिवस वाढतच जाते आहे. आजकाल लहान वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. त्याला आपण म्हणतो “प्रीम्यचुयर्ड केस”. केस पांढरे होण्याचे मुख्य कारण आहे प्रदूषण, सूर्याची प्रखर उष्णता, यूव्ही किरणे जी आपल्या डोक्यावर पडतात तेव्हा आपली डोक्याची त्वचा कोरडी होते व केस पांढरे होऊ लागतात. म्हणून कधीही उन्हात जाताना स्कार्फ किंवा टोपी याचा वापर करावा.

चला तर मग मित्रांनो, बघूया पांढरे केस मूळापासून काळे करण्यासाठी या उपायात आपण काय वापरणार आहोत. कॉफी घेतली आहे. मी २ चमचे कॉफी घेतली आहे. कोणत्याही कंपनीची कॉफी चालेल. कॉफी काय करते ते बघूया. कॉफी प्रथम चमच्याने थोडी मोकळी करून घ्या. त्यामध्ये छोटे छोटे दाणे असतात,त्याची आपल्याला एकदम बारीक पाऊडर करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या केसांना चांगला रंग येईल व केसांवर जेव्हा लावू तेव्हा गुठळी केसात अडकून राहाणार नाही. तुम्ही मिक्सरवर पाऊडर करून घेऊ शकता.

कॉफीमध्ये कैफीन असते, जो केस गळण्यापासून रोकते. केसांना चमकदार बनवते. त्याचबरोबर कॉफीमुळे केसांना चांगला काळा रंग येतो. हा उपाय १०० टक्के रामबाण उपाय आहे. वयाच्या आधी जर केस पांढरे होत असतील, लहान वयाची मुले याचा वापर करू शकतात कारण हा उपाय सुरक्षित आहे. याचे दुष्परिणाम नाहीत. केमिकलयुक्त डाय न लावता हे वापरुन बघा. घरगुती उपायाने नैसर्गिक पद्धतीने केस काळे करण्याचा हा उपाय आहे.

दुसरी वस्तु मी घेतली आहे ती म्हणजे चहा पाऊडर. चहा पाऊडर नेहमीच आपल्या स्वयंपाकघरात असते. आपण नेहमी चहा पिण्यासाठीच चहा पाऊडरचा वापर करतो. परंतु, तुम्हाला माहीत नसेल की चहा पाऊडर हे एक उत्तम सौन्दर्यप्रसाधन आहे. १ छोटा कप पाणी घ्यायचे आहे. त्यात चहा पाऊडर घालून ब्लॅक टी तयार करायचा आहे. १ चमचा चहा पाऊडर घालायची आहे. चहा पाऊडरमध्ये जे कैफीन असते ते आपले केस मूळापासून मजबूत बनविते तसेच केस मूळापासून काळे करण्यास मदत करते.

प्राचीन काळापासून चहा पाऊडरचा वापर केस काळे करण्यासाठी केला गेला आहे कारण हा एकदम नैसर्गिक उपाय आहे. केसांना चमक येते, केस मजबूत होतात चहाच्या पाण्याने. चहा पाऊडरमध्ये मेलोनीन, करोटीन नावाचे तत्व असते जे केसांची मुळे मजबूत बनविते. त्यामुळे केस गळण्याची समस्या बंद होते जर आपण काही काळासाठी चहा पाऊडरीच्या पाण्याचा प्रयोग आपल्या केसांवर केला. मी इथे २ चमचे कॉफी घेतली आहे व हे चहाचे पाणी हळू हळू त्यामध्ये मिसळत आहे.

मित्रांनो, मुले, मुली, मोठ्या वयाच्या व्यक्ति, तरुण कोणीही याचा वापर करून बघू शकतात. चहाचे पाणी मी पूर्ण घेतले आहे. पुढील वस्तु मी घेणार आहे, ती कांद्याचा रस. कांद्याचा रस आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. कांद्यामध्ये खूप प्रमाणात सल्फर आहे. आपल्या केसांच्या वाढीसाठी व केस गळणे थांबण्यासाठी सल्फर खूपच फायदेशीर आहे. कांद्यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट गुणधर्म असतात त्यामुळे स्काल्पच्या जंतुसंसर्गाला कांदा दूर करतो. आपण कांदा किसून घेऊन रस काढू शकतो.

कांद्याच्या रसात विटामीन ए, विटामीन सी, विटामीन बी असते ज्यामुळे आपल्या केसांची मुळे मजबूत होतात. खूप प्रमाणात सल्फर असल्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. जंतुसंसर्गामुळे पण केस गळू शकतात. १ कांद्याचा रस मी घेतला आहे. हा रस कॉफी, चहा पाऊडर याच्या पाण्यात मिसळायचा आहे. टक्कल पडण्याची समस्या असेल, तरी कांद्याचा रस उपयोगी पडतो. नेहमी नैसर्गिक उपाय करणे योग्य असते. आता यामध्ये आपण १ विटामीन ई ची कॅप्सुल असेल तर घालू शकता.

विटामीन ई मुळे केसांची मुळे मजबूत होतात. कॉटन बाल्ल्सने लावायचा आहे हा पॅक. १ तास ठेवून मग केस स्वछ धुवून टाकायचे आहेत. आमची ही माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *