पांढरे केस कायमसाठी मूळापासून काळे करण्याचा जबरदस्त घरगुती उपाय- १०० टक्के परिणामकारक

पांढरे व गळणार्याठ केसांच्या समस्येपसून सुटका होण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरतात परंतु त्या तेलांमुळे केसांना फायदा न होता नुकसानच होते कारण वेगवेगळी तेल वापरल्यामुळे केस आणखी जास्त खराब होतात व त्याचे दुष्परिणाम पण होतात. म्हणून, कधीही वेगवेगळी तेल केसांवर वापरू नयेत.

केसांना काळे व मजबूत करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक अशा वस्तूच्या बाबतीत सांगणार आहोत जी वापरल्यावर तुमचे केस तुम्हाला काळे व मजबूत झालेले दिसतील. आज आम्ही तुम्हाला ज्या वस्तुबद्दल सांगणार आहोत त्या वस्तूचे नाव आहे कडूलिंबाची पाने. आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानाला खूपच महत्त्व आहे. कडूलिंबाच्या वापराने बरेच आजार बरे होतात. कडूलिंबाची पाने ही चवीला खूपच कडू असतात पण त्यामधील अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीकसारखे गुण आपल्या स्वास्थ्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.

या त्याच्या गुणधर्मामुळे कडूलिंबाला अतिशय खास असे एक स्थान आहे. आपल्याकडे भारतामध्ये कडूलिंबाची ओळख ही एक ‘गावठी औषध’ म्हणून आहे ते यामधील अतिशय उत्तम गुणधर्म आणि त्याची सहज असलेली उपलब्धता यामुळे. कडूलिंबाचे झाड हे एक असे झाड आहे, ज्याचा प्रत्येक भाग आपल्यासाठी कोणत्या ना कोणत्या आजारावर गुणकारी आहे. पण केसांसाठी हे एक वरदान आहे.

कडूलिंब ही केसांसाठी खूपच फायदेशीर वनस्पती आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात, जे आपल्या केसांची खूप काळजी घेतात आणि केसांना योग्य प्रकारे पोषण देतात. याचबरोबर यामुळे केसांच्या समस्यांमधूनही सुटका मिळते. केस मुलायम व तजेलदार दिसतात. केसांची गळती थांबते. केसांमधील उवा व कोंड्याची समस्या दूर होते. कडूलिंबाची पाने उकळून घ्या आणि ते पाणी केस धुवायला वापरा.

तुम्हाला जर तुमचे केस काळे व मजबूत बनवायचे असतील, तर २५ ग्राम कडुंलिंबाची पाने घेऊन ती उन्हात सुकवून घ्या व नंतर त्या सुकलेल्या कडुलिंबाच्या पानांची मिक्सरवर बारीक पाऊडर करून घ्या. कडूलिंबाच्या पानांची पाऊडर केल्यानंतर २५० ग्राम नारळ तेलात ह्या कडूलिंबाच्या पानांची पाऊडर मिसळा व दोन्ही चांगल्या प्रकारे गरम करून घ्या. नंतर हे दोन्ही चांगले गरम झाले की गॅस बंद करा व तेल कोमट झाले की एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

रोज रात्री झोपण्याच्यापूर्वी हे तेल केसांना लावा. हा प्रयोग साधारण २० दिवस करा. तुम्ही नक्कीच फरक अनुभवाल की तुमचे केस काळे व मजबूत झाले आहेत. केसांचे गळणे कमी झाले आहे. कोंड्याची समस्या दूर झाली आहे. केस चमकदार दिसू लागतात. कडूलिंबाची पाने ही गुणकारी यासाठी आहेत, की तुमचे वय वाढवण्याची प्रक्रिया कडूलिंब कमी करते आणि त्यामुळे तुमची त्वचा ही तुकतुकीत व टवटवीत राखण्याचे काम कडूलिंबाची पाने करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *