Monday, November 28
Shadow

पहाटे चारही वेळ, 20 वर्ष्याच्या तरुण मुलगीची हालत पाहून डॉक्टर सुद्धा रडू लागले…

पहाटे चारची वेळ!

“डॉक्टर, इमरजन्सी”, या हाकेने मी खडबडून जागा झालो. अँबूलन्स मधील ड्रायव्हर सांगत होता,” बर्न ची केस आहे!” मी लगेच मामांना बोलावून पेशंट आत घेतला.

वीस वर्षांची तरुण मुलगी, तिची पूर्ण उजवी बाजू भाजली होती, त्वचेवर फोड दिसत होते, तिच्यासोबत तिची सासू होती, थरथरत होती आणि त्या थरथरत्या हातात होता दोन महिन्यांचा कोवळा जीव!

मी प्रथमोपचार सुरु केले. तिला विचारलं काय झालं? तिने सांगायला सुरवात केली, “थंडी वाजत होती म्हणून धगीला बसली होते, अचानक साडीने पेट घेतला, साडी जळाली, उजवी बाजू अन् दोन्ही पाय भाजलेत बघा, माझं मालक मुंबईला असतात, इथे सासू मी अन् बाळ राहतोय!”

मी ऐकत होतो, तिची बिकट अवस्था पाहवत नव्हती पण ती अजिबात घाबरली नव्हती हे माझ्या लक्षात आलं. पहाटेच्या या शांततेत आमच्या संवादाव्यतिरीक्त आवाज येत होता तो त्या बाळाच्या रडण्याचा. “डॉक्टर, मी जरा उठून बसू का?” तिच्या विनंतीला मी नकार दिला नाही.

प्रथमोपचार अंतिम टप्प्यात होते, शरीरावरील त्वचेचं बरच नुकसान झालं होतं. “डॉक्टर, मी हात जोडते, मला माझ्या बाळाला एकदा बघू द्या!” तिने अत्यंत आर्त स्वरात विनंती केली. तिच्या सासूला बाळासहीत आत बोलावून घेतलं.

बाळ प्रचंड रडत होतं आणि त्या माऊलीने काय केलं माहितीय……… त्या बाळाला पाजायला घेतलं!!!! “रात्री पासून बाळ उपाशी आहे ओ, पाच मिनीटं दूध पाजू द्या!”

तिची संपूर्ण एक बाजू धगधगत होती, आधाराचं असं कुणीही जवळ नव्हतं, असह्य वेदना होत असताना देखील ती माऊली आपल्या लेकराच्या भुकेच्या विचार करते!!!!

मी स्तब्ध होऊन ते दृष्य पाहत होतो, माझे डोळे पाणावले होते… -गौरीहर

*जरुर शेअर करा, परवानगीची आवश्यकता नाही. मित्रांनो लेख कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.