परिवारात मृत्यू झाल्यावर मुंडन (केशवपन) का करतात?– जाणून घ्या.

नमस्कार

मित्रांनो, हिंदू धर्म पुंनर्जन्मावर अतूट विश्वास ठेवतो. म्हणून मृत्यू झाल्यावर मृत आत्म्याला मुक्ति व शांति मिळण्यासाठी कितीतरी कर्मकांड केले जातात. तुम्ही बघितले असेल, की हिंदू धर्मात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा मृत व्यक्तीचे नातलाग आपल्या डोक्यावरच्या केसांचे मुंडन करतात म्हणजेच केस काढून टाकतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ह्याच्या मागचे धार्मिक कारण काय आहे व असे का केले जाते. जर नसेल, तर आज आम्ही या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ह्याच्या मागचे धार्मिक महत्व काय आहे.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये गरुड पुराण हे एक असे पुराण आहे जो मृत्यू सारख्या किचकट विषयावर अगदी खोलवर प्रकाश टाकते. या पुराणात आत्म्याच्या परलोकी गमन करण्याची विस्तृत व्याख्या मिळते. गरुड पुराणानुसार रिती व नियमाने केलेल्या काही कार्यामुळे आत्म्याला पुढील जन्मी अर्थात नवीन शरीरात प्रवेश करण्यासाठी दरवाजे खुले होतात किंवा ती आत्मा सरळ स्वर्गात जाते.

तर या कृत्यांपैकी एक आहे, की मृत्यू झाल्यावर परिवारातील पुरुष सदस्यांचे मुंडन करणे. या मुंडन करण्याच्या प्रक्रियेत डोक्यावरचे सगळे केस काढले जातात. जर तो सदस्य आपल्या डोक्यावर शेंडी ठेवणारा असेल तर ती कापण्यास मनाई आहे त्याची परवानगी दिलेली नाही. चला तर मग जाणून घेऊया की असे का करतात.

मित्रांनो याचे सगळ्यात पहिले कारण आहे ते म्हणजे स्वछता- हे स्वछता लक्षात घेऊन केले जाते. कारण मृत्यू नंतर शरीरात सडणे ही प्रक्रिया सुरू होते व जास्त प्रमाणात जिवाणूंचे ते घर बनते. नातेवाईक किंवा परिवारातील लोक मृत्यू पासून स्मशांनापर्यंत म्हणजेच अग्नि देण्यापर्यंत त्या मृत शरीराला कितीतरी वेळा स्पर्श करतात.

त्यामुळे हे संभव आहे, ते जिवाणू त्यांच्या शरीरावर पण येऊन बसू शकतात. म्हणून अंतिम संस्कार केल्यावर नखे कापणे, मुंडन व स्नान यासारख्या क्रिया बरोबरच केल्या जातात. ज्यामुळे शरीराला स्वछ ठेवले जाऊ शकते. मुंडन केल्यामुळे आपल्याला कितीतरी प्रकारच्या संक्रमणापासून मुक्ति मिळू शकते व महिला स्मशानात जात नाहीत, त्यामुळे हिंदू धर्मात त्यांच्या मुंडणाला परवानगी नाही.

कृतज्ञता व्यक्त करणे- असे मानले जाते, की कोणत्याही नातलगाचा मृत्यू झाल्यावर मुंडन करण्यामागे एक मोठे कारण हे आहे की मृत व्यक्तीच्या प्रती श्रद्धा व कृतज्ञता सन्मान दाखविणे. मुंडन करणे हे मृत व्यक्तिला दिलेल्या सन्मानाचे प्रतीक म्हणून बघितले जाते. मृत व्यक्तीने आपल्या परिवारासाठी खूप काही केल्यानंतर त्यांच्यावर कितीतरी वर्षे प्रेम केल्यानंतर व बर्यातच गोष्टीत त्यांच्याबरोबर उभे राहिल्यानंतर त्यांना सोडले आहे.

म्हणून संसारीक कृतज्ञता म्हणून मुंडन केले जाते. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांति व सुख मिळते. जसे घरात मूल जन्माला आले की सूतक लागते तसेच गरुड पुराणानुसार परिवारात जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लागलेल्या सुतकाला पातक म्हणतात. ज्या घरात मृत्यू झाला आहे, ते सदस्य सव्वा महिना कोणी कोणाच्या घरी जात नाही.

४० दिवसात नक्षत्राचे एक चक्र पूर्ण होते. मुंडन करण्याचे आणखी एक कारण म्हणजे भावनिक संबंध तोडणे. केसांशी हे संबंधित असते त्यामुळे मुंडन केले जाते. आत्म्याला तरच मुक्ति मिळते. ही माहिती जर तुम्हाला रुचली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *