परदेशात असलेली मुलगी २ वर्षांनी आई वडिलांना भेटायला आली पण तिला जे दिसले ते पाहून ती हादरून गेली.

कॅलिफोर्निया त राहणाऱ्या आपल्या लेकीला बाबांनी फोन करून सांगितले.” पियू बेटा अग आईची तब्येत मधून मधून बरी नसते, तू तशी रोजच तिच्याशी फोनवर बोलते पण चार पाच दिवसांपूर्वी तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते, बरे वाटल्यावर डि स्चा र्ज मिळाला आता बरी आहे पण तुझी खूप आठवण काढते.” पियुला असा दोन दिवसापूर्वी आलेला बाबांचा फोन बेचैन आणि काळजीत टाकून गेला.

कधी एकदा इंडियात जाते अन् आईला बिलगते असे तिला होऊन गेले. पीयू अन् तिचा नवरा दोन वर्ष झाले भारतातून अमेरिकेत आलेले होते. प्रशांतला खूप छान जॉब आणि ऑफर मिळाली म्हणून त्याने चटकन ऑफर स्वीकारली अन् मग महिनाभरात पियु तिचा पासपोर्ट, व्हिसा मिळवून कॅलिफोर्निया साठी उडाले सुद्धा. तेथे गेल्यावर पियुने सुद्धा सुरवातीला छोटा जॉब मिळवला होता.

दोघेही u.s मध्ये हळू हळू सेट होत होते. आईने तर खूपचं शुभेच्छा दिलेल्या होत्या. अन् म्हणाली होती, ” प्रीया बेटा मुले मोठी झाल्यावर त्यांना पंख फुटणार, ते उंच आकाशात भरारी घेणारच, मग आई वडिलांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचे असतेच, तू विश्वात कोठेही गेलीस तरी माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच.” असे म्हणून तिने आम्हाला हसत निरोप दिला होता. प्रशांत तर अगदी तिच्या मनासारखा जावई होता. आमचा प्रेमविवाह होता.

आईला सांगितल्यावर अन् त्याला भेटल्यावर आई बाबा तर खुश होऊन गेले होते. दिसायला अगदी राजबिंडा, उत्तम शिक्षण अन् विनम्र स्वभाव ,अजून काय पाहिजे? त्यानंतर दोन महिन्यातच आमचे लग्न होऊन प्रशांतला लगेच U.S ची ऑफर आली अन् सगळे झटकन घडत गेले.आज आम्हाला येथे येऊन दोन वर्षे झाली. दिवस किती भरकन निघून गेले कळले सुद्धा नाही. भारतात जाणे झालेच नाही आणि लगेच शक्य सुद्धा नव्हते.

बरे इकडे अन् भारतात रात्र आणि दिवसाच्या वेळेचा ताळमेळ नसल्याने सुरवातीला सारखे फोन व्हायचे, पण आम्ही आमच्याकडून दिवसा फोन केला तरी इंडीयात रात्र असायची. मग हळू हळू फक्त रविवारी फोन होत गेले. काल बाबांचा फोन आला अन् मी मात्र बेचैन झाली. रात्री प्रशांतला सांगितले आईची एकदा भेट घेऊन येते ,खूप आठवण येते आहे आणि मला जॉब मधून महिनाभराचा ब्रेक सुद्धा मिळाला आहे, तर काय जायचे का? प्रशांत म्हणाला,” असे कर प्रिया मी तर सध्या खूप महत्त्वाच्या प्रोजेक्ट वर काम करतो आहे, त्यामुळे मला सुटी मिळणार नाही तू एकटी पुढे जा, मी पंधरा वीस दिवसांनी येण्याचा प्रयत्न करतो.” असे सांगून त्याने लगेच दोन दिवसानंतरचे तिकीट बुक केले सुद्धा.

जाण्याचा दिवस उगवला अन् मला आईला भेटण्याचा योग आणि आनंद वाटला. मग मीच विचार केला अन् प्रशांतला सुद्धा सांगितले, ” हे पहा प्रशांत मला घरी जाऊन आई बाबांना सरप्राइज द्यायचे आहे. मी येते आहे हे त्यांना आजिबात कळवू नको, अन् तू सुद्धा माझी आजिबात काळजी करू नको. मुंबई मला काही नवीन नाही, जन्मच तेथला आहे . सगळी मुंबई मला तोंडपाठ आहे.” विमान टेक ऑफ झाले अन् माझ्या आठवणींनी सुद्धा टेक ऑफ केले. आई ,मी अगदी अचानक आलेली पाहून किती दचकेल नाही! मी तर हळूच पाठीमागून जाऊन तिचे डोळे झाकणार आहे.

लहानपणी कसे मी कॉलेजमधून आली की किचनमध्ये चोर पावलांनी जाऊन तिचे डोळे झाकुन म्हणायची ओळख पाहू? तेव्हा आई म्हणायची ” वेडा बाई बोलते कशाला मी तर तुझ्या आवाजावरून तुला ओळखुन घेईल ना!” मग आम्ही दोघे खूप हसायचो. बसल्या बसल्या अशा अनेक आठवणी डोळ्यापुढे सरकत होत्या.पियूने फोन स्विच ऑफ केला अन् नंतर केव्हा डोळा लागला ते समजलेच नाही. जाग आली तेव्हा मी इंडियात पोहोचले होते अन् काही क्षणातच land होणारं होते. मी आवरासावर सुरू केली. विमान मुंबई एअर पोर्ट वर land झाले अन् मी माझी बॅग सावरत विमानतळा बाहेर आले.

विचार केला आता टॅक्सीतून तडक डोंबिवली ला घरी जायचे अन् आईचे डोळे झाकून तिला घट्ट मिठी मारायची, असा विचार करतच प्रिया बाहेर आली. तो काय पलिकडून तिची मॉम तिला हात हलवत बोलावत होती. प्रियाला आश्चर्याचा धक्काच बसला ,ती धावतच आईजवळ गेली. ” अरे आई तू मला घ्यायला कशी काय?” ” कशी काय म्हणजे मला काय मुंबई माहीत नाही? डोंबिवली ते फोर्ट चाळीस वर्षांपासून अप डाऊन करते आहे”. तस नाही ग आई पण मी येणार हे तुला कसे कळले? मी तुला सरप्राइज देणार होते.

” अग वेडे आईला सगळे कळते, तू आई होशील ना तेव्हा तुला सुद्धा हे सगळे समजेल, तू आता येथेच बडबड करत बसू नको , चल टॅक्सी आली बैस लवकर.” टॅक्सीत दोघीही खूप गप्पा मारत होते. आई तुला US मधली एक गंमत सांगते. आताच तेथे हॅलोविन हा सण झाला , सण म्हणजे आपण जसे गेलेल्या व्यक्तीचे श्रा द्ध करतो तसा प्रकार असतो. पण ते श्रद्धा सुद्धा अगदी उत्साह आणि आनंदात करतात. त्या दिवशी म्हणे आपले गेलेले पूर्वज, आप्त घरी जेवायला येतात. मग सर्वांना ते येणार म्हणून खूप आनंद होतो.

दारावर त्यांच्या स्वागतासाठी भुताचे मुखवटे लावले जातात, लहान मुले सुद्धा भुताचे मुखवटे लावून वावरतात. एकंदरीत पूर्वजांचे जंगी आणि आनंदाने स्वागत करतात. आई खरेच येत असतील का ग गेलेली व्यक्ती भेटायला? ” हे बघ प्रिया मला असे वाटते जर एखाद्य व्यक्तीवर निस्सीम आणि निरपेक्ष प्रेम असेल अन् त्या व्यक्तीची जिवंतपणी भेट झाली नाही तर तिला भेटायला ती गेलेला व्यक्ती येऊ शकत असावी. जसे आई आपल्या अपत्याला न भेटता अचानक गेली अन् तिचा जीव तिच्या अपत्यात गुंतला असेल तर नक्की येत असावी. गप्पा मारता मारता डोंबिवली केव्हा आले ते समजले सुद्धा नाही. प्रवासात आईने तर तिला खूप वेळा मिठ्या मारून खरेच तुझी खूप आठवण येत होती असे सारखे सांगायची.

प्रिया म्हणाली सुद्धा,” अग आई घर तर येऊ दे . का मला येथेच मिठ्या मारून पोट भरून घेशील. ” पीयु असे वाटते आहे आताच तुला असेच माझ्या मिठीत धरून ठेवावे जसे मी तुला लहानपणी माझ्या मिठीत गच्च आवळायची.” टॅक्सी आता डोंबिवलीत शिरली होती. कधी एकदा घर येते असे प्रियाला होऊन गेले होते. आई मात्र आता शांतपणे बसली होती. इतक्यात टॅक्सी सोसायटी समोर उभी राहिली. तितक्यात आई म्हणाली,” प्रिया तू तुझी बॅग घेऊन पुढे हो, जा बाबांना सरप्राइज दे, अन् तुझे अमेरिकन डॉलर काही टॅक्सी वाला घेणार नाही, मी पैसे देऊन आलीच जा.” प्रिया खूप आनंदाने अन् उत्साहाने आईला लवकर ये असे सांगून लिफ्टकडे पळाली.

कधी एकदा सहावा मजला येतो अन् आपण बाबांच्या गळ्यात पडतो असे तिला होऊन गेले होते. सहाव्या मजल्यावर प्रिया बॅग ओढत दाराजवळ आली, बेल वाजवली, अन् अधिरतेने बाबा दार उघडण्याची वाट पाहत होती. बाबांनी दार उघडताच त्यांचा खिन्न चेहेरा तिला दिसला. प्रियाचा चेहेरा एकदम बदलला. ” बाबा काय झाले तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना?”. थांबा आई टॅक्सी चे पैसे देऊन वर येतच असेल मी बघते.” असे म्हणून आत आली. अन् पहाते तो काय! आईच्या फोटोला मोठा हार घातला होता. निरांजन आणि उदबत्ती मंदपणे जळत होती.

प्रिया ते पहातच किंचाळली,” नाही नाही बाबा हे काय आई तर मला एअर पोर्ट वर घ्यायला आली होती, आम्ही तर किती तरी गप्पा करीत हसत हसत आलो.,” बाबा,म्हणाले,” नाही बाळा काल रात्री अचानक हा र्ट अ टॅ क आला अन् ती गेली, हॉस्पिटल मध्ये सुद्धा नेता आले नाही. क्षणात सगळे संपले. तुझा फोन सारखा स्विच ऑफ लागत होता. जाईपर्यंत तुझी खूप आठवण काढत होती.

” प्रिया धावतच लीफ्टकडे गेली क्षणात ती खाली उतरून पाहते तो ड्रायव्हर गाडी वळवून निघून गेला होता. प्रिया दिग्मुढ होऊन जाणाऱ्या टॅक्सी कडे पहातच राहिली. हा मला झालेला आईचा भास होता की आई खरच…………आणि आई म्हणाली होती ” जर अपत्यावर निस्सीम प्रेम असेल तर भेटायला येऊ शकते.” प्रिया स्वतःशीच पुटपुटत होती. योगेश सराफ (लेखणी वेडा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *