परक्या स्त्रीकडे कधीही वाईट नजरेने बघू नका- जीवनभर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल…

परकी स्त्री हिंदू धर्मात पूजनीय असते., जिला देवीचे रूप मानले जाते. श्रुति, शास्त्र व पुराण यामध्ये स्त्रीला एक विशेष दर्जा प्राप्त आहे. अथर्व वेदातील एक श्लोक आहे” यत्र नार्यास्तू पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता: , यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:!! याचा अर्थ ज्या कुळामध्ये नारीची म्हणजेच स्त्रीची पूजा केली जाते, त्या कुळातील देवता सदैव प्रसन्न राहातात, व त्या कुळात दिव्यगुण, दिव्यभोग व उत्तम संतान प्राप्त होतात व ज्या कुळात स्त्रियांची पुजा होत नाही, तिथे सगळी कामे निष्फळ होतात.

हिंदू धर्मामध्ये स्त्रीला देवी, माता, मुलगी, पत्नीचे स्वरूप मानले गेले आहे. पण आज आपला समाज आणि आपली संस्कृतीमुळे कोठे न कोठेतरी स्त्रियांच्या प्रती असलेला सन्मान कमी होतो आहे. लोक आपल्या आईला अपमानित करतात, पत्नीला मारझोड करतात व मुलीचे हक्क तिच्याकडून हिसकावून घेतात.

असे म्हटले जाते, की जर तुम्ही कधी स्त्रीचा सन्मान केला नाही, तर तुमचे हे जीवन नरकासारखेच आहे. इतिहास साक्ष आहे, जेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचार झाला, तेव्हा समाज, संस्कृती व देशाची प्रगती किंवा देशाचा विकास झाला नाही. असे म्हटले जाते, की प्रत्येक व्यक्तीच्या सफलतेमागे कोणत्याही स्त्रीचा हात असतो, मग ती आई असुदे, मुलगी असुदे किंवा पत्नी प्रेयसी असुदे. हिंदू धर्म ग्रंथानुसार, स्त्रिया दोन प्रकारच्या असतात, ज्यांचा सन्मान केला पाहिजे.

जर कोणी या स्त्रियांचा सन्मान केला नाही, व नेहमीच या स्त्रियांवर वाईट नजरेने बघितले तर त्यांचे जीवन हे नेहमी रोगांनी, असफलतेने व दुखा:ने भरून जाईल. आज (८ मार्च) विश्व आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या दिवशी तुम्हाला य दोन महिलांच्याबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे नेहमीच सन्मानपूर्वक बघितले पाहिजे.

यांची मदत करायला मागे हटु नका. जसे की हिंदू धर्मामध्ये स्त्री हे देवीचे रूप मानले गेले आहे. हिंदू धर्मानुसार परक्या स्त्रीकडे कधी वाईट नजरेने बघू नका. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. धर्मानुसार ज्या कोणी स्त्रियांना हानी पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना वाईट परिणाम भोगावे लागले आहेत. पुराणात एक गोष्ट खूप प्रचलित आहे. गोष्टीनुसार कम्भा राक्षसाला भगवान शिवांचे वरदान प्राप्त झाले होते.

ज्यामुळे त्याने इंद्रदेवाचा पराभव करून त्यांचे सिंहासन हिसकावून घेतले. ह्यामुळे हैराण होऊन इंद्रदेव दत्तात्रयांकडे गेले व राक्षस कम्भाला आपल्याकडे बोलावले. जेव्हा राक्षस तिथे पोहोचला, तेव्हा देवी लक्ष्मी तिथे विराजमान होती. राक्षस कम्भा हा मोहित झाला व त्याने देवी लक्ष्मीला कैद केले.

त्यानंतर भगवान विष्णु यांनी इंद्रदेवांना आदेश देताना सांगितले, की देवी लक्ष्मीला परत आणा. त्यादरम्यान राक्षसाने त्याला भगवान शिवांकडून मिळालेल्या वरदानाबद्दल सांगितले. राक्षसाला उत्तर देताना भगवान विष्णुमी म्हणाले, परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणारा व्यक्ति पापाचा धनी होतो.

ज्याप्रमाणे परस्त्रीवर नजर ठेवणारा व्यक्ति पापाचा धनी होतो, त्याचप्रमाणे विधवा स्त्रीवर वाईट नजर ठेवणारा व्यक्ति पापाचा भागीदार होतो. म्हणून लक्षात ठेवा कधीही विधवा स्त्रीवर वाईट नजर ठेवू नका., जे तुमच्यासाठी खूपच अशुभ असणार आहे. त्यांचा नेहमी सन्मान केला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *