पपईच्या पानांचा वापर करण्यापूर्वी जाणून घ्या काही जरूरी गोष्टी…

नमस्कार मित्रांनो. पपईच्या पानांचा वापर करण्यापूर्वी जाणून घ्या काही जरूरी गोष्टी. हो मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर पपईच्या पानांविषयी माहिती शेअर करणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपल्याला फक्त पपई नाही तर त्याच्या पानांचे सेवन जरूर केले पाहिजे. पपईची पाने खूपच फायदेशीर आहेत व त्याचे अनेक चमत्कारी गुणधर्म आहेत. ती केवळ आपल्याला गर्मीपासून संरक्षण देत नाहीत तर ती आपल्याला अनेक भयंकर आजारांपासून वाचवितात. जर आमची माहिती तुम्हाला आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

पपईची पाने म्हणजे गुणांचे भांडार आहे. ही पाने आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवितात. आजारांशी लढायची ताकद आपल्या शरीरात येते जेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ति मजबूत असते. आपले शरीर आतमधून स्वस्थ व मजबूत राहाणे खूप जरूरी आहे. पपई, त्याची पाने, बिया सगळेच उपयोगी आहे. पपईपेक्षा गुणकारी त्याची पाने असतात. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ति वाढवते. सगळ्यात गंभीर असे आजार, म्हणजे डेंग्यु, मलेरिया, चिकन गुनीया यामध्ये पपईच्या पानांचा रस खूपच फायदेशीर आहे.

कशा प्रकारे याचा वापर करायचा आहे ते मी तुम्हाला २ ते ३ प्रकारे सांगेन. तुम्हाला जो सोपा वाटेल, तो उपाय तुम्ही करू शकता. डेंग्यु, मलेरिया, चिकन गुनीया यामध्ये आपल्या शरीरातील लाल पेशी (प्लेटलेट्स) कमी होतात. तेव्हा डेंग्यु, मलेरिया, चिकन गुनीया याच्या पानांचा रस आजाराशी सामना करतोच पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील प्लेटलेट्स वाढवितो. त्यावेळी रोज २ चमचे रस पिण्याचा डॉक्टर तुम्हाला सल्ला देतात. एवढेच नाही, तर पपईच्या पानांचा रस रक्ताच्या गुठळया बनण्यापासून थांबवतो.

आपल्या लिव्हरला खराब होण्यापासून वाचवतो पपईच्या पानांचा रस. डेंग्यु, मलेरिया, चिकन गुनीया यामध्ये पपईच्या पानांचा रस खूपच फायदेशीर आहे. तसेच पपईच्या पानांचा चहा बनवून तुम्ही पिऊ शकता. कॅन्सरपेशी बनण्यापासून थांबवितो पपईच्या पानांचा रस. कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरच्या पेशी बनण्यापासून हा रस थांबवतो. मासिक पाळीच्या वेळी जो त्रास होतो, जसे की पोट, कंबर दुखणे, जास्त रक्तस्त्राव होणे यावर पपईच्या पानांच्या रसाचा फायदा होतो. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ह्याचा रस उपयोगी आहे.

कोणताही जंतुसंसर्ग होत नाही, बद्धकोष्टता होत नाही जर पपईच्या पानांच्या रसाचे नियमित सेवन केले तर. पोटाशी संबंधित सगळ्या समस्या दूर करतो पपईच्या पानांचा रस. वजन कमी करण्यासाठी जसे पपईचे सेवन जरूर आहे, त्याप्रमाणेच, पपईची पाने फायदेशीर आहेत. याची पाने वाटून त्याची पेस्ट जर चेहर्‍यावर लावली, तर मुरूमे, डाग नाहीसे होतात. भूक लागत नसेल, तर पपईच्या पानांचा रस खूपच फायदेमंद आहे. या पानांमध्ये ५० क्रियाशील असे तत्व असतात ज्यामुळे बॅक्टीरिया, फंगस, कॅन्सर यांना समाप्त करण्यास मदत करतात.

पपईच्या पानांचा रस हे एक रामबाण औषध आहे. तुम्हाला इथे घ्यायची आहेत पपईची नाजुक लहान पाने. ताजा रस काढून घ्यायचा आहे. खलबत्त्यात कुटून त्याचा रस काढू शकता. सकाळी रिकाम्या पोटी २ चमचे रस घ्या. वजन कमी करतो, बद्धकोष्टता समाप्त होते. साधे पाणी तुम्ही वरती पिऊ शकता. पपईच्या पानांचा रस कोणत्याही वरदांनापेक्षा कमी नाही. पपई तुम्हाला सहज मिळू शकते व त्याची पाने पण मिळू शकतात. अगणित फायदे असलेली पपईची पाने जरूर वापरुन बघा. ही माहिती आवडली तर जरूर शेअर व लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *