Thursday, September 29
Shadow

पती विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर पत्नी अनुष्काने एक शेअर केली भावनिक पोस्ट, धोनीचीही काढली आठवण…

बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचा पती आणि भारताचे माजी कर्णधार विराट कोहली याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर माजी दिग्गज खेळाडू, विकेटकीप्पर, फलंदाज महेंद्रसिंग धोनीनंतर कोहलीला कर्णधार बनवण्यापर्यंत काय कौ संभाषण झाले होते हे देखील अनुष्का शर्माने सांगितले आहे.

तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत अनुष्का शर्माने लिहिले की, “मला 2014 मधील तो दिवस आठवतो, जेव्हा तुम्ही मला सांगितले की मला कर्णधार बनवण्यात आले आहे..! कारण एमएस धोनी यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला आठवतंय MS, तुम्ही आणि मी, आपण तिघांनी त्या दिवशीखूप गप्पा मारल्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला चिडवतात ते असे देखील बोलले होते की तुमची दाढी किती लवकर ग्रे होऊ लागली. यावर आम्ही सगळे खूप हसलो.”

नंतर ती म्हणाली की, “मी त्या दिवसापासून तुमच्यात दाढी ग्रे होणे व त्या व्यतिरिक्त अनेक बदल घडलेले पाहिले आहेत. मी तुमच्यामध्ये खूप ग्रोथ पाहिली आहे, आणि हो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुमच्यामध्ये होणारी ग्रोथ व तुमच्या नेतृत्वाखालील संघाच्या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे. परंतु तुम्ही स्वतःमध्ये जी ग्रोथ निर्माण केली त्याबद्दल मला अधिक अभिमान आहे.

उल्लेखनीय बाब आहे की, विराट कोहली पहिल्यांदाच 2014 मध्ये कसोटी कर्णधार बनले होते. जेव्हा माजी अनुभवी विकेटकीप्पर, फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS धोनी) यांनी 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी कर्णधारपदावरून निवृत्त झाले होते. ज्यानंतर कोहलीच्या हाती नेतृत्व सोपवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.