नारळाच्या सालांचा वापर जाणून घ्याल तर ती कधीच फेकून देणार नाही, म्हणाल पूर्वीच का नाही सांगितले…

नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन माहिती घेऊन आले आहे. चला तर मग बघूया काय आहे ती माहिती. मित्रांनो, आज मी तुम्हाला नारळाच्या सालांचा म्हणजेच शेंड्यांचा खूपच अनोखा उपयोग सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण नारळ सोलून साले वेगळी करून घेऊया. नारळ आपण खाण्यासाठी उपयोगात घेऊया. त्याच्या चांगल्या चांगल्या पाककृती आपण तयार करूया. ही जी साले आहेत, त्याचा आज मी तुम्हाला एक अनोखा उपयोग सांगणार आहे. सगळी साले वेगवेगळी करून घेऊया, जो कडक भाग आहे तो वेगळा ठेवा. त्याचा वेगळा उपयोग मी सांगणार आहे.

साले जी नरम म्हणजेच मऊ आहेत ती मी कात्रीच्या मदतीने छोट्या तुकड्यात कापणार आहे. नारळाच्या या ज्या शेंड्या असतात त्या खूपच फायदेशीर असतात. त्याचे अनेक उपयोग आहेत. मूळव्याधीसारख्या आजारामध्ये नारळाच्या सालाना जर थोड्या प्रमाणात जाळून त्याची जी राख निघते ती दहयात घालून किंवा ताकात घालून एक आठवडा घेतली तर मूळव्याधीत फायदा होतो आराम पडतो. नारळ आपल्याकडे आणले जातात, खाण्यासाठी तसेच पूजेसाठी सुद्धा. मंदिरात गेल्यावर पण तुम्हाला तिथे नारळाची साले मोठ्या प्रमाणात मिळू शकतात.

पहिला उपयोग तर मी तुम्हाला सांगितला की मूळव्याधीसारख्या भयंकर आजारावर ह्याची राख ताकात किंवा दहयात घालून घेणे. १०० टक्के फायदा होतो. मी आता ही साले बारीक कापून घेतली आहेत. मिक्सरवर मी ही साले ग्राइंड करणार आहे. कडक भाग मी वेगळा ठेवला आहे. नाहीतर मिक्सर खराब होईल. १ ते २ वेळा मिक्सर फिरवल्यावर पाऊडर होते. वरती जो चोथा आला आहे तो वेगळा करून घ्या. हलक्या हाताने चोथा वेगळा काढून घ्या. तुम्ही विचार केला नसेल की हे किती उपयोगी आहेत.

तुम्हाला बागकामाची आवड असेल, तर त्यासाठी खूपच उपयोगी आहेत नारळाची साले. आपण आता यात घालणार आहोत थोडेसे पाणी. मी किती घातले आहे ते बघा. सगळे चांगले मिक्स करून घेणे व त्याचे गोळे बनवायचे आहेत. त्याला म्हणतात “कोको पेट” जो बागकामासाठी सगळ्यात जास्त प्रमाणात उपयोगी येतो. बाजारात हे खूपच महाग मिळते. तर आज मी तुम्हाला हे घरी करून दाखवते आहे जे बाहेर खूपच महाग मिळते. जर तुम्ही हे तुमच्या कुंडीतील मातीत मिसळले, तर माती पौष्टिक बनेल.

जर तुम्ही कुठे बाहेरगावी जात असाल ५ ते ६ दिवसांसाठी व कुंडीत पाणी देऊ शकत नसाल, तर हे जे नारळाचे कोकोपेट आपण बनविले आहे ते जर कुंडीच्या मातीत मिसळले, तर माती कोरडी होणार नाही, कारण हे खूप कालावधीसाठी ओलसरपणा आपल्यामध्ये टिकवून ठेवते. तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *