नशीबवान लोकांनाच मिळते ही जडीबुटी, संजीवनी बुटी पण यापुढे अयशस्वी आहे, पृथ्वीवरील जणू अमृतच, कोठे मिळाले तर सोडू नका…

नमस्कार मित्रांनो,

आपल्या जवळपास खूप अशा वनस्पति असतात ज्या आपण रोज रस्त्याच्या कडेला, नदी नाले यांच्या आसपास बघत असतो. पण यांचे अद्धभूत व औषधी गुणधर्म आपल्याला माहीत नसतात. आपल्याला असेच वाटत असते की या वनस्पति निरोपयोगी व नुसतेच गवत असेल ज्याचा काहीही उपयोग नाही म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.

परंतु, मित्रांनो आम्ही या माहितीमध्ये तुम्हाला एका अशा वनस्पतिबद्दल जी तुम्हाला नेहमी रस्त्याच्या कडेला दिसून येते. मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक खूपच सुंदर व सगळीकडे आढळणारे एक सुंदर झाड. आज आपण बोलणार आहे “घाणेरी” बद्दल. याला इंग्लिशमध्ये “लंटांना कमारा” या नावाने ओळखले जाते. याला आपल्या भारतात कितीतरी नावाने ओळखले जाते. जसे की गोतीकारी, रायमुनिया आदि जर तुम्ही त्याचे वेगळे नाव जाणत असाल, तर आम्हाला कमेन्ट करून जरूर सांगा.

या वनस्पतीला एक उग्र असा वास असतो, त्यामुळे गाई, म्हशी किंवा गुरे ही वनस्पति खात नाहीत. पण यावर येणारी फुले विविध रंगाची असतात जसे की लाल, गुलाबी, पिवळी तसेच लाल व गुलाबी रंग एकत्र अशी विविध रंगाची फुले असल्यामुळे या वनस्पतिवर फुलपाखरे व मधमाशा मात्र कायम दिसतात. याची फळे करवंदासारखी दिसतात पण किंचित लहान असतात व रसरशीत व आंबटगोड असल्यामुळे ती पक्षी खातात.

ही फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर काळी होतात. ही फळे आपण अधिक प्रमाणात खाणे हानिकारक ठरू शकते. ही फळे जास्त आपण खाल्ली, तर अस्वस्थ वाटणे, रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, मळमळ होणे यापैकी काही होऊ शकते. मित्रांनो, या वनस्पतीचे खूप सारे फायदे आहेत. जर कोणत्याही व्यक्तिला जखम किंवा घाव झाला असेल व तो ठीक होत नसेल, तर याची पाने वाटून जखमेवर लावल्यामुळे जखम ठीक होते. कारण ही पाने अॅंटी-सेप्टिक म्हणून काम करतात.

जर कोणाला सर्दी, खोकला ही समस्या असेल, वारंवार जर सर्दी होत असेल, तर याच्या पानांचा काढा बनवून सेवन केल्यामुळे सर्दी खोकल्यात आराम मिळतो. आदिवासी लोक आवर्जून हा चहा करतात. बरेच लोक याच्या पाने वापरुन तयार झालेल्या चहाचे सेवन करतात. ज्यामुळे शरीरात स्फूर्ति येते. जर डोकेदुखी ही समस्या असेल, तर याची पाने चुरुन त्याचा वास घेतल्यामुळे डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.

जर तुमच्या जवळपास कुठेही पाणी जमा झाले असेल व इतके जास्त प्रमाणात असेल, की ते तुम्ही साफ करू शकत नसाल व त्या पाण्याचा दुर्गंध जास्त प्रमाणात सगळीकडे पसरला असेल, त्यात डासांची अंडी असतील, तर अशावेळी, यांची पाने वाटून पाण्यात टाकल्याने मलेरियाचे डास, अळ्या मरून जातात तसेच पाण्यातून येणारा दुर्गंध नाहीसा होतो.

त्याचबरोबर तुमच्या जवळपास खूप डास झाले आहेत, ते तुम्हाला चावत आहेत व तुम्हाला त्यांना पळवून लावायचे आहे, तर याची पाने तुम्ही उन्हात वाळवा व ती आपल्या घरात जाळा, तुम्ही बघाल, पुष्कळ प्रमाणात डास पळून जातील. आता घाणेरीचे औषधी गुणधर्म बघूया. मूळव्याध या आजारावर घाणेरीचा काढा घेतल्यास आराम पडतो. त्याचबरोबर जर मलेरिया असेल, संधिवात असेल, पोटदुखी लकवा असेल, तर याचा काढा बनवून घेतल्यामुळे आराम मिळतो.

ही वनस्पति बहूपयोगी आहे. मित्रांनो, याचे खूप सारे फायदे आम्ही तुम्हाला सांगितले, तुम्हाला ते आवडले असतील, तर माहितीला लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *