इथे आम्ही तुम्हाला दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अशा काही सेलेब्रिटी जोडप्यांबद्दल सांगणार आहोत जे आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. बॉलीवूड इंडस्ट्रीप्रमाणे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांचे लग्न जास्त कालावधीसाठी टिकू शकले नाही. इथे आम्ही तुम्हाला दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अशा काही जोड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या जोडीदारापासून वेगळे होण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते.
१. सामंथा रूथ प्रभू- नागा चैतन्य- टोलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडीपैकी एक म्हणजे सामंथा आणि नागा चैतन्य हे फिल्म “ये माया चेसावे” याच्या चित्रीकरणादरम्यान भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले. चैतन्य आणि सामंथा यांनी ६-७ ऑक्टोबर २०१७ मध्ये गोव्यामध्ये डेस्टीनेशन वेड्डींग केले होते. दोघांनी लग्न केले. साधारण साडेतीन वर्षाच्या वैवाहिक जीवनांनंतर त्यांच्या लग्नात अडचण असल्याच्या बातम्या ठळकपणे येऊ लागल्या. नंतर त्यांनी २ ऑक्टोबर, २०२१ मध्ये इंस्टाग्रामवर आपण वेगळे होणार असल्याची बातमी दिली.
२. धंनुष-ऐश्वर्या रजनीकांत- खूप कमी कालावधीत दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये आपली जागा निर्माण करणारा अभिनेता धंनुषची भेट ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. त्यांचे लग्न रजनीकांत यांच्या घरी १८ नोव्हेंबर २००४ मध्ये झाले. यांना २ मुलगे आहेत, यात्रा राजा व लिंगा राजा अशी त्यांची नावे आहेत. लग्नाला १८ वर्षे झाल्यावर धंनुष व ऐश्वर्या रजनीकांत यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. १७ जानेवरी २०२२ला आपल्या सोशल मीडियावर त्यांनी एका पोस्टद्वारे वेगळे होण्याची घोषणा केली आहे. आम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी वेळ देऊ इछितो. आमच्या निर्णयाचा सन्मान करा.
३. सौंदर्या रजनीकांत- अश्विनकुमार- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची दुसरी मुलगी सौंदर्या हिने २०१० मध्ये अश्विनकुमार यांच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगा आहे ज्याचे नाव वेद आहे. त्यानंतर सौंदर्या हिने २०१९ मध्ये अभिनेता विशगन वनंगमुडी यांच्याशी लग्न केले आहे.
४. नागार्जुन-लक्ष्मी दग्गुबत्ती- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन यांनी १९८४ मध्ये प्रसिद्ध तेलगू प्रोड्यूसर डॉक्टर डी. रामनायडू यांची मुलगी लक्ष्मी दग्गुबत्ती हिच्याशी विवाह केला होता. १९८६ मध्ये त्यांना मुलगा झाला त्याचे नाव चैतन्य. दोघांनी ६ वर्षाच्या वैवाहिक जीवनांनंतर १९९० मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ८०च्या दशकात नागार्जुन यांनी अमाला हिच्याबरोबर कितीतरी फिल्म्स मध्ये काम केले. दोघांमध्ये प्रेम जमले व १९९२ मध्ये दोघांनी लग्न केले.
५. पवन कल्याण-नंदिनी-रेणु देसाई- पवन कल्याण यांनी आतापर्यंत ३ लग्ने केली आहेत. १९९७ मध्ये त्यांनी नंदिनीशी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसात ते वेगळे झाले. त्याचवेळी पवन यांचे रेणु देसाई हिच्याबरोबर प्रेमसंबंध होते. २००४ मध्ये त्यांनी बराच काळ डेटिंग केल्यावर माहिती दिली की ते एका मुलाचे आई-वडील बनले आहेत. ३ वर्षांनंतर त्यांनी २००७ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
६. प्रभूदेवा-रामलता – प्रभुदेवा यांनी आपली पहिली पत्नी व क्लासिकल डांसर रामलता यांच्याशी १९९५ मध्ये प्रेम-विवाह केला. त्यांना लग्नानंतर ३ मुलगे झाले. २०११ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. ७. प्रकाश राज-ललिता कुमारी- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध व्हिलन प्रकाश राज यांनी २ लग्ने केली. पहिले लग्न अभिनेत्री ललिता कुमारी यांच्याशी १९९४ मध्ये झाले. त्यांना २ मुली व १ मुलगा आहे. २००९ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. नंतर २०१० मध्ये त्यांनी कोरिओग्राफर पोनि यांच्याशी लग्न केले.
८. अरविंद स्वामी- गायत्री राममूर्ती- अरविंद स्वामी यांनी २ लग्ने केली. पहिले लग्न गायत्री हिच्याशी १९९४ मध्ये झाले, त्यांना २ मुले आहेत. अभिनेत्याने घटस्पोटानंतर २०१२ मध्ये अपर्णा मुखर्जीशी लग्न केले. ९. अमाला पॉल-एएल विजय – दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अभिनेत्री अमाला पॉल हिने फिल्म निर्माता एएल विजय यांच्याशी जुन २०१४ मध्ये लग्न केले. २०१६ मध्ये दोघे वेगळे झाले. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.