दिसताच तोडून आणा ही फुले फायदे इतके की तुम्हाला आश्चर्य वाटेल, सांधेदुखी पोटाचे, स्त्रीचे आजार गायब…

नमस्कार मित्रांनो पावसाळ्यामध्ये अनेक आयुर्वेदिक वनस्पती उगवत असतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे. पावसाळ्यामध्ये काही आयुर्वेदिक वनस्पती उगवतात. काही वनस्पती ह्या आपण अवश्य खाल्या पाहिजेत. विशेषता ही वनस्पती जी आहे ती पावसाळ्यात सर्वत्र उपलब्ध होते.

या वनस्पतीची भाजी करून खाल्ली जाते पुरुष असेल किंवा स्त्री, ही भाजी जननेंद्रियाच्या समस्यासाठी किंवा सांधे दुखीवरील सूज घालवण्यासाठी किंवा सांधे दुखी घालवण्यासाठी ह्या भाजीच्या अत्यंत फायदा होतो. ही भाजी ज्या ठिकाणी डोंगर आहे त्या ठिकाणी सहज उपलब्ध होते.

शिवाय ही आता आपल्याला शोधायला जाण्याची गरज सुद्धा नाही. अनेक लोक बाजरामध्ये सुद्धा ही भाजी विकायला आणतात. तुम्हाला जर ही भाजी दिसली तर तुम्ही नक्कीच तिचा वापर करा. अत्यंत उपयुक्त आणि शरीरासाठी एकदम चांगली ही भाजी आहे. ह्या भाजीला ” मोहोर ” अस नाव आहे. ह्या भाजीला ग्रामीण भागात खूप नावे आहेत, मोहर ,शेंडवेल, मांदा, चाईचा मोहर, शेंदूरवेल, येलेरगडू, असे या भाजीला म्हणतात .

या भाजीचे शास्त्रीय नाव आहे ‘डायोस्कोरिया पेंटाफिला’असे आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाची ही मोहोरवेल वनस्पती आहे. महाराष्ट्रातील सर्व जंगलांमध्ये ही वनस्पती आढळते. प्रामुख्याने कोकणात आणि पश्चिम घाटात मुबलक प्रमाणात आढळते. मोहोर वेलीला खाली जमिनीमध्ये मोठा कंद असतो व वर ही वेळ असते. याच्या कवळ्या वेलाची ही भाजी बनवतात.

पावसाळा संपल्यानंतर ही वेल पूर्णपणे वाळून जाते. या वेलीला जी बारीक फुले येतेत ते फुले खूप चविष्ट असतात. त्यांची भाजी बनवली जाते. ही भाजी खाल्ल्यामुळे स्त्री किंवा पुरूष यांच्या जननेंद्रियाच्या ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे बऱ्या होतात व पोटामधील कोटा व्यवस्थितरीत्या साफ होतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सांधे दुखी मुळे अंगावरती जी सूज असेल ती घालवण्यासाठी ही अत्यंत महत्वाची आहे.

ही भाजी बनवायची कशी आहे तर ही मोहोर वेल वनस्पती मिळतील तेथुन आणायची आहेत आणि याची जी बारीक फुले आहेत ते आपल्याला काढून घ्यायची आहेत, त्या नंतर आपल्याला ही बारीक फुले स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. थोडासा कांदा, लसूण घ्यायचा आहे आणि आपण साधी भाजी ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने ह्याला फोडणी देऊन ही भाजी आपल्याला बनवायची आहे. ही भाजी मिळाली तर नक्कीच खा अत्यंत महत्वाची ही भाजी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *