तोंड येणे, जिभेवर फोड उठणे 1 मिनिटात आराम घरगुती उपाय…

नमस्कार मित्रांनो

आयुष्यात एकदा तरी आपल्याला त्वचेशी संबंधित आजार होत असतात. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अशा समस्या उदभवणे सामान्य आहे. जिभेवर फोड येणे हेदेखील या मोसमातएक सामान्य समस्या आहे. जिभेवर फोड आल्यानंतर डोक्यात सनक जाईल अशी आग आग आपली होत असते. कधीकधी हे जीभ अल्सर इतके वेदनादायक बनतात की सामान्य अन्न खाणे देखील कठीण होते.

जिभेवर फोड येणे हे अनेक कारणांनी होऊ शकते. शरीरात उष्णतेची पातळी वाढणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, खाण्यामध्ये खूप गरम पदार्थ खाणे, जास्त मसालेयुक्त अन्नपदार्थ खाणे, अन्न चघळताना कोणत्याही प्रकारची दुखापत इत्यादींमुळे जिभेला फोड आल्यास तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता.

सामान्यतः बहुतेक जीभेचे अल्सर काही दिवसात स्वतःच बरे होतात. पण जर तसे होत नसेल किंवा तुम्हाला त्वरीत आराम हवा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. हे घरगुती उपचार खूप सोपे आणि स्वस्त आहेत. त्यांचेही कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

हळद सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी फारच उपयोगी मानली जाते. हात कापल्यास किंवा शरीराला कुठेही जखम होऊन रक्तस्त्राव होत असल्यास आपण ही औषधी हळदच वापरतो. हळदीमध्ये मध किंवा दुध मिसळून ते तोंडातील जखमेवर किंवा फोडांवर लावा. काही वेळ हे असंच ठेवून थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने चूळ भरा.

बेकिंग सोडा : प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात हमखास आढळतो तो बेकिंग सोडा(खायचा सोडा). जर जिभेच्या अल्सरमुळे त्रास होत असेल तर अर्धा कप पाणी घ्या आणि त्यात एक छोटा चमचा बेकिंग सोडा घाला. आता या मिश्रणाने जिभेच्या वरचा भाग म्हणजेच आतला भाग स्वच्छ धुवा. हे रोज करा. लवकरच तुम्हाला फोडांपासून सुटका मिळेल.

नारळाचे तेल: कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचे तेल आपण केसांना लावण्यासाठी वापरतो. काही डायट करणारे लोक या तेलाचा अन्न शिवताना देखील वापर करतात. जर आपण जर ते कापसाच्या मदतीने जिभेच्या अल्सरवर लावले तर त्याचा फायदा होतो.

कोरफड: ही एक अद्भुत अशी औषधी वनस्पती आहे. कोरफडीच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म आहेत. जर तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा कोरफडाने तुमची जीभ धुतली तर तुम्ही अल्सरपासून त्वरीत सुटका मिळवू शकता.

मध: मध हे एक गोड पेय आहे. याचा उपयोग अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. बर्‍याच लोकांना ते थेट खाणे देखील आवडते. मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. हे कोणत्याही प्रकारच्या जखमा लवकर भरण्यास मदत करते. अशा परिस्थितीत जर तुम्ही ते जिभेच्या अल्सरवर लावले तर ते खूप फायदेशीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *