Sunday, November 27
Shadow

तूप बनविताना मलईमध्ये एक चिमूठभर टाका ही वस्तु, दुपट्टीपेक्षा जास्त निघेल तूप…

नमस्कार मित्रांनो. शिखास किचन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आले आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही तुपाला उत्तम बनवू इच्छित असाल, दाणेदार तूप बनवायचे असेल व लवकर मलई मधून लोणी काढू इच्छित असाल व लोण्यापासून लवकर तूप बनवू इछित असाल, तर तुम्ही काय करा. मी इथे मलई घेतली आहे. मलई नेहमी फ्रिझरमध्ये साठवून ठेवा. जेव्हा तुम्हाला मलईचे लोणी बनवायचे असेल, तूप बनवायचे आहे, तेव्हा तुम्ही मलई फ्रिझमधून काढून किचन प्लॅटफॉर्मवर ठेवा.

३ ते ४ तास ही विरघळेल व नंतर ते तुम्ही फेटून घ्या. हे फेट्ण्यासाठी तुम्ही मिक्सरच्या जारचा वापर करू शकता, हँड ब्लेंडरचा वापर करा किंवा रवीची मदत घ्या व नाहीतर माझ्यासारखी चमच्याच्या मदतीने तुम्ही मलई फेटू शकता. मलई प्रथम एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. मी मोठी कढई घेतली आहे कारण यामध्येच मी तुम्हाला लोणी व तूप कसे करायचे ते दाखविणार आहे. तुम्ही आपली भांडी खराब होत नाहीत. तुम्हाला केवळ २ ते ३ मिनिटे ही थंड मलई फेटायची आहे. मलई थंड असली पाहिजे. आता तुम्हाला दिसू लागेल की दूध वेगळे होईल व लोणी वेगळे होईल. लोणी तुम्ही एक आठवडा फ्रीज मध्ये ठेवू शकता. आता तुम्ही बघू शकता दूध बाजूला झाले आहे.

आता आपल्याला त्यात साधे पाणी घालायचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला फ्रिजचे थंड पाणी घ्यायचे आहे. आता मोठ्या तारेच्या चाळणीने गाळून घ्या. दूध घट्ट असते
त्यामुळे त्याचे पनीर तयार करू शकता. आता लोणी बाजूला काढून घ्या. हे दूध मी गरम होत ठेवले आहे ते व्हीनेगर घालून मी फाडून त्याचे पनीर बनविणार आहे. आता हे लोणी साठवायचे असेल तर २ ते ३ पाण्यात स्वच्छ धुवून ठेवा. आता तूप कसे करायचे ते बघूया. आता कढई गॅसवर ठेवा. त्यात ते लोणी मंद गॅसवर ठेवा.

मोठी कढई घ्यायची आहे कारण ते उकळू लागले की थोडे वर येते. आता ते सतत ढवळत राहा. आता यामध्ये तुम्हाला चिमुटभर सैंधव मीठ घालायचे आहे. सैंधव मीठ तुम्ही टाकले की लोण्याचे लवकर तूप बनते. एक चिमुट हळद टाकली आहे. मित्रांनो, हळद घातल्यामुळे तुपाला रंग चांगला येतो. तुम्हाला जर उत्तम दाणेदार तूप हवे असेल, तर चिमुट हळद जरूर घाला. ५ ते ६ मिनिटात कढईत तूप सुटू लागेल. तूप टिकण्यासाठी ते जास्त शिजवणे जरूरी आहे. मीठ हे एक प्रीझरव्हेटीव आहे. थंड झाल्यावर बारीक तारेच्या गाळण्याने ते गाळून घ्यायचे आहे. तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.