तुम्ही डॉक्टर आहात का कसाई, डॉक्टरकडे पाहून जेव्हा एक जोडपे म्हणते…पुढे डॉक्टर जे करतात ते पाहून सर्वाचेच होशच उडतात…

डॉक्टरांच्या समोर जोडपं बसलं होतं . ” डॉक्टर , आम्हाला बाळ नकोय ! ” ” तुम्हाला कसं कळलं बाळ आहे म्हणून ? ” डॉक्टरांनी विचारलं . आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो . ” बाळाचे बाबा बोलले . ” अहो , तुमच्या लग्नाला मी आलो होतो आताच वर्ष होत आहे , उलटे चांगले आहे वेळेत होत आहे”

“पहिलेच बाळ त्यात जर मुलगी झाली तर ! म्हणून तर नकोय आम्हाला ” बाळाचे बाबा म्हणाले डॉक्टरांनी, त्या होण्याच्या आई कडे पाहिलं शांत चेह यावर कुठलेच भाव नाही … पण बोलायचे होते. पण पहिली मुलगीच होईल हे कोणी सांगितले आणि मुलगी होईल म्हणू नक्को कि एवढ्या लवकर नको म्हणून हा विचार मनात आला काय ग …. डॉक्टर नि त्या माउलीला विचारले.

त्यावर तिचं उत्तर बाळ हवे आहे पण भीती जर का मुलगीच झाली तर म्हणून … आणि तुम्ही सांगणार नाही म्हणून शेजारील गावात जाऊन सोनोग्राफी सेंटरवर विचारून घेतले. ” मग तिथंच का केलं नाहीत अबॉर्शन ? ” डॉक्टर म्हणाले . ” तिथं सोय नव्हती . त्यांनी दिला होता पत्ता एका डॉक्टरचा . पण त्यांची फी खूपच जास्त वाटली.

मग म्हटलं की तुम्ही ओळखीचे आहात . लाखाऐवजी हजारात काम होईल . ” बाळाचे बाबा निर्विकारपणं बोलले . ” मी काय कसाई वाटलो काय तुम्हाला ? ” डॉक्टर संयम ठेवत पुढे म्हणाले , डॉक्टर काही बोलत नाहीत हे बघून मुलीचे बाबा म्हणाले, ” फी व्यवस्थित देउ आम्ही. शिवाय ही बातमी कुठेही लीक होणार नाही याची खात्री ! ” डॉक्टरांचे डोळे आता लकाकले.

होणार्या बाळाच्या आईबाबांना ते म्हणाले , ” तुमचा विचार पक्का आहे ? तुम्हाला खरंच बाळ नको आहेत ? परत विचार करा . ” “ पक्का आहे विचार. बाळ तर हवे पण ती मुलगी म्हणून नक्को ” मुलीचे बाबा म्हणाले , ” ठीक आहे तर मग ” असे म्हणत डॉक्टरांनी टेबलवरची सुरी उचलून त्या बाईच्या गळ्याला लावली . आणी अचानकच असे झाल्यामुळे त्या मोठ्यांदा किंचाळली , ” थांबा डॉक्टर .. काय करताय ? … तुम्ही डॉक्टर आहात का कसाई ? “

का कशाला थांबा , एकदा ह्यांनाच खतम करतो , म्हणजे पुढचे प्रश्नच उभे राहणार नाही , बाळं नको , मग त्यात मुलगी झाली तर मग हि पण मुलगीच आहे , हिलाच पहिला करतो खतम..डॉक्टर रागाच्या भरात त्या माणसाला सांगतात अहो डॉक्टर थांबा नका असे करू अहो मी लग्न केले आहे तिच्याशी ..बाळ हवेच होते म्हणून तर इतके दिवस त्याला वाढवले, पण कळले कि आत होणारे बाळ मुलगी आहे ..आम्हाला हवे आहे, पण घरातील लोकांना नक्को आहे.

असे सांगत तो माणूस रडायला लागला .. डॉक्टर मग सांगून टाक घरच्यांना मुलगी नाही, मग माझी बायको पण मुलगी होती म्हणून तिला पण. नको डॉक्टर थांबा आली चूक लक्ष्यात मी समजाविन घरच्यांना आणि हे बाळ पण वाढविण भले काहीही होऊदे असे म्हणत पाया पडू लागतो ..” आम्हाला माफ करा डॉक्टर. आम्ही कसाई व्हायला निघालो होतो. आमची चूक आम्हाला कळली. ” असे तीहात जोडून सांगू लागते .. ( डॉक्टर तिच्या गळ्यावरील सुरी काढून ) माफ कर पोरी मला असे काही करायचे नव्हते , पण तसे करायला तुम्ही भाग पडलेत म्हणून .. कळले का आता तरी ..

खरच प्रत्येकाने हाच विचार करायला पाहिजे , जे होईल ते आपले स्वताचे असते त्यात भेदभाव नक्को , लग्नाला हवी बाई पण ती मुल म्हणून नाही , अश्यानी लग्नाला कोणी मुलगीच राहणार नाही , तुम्ही डोळे उघडलेत आमचे. ते जोडपं म्हणाले आणि निघायला लागतात तोच डॉक्टर ” आणखी एक सांगायचं राहिलं …

आमच्या व्यवसायात देखिल काही राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत हे दुर्दैव आहे. पण ते ईतक्या नीच थराला गेले आहेत की, मुलाचा गर्भ दिसला , तरी पैशासाठी तो मुलीचा आहे म्हणून सांगतात ! ” …. आता मात्र त्या जोडप्यांची पायाखालची जमिनच सरकली !!!

लेख- वास्तविक आहे की काल्पनिक आहे या पेक्षा सद्यकाळातील जोडप्यांसाठी किती महत्वाचा आहे हे बघणे गरजेचे आहे… मित्रांनो लेख आवडला असेल तर आवर्जुन शेयर करू शकता…फोटो  फोटो प्रतिकात्मक आहे. लेखक : आशिष फाटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *