तीळ आणि मस्सापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग…

नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे, यात मी तुम्हाला तीळ आणि चामखीळ कशी काढायची हे सांगणार आहे. यासाठी खूप सोपा उपाय आहे.जर चेहऱ्यावर एखादा तीळ किंवा चामखीळ असेल तर त्याला आपण ब्युटीस्पॉट म्हणतो, पण जर ते जास्त प्रमाणात असतील तर त्याचा त्रास होतो. तर यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण घेणार आहोत कोणतीही टूथपेस्ट फक्त जेल असणारी पेस्ट घ्यायची नाही. पांढरी पेस्ट घ्यायची आहे, इथे मी कोलगेट टूथपेस्ट घेतली आहे.

जितकी आपण रोज ब्रशवर लावतो तितकीच टूथपेस्ट घ्यायची आहे, पेस्ट तीळ आणि चामखीळ घालवण्यासाठी उपयोगी आहे. टूथपेस्ट आणि एरंडेल तेल घ्यायचे आहे, हे तेल कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळेल. एरंडेल तेल हे खूप उपयोगी आहे, तीळ आणि चामखीळला हळूहळू मुळापासून काढून टाकते , आणि तिथून ते गेल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचे डाग पडू देत नाही. जेव्हा कधी हा उपाय करायचा असेल तेव्हा तो ताजा बनवून करण्याचा आहे , ही पेस्ट आधीपासूनच तयार करून ठेऊ नये. आता आपण घेतलेल्या टूथपेस्टमध्ये अर्धा चमचा एरंडेल तेल घालायचे आहे.

हे तेल आपल्या त्वचेसाठी चांगले असते,केसांसाठी चांगले असते, यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. यात तिसरी गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे खायचा सोडा जो की खाण्यासाठी वापरला जातो. फक्त ५ ते १० रुपयात कोणत्याही दुकानात हा सोडा मिळेल. सोडा हा चामखीळला लावला की त्याला सुकवतो आणि गळून जायला मदत करतो, तसेच आपल्या त्वचेची पी एच लेव्हल नीट ठेवतो. यात आता अर्धा छोटा चमचा सोडा घालून मिक्स करून घ्यायचे आहे.

म्हणूनच याला आधीपासूनच तयार करून ठेवायचे नाही आहे, ही पेस्ट तयार झाल्यानंतर लगेच जिथे जिथे तीळ आणि चामखीळ आज तिथे लावयची आहे ,ज्या आकरात तीळ आणि चामखीळ असेल तशी ती पेस्ट बोटाने किंवा इअरबड ने लावयची आहे.याला कमीत कमी १५ ते २०मिनिटे लावून ठेवण्याचे आहे. हे लावयला कोणतीही अडचण नाहीय , कारण या सगळ्या गोष्टी आपण खाण्यात वापरत असतो त्यामुळे याचे दुष्परिणाम नाहीत. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर सुरुवातीला थोडस मुंगी चावल्यासारखे होऊ शकते, थोडीशी जळजळ होऊ शकते.

पण ही गोष्ट अगदीच साधी आहे कारण पेस्ट तिथे लावल्यावर ,त्याचा परिणाम दिसणार आणि चामखीळ गळून जायला उपयोग होणार. २० मिनिटे याला ठेवून द्यायचे आहे पाहिजे असेल तर याला कशाने तरी झाकू शकता म्हणजे काम करायला सोपं होईल. यानंतर साध्या पाण्याने याला धुवायचे आहे, एका आठवड्यात ३ ते४ वेळा याचा उपयोग नक्की करा, छोटे छोटे तीळ आणि चामखीळ पहिल्या एक दोन प्रयोगातच कमी होतील. पण जे मोठ्या आहेत किंवा खूप जुन्या आहेत त्यासाठी हा प्रयोग पुन्हा पुन्हा करावा लागेल.

ही पेस्ट लावल्यावर त्याला तुम्ही क्लिंग रॅप किंवा कोणत्याही प्लॅस्टिक पिशवीने झाकू शकता ,त्याने तुम्हाला काम करणे सोपे जाईल , आणि ही पेस्ट कपडे किंवा इतर ठिकाणी लागणार नाही.आणि पेस्टसुद्धा त्या जागेवर चिटकून राहील. त्याचा योग्य तो फायदा मिळेल. रोज नवीन पेस्ट तयार करून लावयची आहे .आठवड्यातुन ३ ते ४वेळा लावयचे आहे, जर तीळ आणि चामखीळ जुनी असेल तर ती जायला जरा जास्त वेळ लागू शकतो. २० मिनिटे झाल्यावर धुवायचे आहे. माहिती आवडली तर लाइक नक्की करा, आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *