तळपायाची जळजळ तळहाताची आग, फक्त 5 मिनिटात कमी करणारा उपाय…

नमस्कार मित्रांनो…

तळपायाची जळजळ फक्त पाच मिनिटांत कमी करण्याचा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो पावसाळ्यात सर्वांनाच तळ पायाची आणि तळ हाताची जळजळ जाणवत असते. आणि ही जळजळ तुम्हाला रोज जाणवत असेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. अनेक वेळा तळपायाची जळजळ इतकी जाणवते की रात्रभर झोप लागत नाही, आणि सर्व कामाचे नियोजन अस्ताविस्त होऊन जाते.

वास्तविक पायाच्या नसा कमजोर झाल्यावर ही समस्या प्रामुख्याने उद्भवते. याशिवाय विटामिन बी 12,कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिडची शरीरात कमतरता असल्यावर ही जळजळ जाणवते. किडलीनीतील बिगाड , काही औषधांची ऍलर्जी , ज्यास्त धूम्रपान यामुळे देखील तळपाय व तळ हाताला जळजळ होते. तुम्ही जर अश्या समस्या ने त्रस्त असाल तर आजचा हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा.

आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम लागणार आहे एक”अद्रक”. अद्रक मध्ये रक्ताभिसरण क्रीया सुरळीत करण्याची आणि त्वच्या अंतर्गत नसा उत्तेजित करण्याची क्षमता असते. आजच्या उपायांसाठी आपण अद्रकची पेस्ट वापरणार आहोत. आपण आपल्या तळपायाच्या हिशोबाने ही पेस्ट वापरायची आहे.

साधारण एक चमचा ही अद्रक पेस्ट एक वाटीमध्ये घ्यायची आहे. तसेच आपल्याला दुसरा घटक लागणार आहे खोबरेल तेल , तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असणारे कोणतेही खोबरेल तेल घेऊ शकता. नारळाचे तेल ही तळपायांना होणारी जळजळ थांबवते. आपण ह्या मध्ये एक चमचा खोबरेल तेल या प्रमाणे वापरणार आहोत .

आता एक चमचा अद्रक पेस्ट आणि एक चमचा खोबरेल तेल हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या , ही पेस्ट तळपायाला वापरण्यापूर्वी पाय व हात स्वच्छ धुवून घ्या, आणि नंतर ही पेस्ट हाताच्या बोटांनी तळपायांना लावा आणि दोन ते तीन मिनिटे मसाज करा. हा उपाय शक्यतो रात्री झोपताना करावा तुम्हाला पाच ते सहा मिनिटांतच पायाला थंडावा जाणवू लागेल. मित्रांनो हा झाला उपाय

मित्रांनो तुम्ही जर सकाळी- सकाळी दव पडलेल्या गवतावर अनवाणी चालायचा व्यायाम केला, तर तुम्हाला तळपायाची जळजळ कधीच जाणवणार नाही. सोबतच शरीरात व्हिटॅमिन डी ची पूर्तता करणारे अन्न पदार्थ जसे अंड्यातील पिवळा बलक , मटण , मासे ,मशरूम , सोयाबीन यांचा समावेश करावा तुमची तळपायाची जळजळ कायमची नष्ट होईल.

मित्रानो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा…आणि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून नक्की कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *