ड्रमस्टिक म्हणजेच शेवग्याच्या शेंगांचे आहेत ‘हे’ फायदे; माहित झाल्यावर व्हाल चकित…

भारतात अनेक भाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. भाज्यांमधून आपल्या प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्वे आदी शरीरासाठी लागणारे आवश्यक घटक मिळतात. ड्रमस्टिकची म्हणजेच शेवग्याच्या शेंगाची भाजी आरोग्यासाठी वरदान मानली जाते. आपण शेवग्याची भाजी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करू शकतो.

शेवग्याच्या एक शेंगाचा प्रकार आहे जो भारतीय स्वयंपाक घरात भाजी म्हणून वापरला जातो. शेवग्याच्या फक्त मुळांचा आणि देठांचाच वापर केला जात नाही तर पानांचा देखील वापर केला जातो. शरीरासाठी लागणारी आवश्यक जीवनसत्वे आपल्याला शेवग्याच्या पानांमधून मिळतात. मोरिंगा म्हणजेच ड्रमस्टिकच्या झाडाची पाने, फळे, मुळे, साल, बिया, शेंगा आणि फुले यांचे अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आरोग्यास अनेक प्रकारे फायदा करतात.

पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी शेवगा खूप फायदेशीर आहे, कॉलरा, कावीळ, पेच, कोलायटिसच्या बाबतीत तुम्ही त्याच्या पानांचा रस काढून त्यात एक चमचा मध आणि नारळाचे पाणी मिसळा याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. तसेच ज्या लोकांना बद्धकोष्ठता, सूज येणे, गॅस, जठराची सूज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास होतो, त्यांनी आपल्या आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश केल्यास आराम मिळतो.

शेवग्याचा आहारात नियमितपणे सेवन करणे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी फायदेशीर आहे. शेवग्याच्या गुणधर्मांमुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. एवढंच नाही तर शरीरातील साखर नियंत्रणांत ठेवण्यासाठी देखील शेवग्याची पाने आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे.

ज्या लोकांना क्षयरोग आहे त्यांच्यासाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. शेवग्याची पाने क्षयरोगविरोधी औषधांचा नकारात्मक प्रभाव कमी करू शकतात. तसेच शेवग्याच्या पानांमुळे यकृत पेशींच्या दुरुस्तीस गती मिळते. शेवग्याच्या पानांमध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असल्याने ते यकृतला ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवू शकते.

सर्दी झाल्यानतंर जेव्हा नाक बंद होते तेव्हा शेवग्याच्या पानांची वाफ घेणे फायदेशीर आहे. शेवग्याच्या पानांना उकळून त्या पाण्याची वाफ घेतल्याने बंद नाक उघडते आणि छातीचा घट्टपणा कमी होतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण कोणत्याही दुखापतीमुळे किंवा संसर्गामुळे ग्रस्त होतो, तेव्हा शरीरात जळजळ होण्याचे प्रमाण वाढते. शेवग्याच्या सेवनाने याला आराम मिळतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *