डोळ्याची दृष्टी इतकी तेज होईल की आयुष्यभर चष्मा लावायची जरूर पडणार नाही, जाणून घ्या उपाय…

नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या खूपच उपयोगाचा आहे. जर
सांधेदुखी असेल, अंग दुखत असेल, किंवा डोळ्याची दृष्टी खूप कमजोर असेल तर ही माहिती जरूर बघा. मी आज खूपच रामबाण उपाय घेऊन आले आहे. खास करून मुलांमध्ये अभ्यासामुळे डोळ्यावर खूप जास्त ताण येतो, व हळू हळू डोळ्याची दृष्टी थोडी कमी होऊ लागते. डोळ्याची दृष्टी वाढेल, स्मरणशक्ति वाढेल, तेज होईल या उपायामुळे.

मी इथे घेतली आहे बडीशेप. बडीशेप तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे किती फायदेशीर आहे. आपले पचन सुधारते, आपला तणाव कमी करते, आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढवते. कितीतरी वेळा आपल्याला भूक लागत नाही, पण आपण थोडीशी बडीशेप जर खाल्ली तर ती आपली भूक वाढवते. पचन चांगले असेल, तर भूक लागते. आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवते, आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते बडीशेप. बडीशेपमध्ये असते कॅल्शियम,
मैग्ंनेशियम, फोस्फोरस, व सांधेदुखीपासून आपल्याला आराम देते बडीशेपेचे सेवन. बडीशेपेबरोबर आपण नेहमीच पाहिले असेल की आपण खडीसाखर खातो.

हॉटेलमध्ये पण बडीशेप बरोबर खडीसाखर देण्याची पद्धत आहे. खडीसाखर व बडीशेप जेव्हा एकमेकांबरोबर खाल्ली जाते, त्यामुळे आपले पचन चांगले होते. आपण जे काही खातो ते चांगल्या रीतीने पचते. खडीसाखरेची प्रकृती थंड असते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात खडीसाखरेचे सेवन जरूर केले पाहिजे. ज्यांना अनीमिया असेल, हिमोग्लोबिन कमी असेल, त्यांनी खडीसाखर खाल्ली पाहिजे. रक्ताची कमतरता कमी करते खडीसाखरेचे सेवन. उन्हाळ्यात आपल्या हातापायाची खूप आग होते, पायाचे तळवे हाताचे तळवे यामध्ये आग होते, तेव्हा खडीसाखरेचे सेवन जरूर केले पाहिजे.

पण धागा असलेली खडीसाखर यासाठी उत्तम असते. मी इथे तीच खडीसाखर घेतली आहे. ती मी थोडीशी कुटून घेतली आहे, छोटे तुकडे करायचे आहेत, ही खडीसाखर शुद्ध असते. आता तिसरी व शेवटची वस्तु म्हणजे बदाम. बदाम प्राचीन काळापासून लोक सेवन करत आली आहेत. ३ ते ४ पाण्यात भिजवलेले बदाम रोज जरूर सेवन करा व लोक करत होते. तेव्हा डोळ्यांच्या तक्रारी नव्हत्या. चष्मे लागत नव्हते. आता मुलांना लवकर चष्मे लागत आहेत. म्हणून आपण काही घरगुती उपाय करूया.

तुम्हाला आयुष्यात चष्मा लावायची जरूर पडणार नाही. त्याचबरोबर हाडांमध्ये मजबूती येईल., शरीरात स्फूर्ति राहील व स्मरणशक्ति तेज राहील. पाण्यात भिजवलेले बदाम जास्त पौष्टिक असतात. त्याचे गुण जास्त प्रमाणात वाढतात जेव्हा आपण ते पाण्यात भिजून खातो. आपली रोगप्रतिकारशक्ति बदाम वाढवतो. आपले हृदय, डोके, हाडे मजबूत करते बदामाचे सेवन. शरीराला शक्तिशाली बनावते. आर्यन कॅल्शियम, मिनेरल्स व विटामीन असल्यामुळे शरीरासाठी खूप पौष्टिक असतो बदाम. मी इथे घेतली आहे १ चमचा बडीशेप, १ मोठा तुकडा खडीसाखर (बारीक केलेली), त्यात बदाम घालून त्याची जाडसर पाऊडर घाला. बदाम पाण्यात भिजलेले घ्या ते जास्त गुणकारी असतात.

बडीशेप, बदाम, खडीसाखर हे तुमच्या शरीराला मजबूत बनवतील. आपल्याला विसरायचि सवय असते ते कमी होऊन, स्मरणशक्ति वाढेल. आता ही पाऊडर १ ग्लास दुधात घालून ते दूध गरम करून
घ्यायचे आहे. सकाळी घेऊ शकता. नाश्ता करताना पण घेऊ शकता. दुधात घालून प्यायचे आहे व बडीशेप, बदाम चावून खायचे आहे. साखर घालायची जरूर नाही, चष्मा लवकरच उतरेल. आमची माहिती आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर करा. माहिती आवडली असेल तर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *