टाच दुखी रात्रीत बंद, दबलेला सर्व नसा मोकळ्या, शरीरातील वाढलेला वात, सांदेदुखी कमी…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी असा उपाय घेऊन आलो आहोत ज्याने तुम्हाला असलेली कसलीही ग्रंथसी वात, वाताचा कोणताही प्रकार असो, सोबतच सांध्यामधील कमी झालेल वंगण असेल ते वाढवण्यासाठी, याचबरोबर सांध्यामध्ये कटकट येणारा आवाज, हातापायाला येणाऱ्या मुंग्या, पायाला वारंवार येणारी सूज, यासोबत उठता बसता कंबरेमध्ये दुखणे, गुडघ्यांना सूज असणे, सकाळी उठल्याबरोबर भयंकर टाचदुःखीचा त्रास असणे, हे सर्व आज बरे होतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन वनस्पती लागणार आहेत. चला तर पाहुयात हा उपाय…

मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे पारिजातक. हा उपाय करण्यासाठी आपण पारिजातकाची पाने आणायची आहेत आणि ती घरात सुखवायची आहेत. वाळवून घ्यायची आहेत. मित्रांनो हे पान अत्यंत उपयुक्त असते. या पानाने प्रतिकारशक्ती वाढते, केस गळती थांबते, मासिकपाळी संबंधीत समस्या कमी होते, याचबरोबर सांधेदुखी कमी होण्यास ही पारिजातक वनस्पती रामबाण मानली जाते.

जी आपण पारिजातकाची पाने वाळवलेली आहेत ती एकदम बारीक कुटून घ्यायची आहे. बारीक कुटून घेतल्यानंतर ते आपण गाळणीच्या सहाय्याने त्याची फक्त पावडर घ्यायची आहे. असे हे एकदम बारीक केलेले चूर्ण आपल्याला एक चमचा लागणार आहे.  पुढची वनस्पती आपल्याला लागणार आहे ती म्हणजे शेवगा… सर्वात जास्त  कॅल्शियम असणाऱ्या दोनच वनस्पती आहेत त्यातील एक म्हणजे पारिजातक आणि दुसरी म्हणजे शेवगा. शेवगा हाडांसाठी वरदान आहे.

सांध्यातील झालेली झीज, सांध्यातील कमी झालेला वंगण वाढवण्यासाठी ही वनस्पती उपाय कारक ठरते. तसेच ज्यांचे वजन वाढले आहे, चरबी ज्यास्त झाली आहे, तर त्यांची चरबी जळण्यासाठी शेवग्याच सूप त्या व्यक्तीला दिले जाते. म्हणून अश्या या उपायासाठी आपल्याला लागणार आहे शेवग्याचा पाला.. शेवग्याचा पाला आपल्याला वाळवून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे आपण पारिजातकाचे चूर्ण घेतले आहे त्याच प्रकारे आपण शेवग्याचे चूर्ण करून घ्यायचे आहे.

एक चमचा आपल्याला हे चूर्ण लागणार आहे. अश्या या दोन वनस्पती चे चूर्ण घेतल्यानंतर आपल्याला पुढली वनस्पती लागणार आहे ती म्हणजे निर्गुंडी.. आयुर्वेदामध्ये निर्गुंडी वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना सतत सूज येते त्यानी हा पाला गरम करून त्या ठिकाणी बांधल्यास सूज कमी येते. आपल्याला ही पाने सावलीमध्ये सुखवून घ्यायची आहेत. वाळवून घ्यायची आहेत. याच देखील चूर्ण करायचं आहे आणि हे चूर्ण आपण घ्यायचं आहे. एक चमचा चूर्ण आपण घ्यायचं आहे. आणि ते चूर्ण पारिजातक चूर्ण आणि शेवग्याच्या चूर्ण मध्ये मिक्स करायचे आहे.

असे हे तीनही पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहे. चांगल्या प्रकारे एकजीव करा हे मिश्रण आणि हे एकजीव झालेलं चूर्ण आपण एक ग्राम घ्यायचे आहे आणि त्या मध्ये आपल्याला आणखी एक घटक लागणार आहे तो म्हणजे मध…अर्धा चमचा मध आपल्याला घ्यायचा आहे. हे मिश्रण चांगल्याप्रकारे एकजीव करा. असे हे एकजीव केलेले मिश्रण सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर आपल्याला प्राशन करायचे आहे. हा उपाय आपल्याला पंधरा दिवस करायचा आहे. असा हा उपाय केल्याने आपल्या सर्व समस्या निघून जातील. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *