टाच दुखी रात्रीत बंद, दबलेला सर्व नसा मोकळ्या, शरीरातील वाढलेला वात, गुडघेदुखी गायब…

नमस्कार मित्रांनो…

सकाळी उठल्यावर शरीराचा भार टाचेवर येताच टाच दुखणे, गुडघ्यावर ताण येतो ज्याद्वारे गुडघे दुखतात तसेच शरीरात वात वाढून स्नायूंना सूज येते ठराविक भागावर आग, ठणक, वेदना होत असतील तसेच काही व्यक्तींना मान ताठणे, हातापायांना मुंग्या येणे, पोटरी दुखणे, पाठदुखीचा त्रास वारंवार होणे, मणक्यात गॅप आहे. या सर्व ठिकाणचे दुखणे लगेच कमी करणारा आजचा उपाय खुप जुना आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाच्या वनस्पतीचा आहे.

टाचदुखी याला वैद्यकीय भाषेत प्लँटर फेशिआयटीस म्हणतात. साधारणतः चाळीशी ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये टाचदुखी होत असते. मात्र आता कोणत्याही वयात टाचदुखी होत आहे. याची कारणे वेगवेगळी आहेत. या कारणांमध्ये पाहिले कारण आहे स्थूलता. म्हणजे आपल्या शरीरातील वाढलेलं वजन ज्यामुळे तळव्यांच्या स्नायूंवरती दाब पडून इजा होते.

खुप वेदना होतात, टाचदुखीचा त्रास जाणवतो. दुसरे कारण आहे तळव्याचे हाड वाढणे. क्वचितच काही व्यक्तींच्या बाबतीत असे तळव्याचे हाड वाढलेले पाहायला मिळते. यामध्ये दुखण्याच्या वेदना खुप अधिक असतात. टाचदुखीचे तिसरे कारण आहे अधिक वेळ चालणे किंवा अधिक वेळ उभे राहणे ज्यामुळे मित्रांनो आपल्या तळव्यातील स्नायूंवर ताण पडतो व त्यातून पायांचे दुखणे सुरू होते.

तसेच सतत उभे राहिल्यामुळे किंवा चालल्यामुळे तळव्याच्या पेशींना विश्रांती मिळत नाही. म्हणून टाच, पाय दुखतात, पोटरी दुखते, पायांची आग होते असे जाणवते. पुढचे कारण आहे उंच टाचांच्या चपला घालणे. या प्रकरात टाच आणि पायांचा चवडा यामध्ये अंतर राहते. यामुळे चवडा आणि टाचांच्या मधील वक्राकार भागात कळ येते.

अशा चपला फार वेळ घातल्याने पायांना सूजही येऊ शकते. म्हणून नेहमी चप्पल सपाट आणि आरामदायी असावी असं सांगितलं जातं. शेवटचं कारण आहे ते म्हणजे जीवनसत्व E चा अभाव. स्नायूंची चांगली वाढ होण्यासाठी टॉनिक म्हणून जीवनसत्व E काम करते. E जीवनसत्व पुरेसे आपल्या शरीरात उपलब्ध नाही झालं तर कसे गळतीही होते.

जर शरीरास हे कमी प्रमाणात मिळाले तर शरीरातील स्नायूंची वाढ पुरेशा प्रमाणात होत नाही. म्हणून आहारात E जीवनसत्व पदार्थांचा समावेश करायला हवा. E जीवनसत्व भरपूर असणारे पदार्थ दूध, लोणी, अंडी, सोयाबीन धान्य इत्यादी पदार्थांत भरपूर प्रमाणात E जीवनसत्व असते. अशा या कारणांमुळे सांधेदुखी, टाच, पाय पोटरी दुखते.

या सर्व वेदना कमी करण्यासाठी पहिला उपाय सकाळी उठल्यावर घेण्यासाठी तो म्हणजे निर्गुंडी किंवा निर्गुंडीचा पाला, पारिजातकची पाने आणि शेवग्याचा पाला या तीनही वनस्पतीची पाने सावलीत सुखवा. त्याचे वेगवेगळे चूर्ण करा. प्रत्येकी एक एक चमचा घ्या त्यातील फक्त दोन ग्रॅम चूर्ण एक चमचा मध टाकून सकाळी उठल्याबरोबर याचे चाटण करा.

सात दिवसात तुम्हाला असणाऱ्या वेदना कमी झालेल्या पाहायला मिळतील. बाह्यस्वरूपात करायचा उपाय यासाठी निर्गुडीचे पाने सावलीत वाळवून ठेवा किंवा तुम्हाला मिळत असतील फ्रेश पाने वापरू शकता. वाळलेल्या पानाचे जे साहित्य असेल त्या मदतीने बारीक चूर्ण करा. आपण पाणी गरम करायला ठेवतो याच पाण्यामध्ये एक ते दीड चमचा चूर्ण टाकायचे आहे.

पाणी चांगल्याप्रकरे उकळून घ्यायचे आहे. उकळून घेल्यानंतर या निर्गुंडीच्या पानामधील असणाऱ्या तेलाचा वरती तवंग येईल. ते गरम झालेलं तेल सहन होईल असं हे पाणी आहे या पाण्यामध्ये आपली टाच बुडवायची आहे. असे हे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस केल्याने टाचदुखीचा त्रास सोबतच वातही कमी होण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो.

गुडघ्यालाही या पाण्याचा शेक देऊ शकता किंवा या निर्गुंडीच्या पाल्याचा संध्याकाळी झोपताना किंवा कंबर दुखत असेल कमरेवरती जर बांधला आणि रात्रभर तसच ठेवलं आणि सकाळी उठल्याबरोबर तेथील सूज कमी होते, वेदना कमी होतात आणि तुम्हाला सकाळी पाय एकदम रिलॅक्स वाटेल. असा हा उपाय पाच ते सात दिवस करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *