टाच दुखी रात्रीत बंद, दबलेला सर्व नसा मोकळ्या, शरीराच्या वातामुळे वाढलेल्या वेदना कमी होतील…

सकाळी उठल्याबरोबर काही व्यक्ती पहिला पाय जमिनीवर टाकताच त्या व्यक्तीला असंख्य अशा वेदना होतात, त्या व्यक्तीला चालताही येत नाही. अशा या भयंकर टाचदुखीच्या वेदना ज्या व्यक्तीला असतील त्या व्यक्तींसाठी त्यासोबत बऱ्याच व्यक्तींच्या शरीरात वात वाढण्यामुळे या समस्या जाणवतात.

बऱ्याच माता भगिनींना डिलिव्हरीच्या काळामध्ये योग्य काळजी न घेतल्यामुळे शरीरातील वात वाढतो. योग्य काळजी न घेतल्यामुळे वात वाढण्याची शक्यता असते. अशी ही वाढलेली वात आटोक्यात आणण्यासाठी यासोबतच सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत बरेच व्यक्ती काम करतात. काम करत असताना बऱ्याच व्यक्ती थकतात, अशक्तपणा, थकवा, कमजोरी येते.

अशा व्यक्ती संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर त्यांच्या पोटऱ्याला आग येते, काही व्यक्तीच्या तळपायाला आग येते. असगी ही येणारी आग, दबलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्या तळपायावरती साधारणतः अडतीस प्रकारचे ऍक्युप्रेशर पॉईंट्स आहेत.

ज्यावेळेस हा उपाय कराल त्यावेळेस तुम्हाला तळपाय दाबून घ्यायचे आहेत किंवा हा उपाय केल्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी झोपताना जर मोहरीच्या तेलाने अभ्यंग केले, म्हणजे आपल्या तळपायाला झोपण्यापूर्वी तुम्ही जर मोहरीचे तेल लावले, त्याने जर जर ऍक्युप्रेशर चांगल्याप्रकारे पाय चोळून घेतला तर त्या व्यक्तीची स्मरणशक्ती वाढते, डोळ्याच्या समस्या कमी होतात यासोबत त्या व्यक्तीला चांगल्याप्रकारे झोप लागते.

दिवसभराचा थकवा काही मिनिटांमध्ये निघून जातो हे ही तुम्ही करू शकता. यासोबतच हे जे अभ्यंग आहे, हे जे मॉलिश करतात साधारणतः आयुर्वेदामध्ये असा नियम आहे की जेवणानंतर साधारण तीन तासानंतर अभ्यंग, मॉलिश करायला हवे. बऱ्याच व्यक्तीला घरामध्ये काम करत असताना अचानक कमरेमध्ये चमक निघते किंवा बऱ्याच व्यक्तिंच्या पाठीमध्ये चमक निघते.

ज्या व्यक्तीची मान आखडली जाते, ही समस्या कमी करण्यासाठी घरात सहज उपलब्ध होणारे लिंबु वापरू शकता किंवा अचानक तुमच्या शरीरावर वेदना होतात तुम्ही हे जे लिंबू आहे कापून घ्या. कापून घेतल्यानंतर हे लिंबु त्या ठिकाणी लावा. काही मिनिटातच तुम्हाला रिलीफ मिळेल. यानंतर ज्या व्यक्तींचे पाय, पोटऱ्या, पायाची आग होते, टाच दुखते अशा व्यक्तींसाठी आजचा उपाय आहे.

या उपायासाठी आपल्याला लागणार आहे तुरटी. या तुरटीच्या मदतीने हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी साधारण 10 ग्रॅमपर्यंतचा एक तुरटीच्या तुकडा लागणार आहे. यानंतर लागणार आहे पाणी. पाणी गरम करायला ठेवायचे आहे. गरम केलेलं पाणी आपल्याला लागणार आहे. ज्या वेळेस तुमचे जेवण होईल, जेवण झाल्यानंतर साधारण एक ते दोन तासांच्या नंतर झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे.

गरम केलेले पाणी घ्या आणि यामध्ये ही तुरटी टाका. त्यानंतर पाणी जास्त जर गरम असेल तर त्याचवेळेस टाच दुखत असेल, टाचदुखीच्या वेदना होत असतील त्या व्यक्तीने ती टाच त्यामध्ये बुडवा. त्या टाचेला गरम प्रकारचा शेक मिळेल. म्हणजेच त्या ठिकाणी ती वात आहे ती कमी होण्यासाठी फायदा होईल आणि टाचदुखीचा त्रास कमी होईल.

जर तुमचे पाय दुखत असतील, गुडघ्याला सूज असेल पोटरी दुखत असेल तर यावरती हे पाणी टाकल्याने अत्यंत फायदा होतो. ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे, पायाची आग होते अशा व्यक्तींनी मेहंदी लावल्याने त्या व्यक्तींच्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी फायदा होतो. या तुरटीच्या पाण्यामध्ये आपले पाय साधारणतः पंधरा मिनिटं ठेवायचे आहेत.

पंधरा मिनिटांमध्ये पाय खाली वर करत राहा. तुमचा दिवसभराचा जो थकवा आहे तो थकवा पूर्णतः कमी होतो. ज्या व्यक्तींना मांसपेशी आखडण्याचा त्रास असेल त्या व्यक्तींसाठी याचा फायदा होतो. मांसपेशी आकुंचन पावल्या असतील तरीही याचा फायदा होतो. तसेच शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्यावर जर हे तुरटीचे पाण्याने शेक द्या. तुम्हाला खुप बरे वाटेल. असा हा साधा उपाय तुम्ही सहज करू शकता. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *