झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू, चेहऱ्यावरील खड्डे गायब होऊन चमकेल चेहरा…

बहुतेक लोकांच्या चेहर्‍यावर आपल्याला खड्डे दिसतात. असे यामुळे होते, त्यांच्या त्वचेच्या रोम छिद्रांचा आकार मोठा असतो, ज्यामुळे त्यांचा चेहरा कुरूप दिसू लागतो. काय, ही तुमची तर समस्या नाही ना? यामुळे आपली त्वचा सैल, निस्तेज आणि निर्जीव दिसू शकते. तसेच, मोकळे रोम छिद्र मुरुम आणि ब्लॅकहेड्स सारख्या समस्यांना आमंत्रित करतात. जर आपली त्वचा तेलकट असेल तर मोकळे रोम छिद्र आपल्यासाठी एक मोठी समस्या बनू शकते. रोम छिद्र मोठे होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्वचेच्या सिबेकस ग्रंथींमधून जास्त तेलाचे स्त्रवन होणे. हे अतिरिक्त तेल त्वचेची मोकळी छिद्रे बंद करते आणि त्यात घाण आणि काळ्या रंगाचा मळ या छिद्रांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे ती छिद्रे अधिक मोठी दिसायला लागतात.

जास्त वेळासाठी उन्हात राहिल्यामुळे रोम छिद्रांच्या आकारात वाढ होते कारण सूर्याची हानिकारक किरणे त्वचेतील कोलेजन नष्ट करतात, ज्यामुळे त्वचेवरील रोम छिद्रांच्या आतील भिंतीची लवचिकता कमी होते. बाजारात ही रोम छिद्रे बंद करण्यासाठी बरीच उत्पादने आहेत, जे रोम छिद्रे बंद करण्याचा दावा करतात, परंतु त्या उत्पादनात रसायनयुक्त पदार्थांचा वापर केलेला असल्यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होते.

म्हणून, अशी बाजारू उत्पादने खरेदी करण्यापूर्वी आपण काही घरगुती उपचारांचा वापर केला पाहिजे. या उपचारांचा वापर करून, आपल्या चेहर्‍यावरील छिद्रे नैसर्गिकरित्या बंद करता येतील. इथे चेहर्‍यावरील रोम छिद्रे बंद करण्याचे उपाय आम्ही देतो आहोत, ज्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील रोम छिद्रांचा आकार आपण कमी कालावधीत लहान करू शकता.

कृती १: अंड्याचा पांढरा बलक: अंड्याचा पांढरा भाग त्वचेतील जास्तीचे तेल बाहेर खेचून घेतो. हा त्वचेच्या मोठ्या रोम छिद्राना संकुचित करून त्वचेला घट्टपणा आणतो. त्यात एक लिंबाचा रस पिळा. लिंबात जास्त प्रमाणात विटामिन-सी असते. त्याच्या तुरट गुणांनी ते रोम छिद्रांना लहान करते, तसेच त्वचा तजेलदार करते. मिश्रण चांगले फेटा. त्यात ओटचे पीठ घाला. ओटमील किंवा ओट्स त्वचेतील धूळ, घाण, मृत पेशी आणि जास्तीचे तेल काढून टाकण्यास उपयुक्त आहे.अर्धा तास सुकविण्यासाठी सोडा. नंतर हलक्या हातांनी हळू हळू मालिश करा आणि पाण्याने धुवा.

कृती २: बर्फ: बर्फ सूती कपड्यात किंवा टॉवेल मध्ये गुंडाळून वापरा. बर्फ त्वचेच्या स्नायूंमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होण्याला प्रोत्साहित करतो, ज्यामुळे आपली त्वचा निरोगी बनते. तसेच त्वचेची छिद्र लहान करण्यासाठी देखील मदत करतो. आईस ट्रेमधून बर्फाचे काही तुकडे काढा आणि ते सूती कपड्यात किंवा टॉवेलमध्ये लपेटून घ्या. आता ते चेहर्‍यावर हलके फिरवा. हा कपडा एकाच जागी जास्त वेळ ठेवू नका. दोन ते तीन मिनिटे फक्त याचा चेहर्‍यावर वापर करा.

कृती 3: बेकिंग सोडा: बेकिंग सोडा हळुवारपणे त्वचा शुद्ध करते, जास्त तेल, अशुद्धी काढून टाकते आणि छिद्रांचा आकार कमी करते. बेकिंग सोडा त्वचेच्या आतील जंतुंचा नाश करते. बेकिंग सोडा ह्या घरगुती पदार्थाचा उपयोग चेहर्‍यावरील छिद्र बंद करण्यासाठी केला जाऊ शकतो. बेकिंग सोडा त्वचेची पीएच पातळी देखील संतुलित ठेवतो, आणि मुरुमांपासून त्वचा मुक्त करण्यास मदत करतो. बेकिंग सोडा व पाणी एकत्र करा. पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि टॉवेलने पुसून टाका.आता त्वचेला मॉइश्चरायझर लावा.

कृती ४: साखर आणि लिंबू: घरगुती साखर आणि लिंबाचा स्क्रब त्वचा शुद्ध करण्यासाठी अतिशय प्रभावी उपचार आहे. हे त्वचेवरील घाण आणि जास्त तेल काढून टाकते, ज्यामुळे छिद्रांचा आकार कमी होतो. चेहर्‍यावरील छिद्र बंद करण्याचा हा उपाय अगदी सोपा आहे. कृती ५: ऑलिव्ह ऑइल: ऑलिव्ह ऑईल हा व्हिटॅमिन-ई चा चांगला स्रोत आहे, जे त्वचेच्या पेशी तंदुरुस्त करण्यात आणि त्वचेला ओलावा प्रदान करण्यात मदत करते. कृती ६: सफरचंद व्हिनेगर: सफरचंद व्हिनेगरमध्ये तुरटपणाचा गुणधर्म असल्याने ते त्वचा शुद्ध करण्यास मदत करते. तसेच त्वचेच्या छिद्रांमधे असलेले अतिरिक्त तेल आणि काळी घाण देखील काढून टाकते.

कृती ७ : वाफारा घेणे: वाफ घेतल्यामुळे त्वचा स्वछ होते व त्वचेतील रोम छिद्रे मोकळी होतात. कृती ८: मुलतानी माती : मुलतानी माती त्वचेची मोकळी छिद्रे बंद करतात. त्वचा तजेलदार बनवितात. तुमच्यासाठी महत्वाच्या सूचना: बाजारातील उत्पादने खरेदी न करता घरगुती उपाय करा. चेहर्‍यावर साबण लावू नका. झोपेच्या आधी चेहर्‍यावरील मेकअप काढायला विसरू नका. वरील उपाय जरूर वापरुन बघा. यापैकी कोणत्याही एका उपायाचा तुम्ही वापर करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *