ज्या स्त्रियांमध्ये असतात ही लक्षणे त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीमध्ये महिलांबाबतीत काही लक्षणे सांगितली आहेत. हि लक्षणे असणार्या महिला भाग्यशाली असतात. ज्या घरात अशाम्हीला असतात त्या घरात देवि लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात या महिला जातात तिथे सुख-समृद्धी येते. आपल्या धर्मात महिलांना पूजनीय मानले आहे. त्यांना महालक्ष्मीसमान मानतात. तुम्ही जर एखाद्या महिलेचा अपमान करत असाल किवा तीला अपशब्द बोलत असाल तर तो महालक्ष्मीचा अपमान मानतात. चुकुनही महिलांचा अपमान करू नका. चानाक्यनीतीनुसार काही महिला अशा असतात कि ज्यांच्या घरी असल्याने दारिद्रय येते.

काही लक्षणे अशी आहेत कि जी एखाद्य स्त्री मध्ये असल्यास तिला महालक्ष्मीस्वरूप मानले जाते. अशा स्त्रीबरोबर विवाह करणारे पुरुष भाग्यशाली असतात. अशा महिला तेजस्वी मुलांना जन्म देतात जो आपल्या कुळाचे नाव मोठे करतो. ज्या पुरुषांची पत्नी नेहमी गोड बोलते, जिला कधी राग येत नाही आणि जी दुसर्यांचे भले चिंतते अशा महिलेचा पती भाग्यशाली समजला जातो. नेहमी गोड बोलणारया महिलेला देवी लक्ष्मीस्वरूप मानले जाते. अशा महिलांमुळे घरात सुख-समृद्धी येते.

ज्या महिला आपल्या संसारिक जबाबदाऱ्या समजून त्यांना निभावतात त्यांना गृहकृत्यदक्ष म्हणतात. ज्या महिला आळशी असतात त्यांच्या घरी लक्ष्मी येत नाही. ज्या स्त्रीला तरीच पती प्राणापेक्षा प्रिय आहे आणि जी पतीची प्रिया आहे तिला श्रेष्ठ पत्नी मानतात. जी महिला आपल्या पतीसाठी आपले जीवन व्यतीत करते तिला महान समजले जाते. जी महिला आपल्या पती व्यतिरिक्त अन्य पुरुषांत स्वारस्य ठेवते तिला चरित्रहीन समजले जाते.

जी स्त्री पतीशी एकनिष्ठ असते, त्याच्या शिवाय अन्य कोणाचा विचार करत नाही तिला पतिव्रता म्हटले जाते.अशा महिला फारच भाग्यशाली असतात. अशा महिलांवर देवी महालक्ष्मीची सदैव कृपा असते. हि होती काही स्वभावाची लक्षणे आता पाहूया काही शारीरिक लक्षणे. सामुद्रिक शास्त्रात काही शारीरिक लक्षणे सांगितली आहेत. जर एखादी स्त्रीच्या बेंबीखाली तीळ असेल तर ती तिच्या परिवारासाठी भाग्यशाली असते. हे तिच्या सुखी व संपन्न जीवनाचे प्रतिक असते.

लांब मं असलेल्या स्त्रियांना सामुद्रिक शास्त्रात शुभ मानले आहे. लांब मान असलेल्या स्त्रिया वैभवशाली असतात. त्यांच्या पतीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एकाद्या स्त्रीच्या पायाचे छोटे बोट जमिनीला टेकत असेल तर ते शुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रात ज्यांचे पायाचे तळवे गुलाबी व गुळगुळीत असतात त्या स्त्रिया लक्ष्मीसमान असतात.

ज्या स्त्रियांचे कपाळ सपाट व कुंकू लावण्याची जागा थोडी फुगीर असेल, अशा स्त्रिया सौभाग्यवती असतात. ज्या मुली पितृमुखी असतात त्या फारच भाग्यवान असतात. ज्यांना जीवनात हवी असलेली सगळी सुखे मिळतात. याउलट पुरुषाचा चेहरा मातृमुखी असेल तर तो भाग्यवान असतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *