ज्या देवघरात ही 3 कामे होतात श्री लक्ष्मी तेथे 1 दिवसही थांबत नाही…

ओम नमो नारायण. मित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मीने निवास करावा असं जर आपल्याला वाटत असेल, आपल्या घरामध्ये सुख आणि संपत्ती आणि भरपूर पैसा यावा असे जर वाटत असेल, तर आपण दररोज देव पूजा करायला हवी. आणि ही देवपूजा करत असाल आणि तरी सुद्धा आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होत नसेल, आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य राहत असेल, तर याची नेमकी कोणती कारणे आहेत? काही ज्या गोष्टी असतात. ज्या आपण आपल्या देवघराच्या संबंधांमध्ये पाळायला हव्यात.

काही नियम असतात की त्यांचे पालन आपण कटाक्षाने करायला हवे. असे कोणते नियम आहेत, हे आपण पाहणार आहोत. पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जर शिवलिंगाची स्थापना केली असेल, तर अतिशय शुभ गोष्ट आहे. शिवलिंगाची स्थापना जरूर करायला हवी. महादेव यांचा आशीर्वाद आपणास मिळेल. त्यांचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर ही कायम राहील. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एकाच वेळी एकापेक्षा जास्त शिवलिंग, दोन किंवा तीन शिवलिंग आपल्या घरामध्ये आपण चुकूनही स्थापित करू नयेत. त्याचे केवळ नकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबावर होतात. कुटुंबामध्ये शांती अजिबात राहत नाही.

जसं भगवान शिव तांडव नृत्य आहेत, या प्रकारची परिस्थिती आपल्या कुटुंबा मध्ये नक्की उद्भवेल. म्हणूनच एकापेक्षा जास्त शिवलिंग आपण चुकूनही आपल्या घरामध्ये स्थापित करू नये. जर ते असतील तर एका शिवलिंगाचे आपण नदीमध्ये विधीपूर्वक विसर्जन करावं. जर आपल्या जवळपास वाहते पाणी नसेल ,नदी नसेल, तर आपण एखाद्या पिंपळाच्या वृक्षाखाली देखील या शिवलिंगाला ठेवू शकता. आणि त्या ठिकाणी त्याचं विसर्जन होऊ शकते.

मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे गणेश मूर्ती. आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त गणेश मुर्त्या ठेवू नका. जर दोन असतील तर चालू शकेल, काही हरकत नाही. मात्र त्यांचे चेहरे एकमेकांसमोर तोंड करून ठेवू नका. त्यांची तोंडं ही एकमेकांसमोर येणार नाहीत, अशा प्रकारे त्यांची ठेवन करा. मात्र दोन पेक्षा जास्त गणेश मूर्ती असतील तर, मित्रांनो याचे खूप अनिष्ट परिणाम आपल्या कुटुंबावर होऊ शकतात. अशा गणेश मूर्ती, गणेश विसर्जनाच्या वेळी आपण विधिपूर्वक विसर्जित करू शकता. त्यांचे विसर्जन नक्की करा.

मित्रांनो आपण अनेक प्रसंगी तांदूळ आणि अक्षता देव-देवतांना अर्पित करतो. त्यावेळी एक काळजी अवश्य घ्या की, हे तांदुळ किंवा अक्षता अर्पण करताना त्या तुटलेल्या किंवा फुटलेल्या नसाव्यात. याची मात्र काळजी घ्या. अखंड असणारे तांदूळच आपण देव देवतांना अर्पण करावेत .तुटलेल्या अक्षता अर्पण केल्याने त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. महालक्ष्मी अशा घरांमध्ये आपला वास करत नाही. त्या ठिकाणी राहत नाही.

पुढचा नियम म्हणजे तांब्याच्या भांड्याचा वापर करताना त्याच्या मध्ये दूध आणि दही देखील कधी कधी टाकले जाते. मित्रांनो तांब्याचे भांडे हे फक्त आणि फक्त पाण्यासाठी वापरायचे आहे. जर आपण तांब्याच्या भांड्यात दूध आणि दही टाकून ते जर देव देवतांना अर्पण करत असू तर, या दूध आणि दही यांचे रूपांतर हे दारू मध्ये होतं. म्हणजेच अ ल्को हॉ ल. आपण एक प्रकारे देवदेवतांना मदिरायुक्त प्रसाद अर्पण करत आहेत. आणि म्हणूनच तांब्याच्या भांड्यामध्ये कधी दूध आणि दह्याचा वापर करू नये.

मित्रांनो, कधीकधी आपण देवाला दिवा लावताना एकापेक्षा जास्त दिवे लावतो. त्यावेळी वातीला वात लावून हे दिवे लावले जातात. ही अतिशय चुकीची पद्धत आहे. अशाप्रकारे वातीला वात लावून कधीही दिवा आपण पेटवू नये. त्यासाठी प्रत्येक दिवा हा वेगवेगळा प्रज्वलित करायला हवा. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवी. आणि शेवटी मित्रांनो खंडित मूर्ती. आपल्या घरात खंडित मूर्ती असतील तर, ताबडतोब आजच्या आज त्यांचे विसर्जन आपण करा. जर शक्य नसेल तर लवकरात लवकर या मूर्ती विसर्जित कशा करता येतील हे आपण पहा.

कारण खंडित मूर्ती घरात असणं हे, परिवार तुटण्याचं , परिवारामध्ये दरी निर्माण होण्याचं, भावाभावांमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वैरत्व व शत्रू भाव निर्माण होण्याचं कारण ठरू शकते. अशा खंडित मूर्ती ज्या घरामध्ये असतात, माता लक्ष्मी त्या ठिकाणी जास्त काळ वास करत नाही. त्यामुळे लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहात नाही. ज्याप्रमाणे आपण शिवलिंग विसर्जित केले, त्याच पद्धतीने आपण या मुर्त्या विसर्जित करायच्या आहेत. वाहत्या पाण्यात विसर्जित करा.

ते शक्य नसेल तर आपण एखाद्या पिंपळाच्या वृक्षाखाली देखील या मूर्तींचे विसर्जन करू शकता. त्या पिंपळाच्या वृक्षाखाली या मूर्ती ठेवून द्या. विधिपूर्वक त्यांची पूजा करावी व त्यानंतर आपण आपल्या घरी परत येऊ शकता. तर अशा प्रकारच्या काही नियमांचे आपण पालन केले तर, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये राहणे आवडेल. आणि त्याचा कृपाशीर्वाद आपल्याला नक्की लाभेल. यामुळे सुख शांती संपत्ती आपल्याला नक्की प्राप्त होईल.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *