जेव्हा नवरा बायकोला सांगतो, तुला गिऱ्हाईकाखाली झोपावं लागेल- हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट…

लग्नाच्या दिवसापूर्वी मी अगदी एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे आयुष्य जगत होते. शिक्षण पूर्ण झालं होतं. शिक्षिका म्हणून एका शाळेवर टेम्पररी जॉब देखील करत होते. त्यातच वयात आलेली मुलगी वगैरे, वगैरे.. या सगळ्या चर्चा आईच्या कानावर येऊ लागल्या आणि माझं लग्न करून देण्याची घाई तिनं मनावर घेतली.

मला आजही आठवतंय त्याप्रमाणे लग्न अगदी धुमधडाक्यात लावून दिल्यानंतर माझ्या पाठवणीच्या क्षणी मला सर्वांच्या चेहऱ्यावर एका मोठ्या जबाबदारीतून मोकळे झाल्याचा हावभाव सहज टिपायला मिळालं होतं आणि संध्याकाळी मग ते रात्रीचा प्रवास करून सासरी पोहचल्यावर माप ओलांडून माझा अधिकृत गृहप्रवेश झाला.

शिवाय इतर कुठल्याही नवविवाहित मुलीप्रमाणे मी ही त्याक्षणी खुश होते. कारण आयुष्यभर साथ निभावणारा जोडीदार मला मिळाला होता. त्यातही वयात आल्यापासून हवीहवीशी वाटणारी त्या एका मिलनाच्या क्षणाची आतुरता आता अगदी असह्य व्हायला लागली होती. म्हणूनच मग म्हणता म्हणता सर्वच उरकलं, सर्व म्हणजे सर्व. आता ते काही अधिक सांगत नाही.

मात्र एवढ्या दिवसात एक गोष्ट सलत होती की ऐन्य संध्याकाळी माझी सासू आणि नणंद एवढा मेकअप करून जातात तरी कुठे? कदाचित इकडे शहरात संध्याकाळी फिरायला वगैरे असं काहीतरी जायची सवय असेल. म्हणून मी ही त्याप्रकाराकडे कानाडोळा केला. मात्र तरीही माझा नंदावा आणि मिस्टर दिवसभर घरीच असतात मग ते काम करत तर नाहीत का?

मग करतात नेमकं काय? दादा, आईला सांगितलं होतं की बीजनेस वगैरे आहे. तरी अजूनही यांचं माझ्याभोवतीच घुटमळनं तेव्हा मला अगदीच खटकायला लागलं होतं आणि म्हणूनच मग संध्याकाळी कुणी नसताना मी त्यांना तो प्रश्न केला. काय हो, गेली पंधरा दिवस पाहतेय तुम्ही घरीच असताय आणि सासूबाई, ताईसाहेब संध्याकाळ झाली की बाहेर का जातात?

माझ्या त्या प्रश्नानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव बदलणं मला अपेक्षित होतं. तरीही तसं काहीच न झाल्याने माझा संशय वाढला. मला सांगाच हा नक्की काय प्रकार आहे? मी तो प्रश्न विचारल्यावर माझा नवरा अगदी सराईतरित्या हसला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. खरेतर एवढे दिवस हवाहवासा वाटणारा त्याचा स्पर्श त्या एका क्षणी अगदी नकोसा मला जाणवत होता.

तरीही तो पुढे काय बोलणार याकडे लक्ष देण्यासाठी की मी त्याच्या माझ्या खांद्याला गोंजारण्याकडे साफ दुर्लक्ष केले. अगं तुला कळत नाही का आई आणि ताई रात्री धंद्याला जातात. आपलं लग्न होतं म्हणून थोडे दिवस बाहेर जाणं चालू होतं. उद्यापासून पुन्हा सगळं घरीच सुरू होईल. तुला पण परवापासून गिऱ्हाईकासोबत झोपावं लागेल. एकूणच त्याचे शब्द ऐकून मी अगदी सुन्न झाले होते.

अगदी घरंदाज घराण्याची मोठी झालेली मी, माझ्यासाठी हे अनपेक्षित आणि भयावह होतं. दादाने या लोकांची काहीच चौकशी केली नाही. या प्रकाराबद्दल आमच्या कुठल्याच नातेवाईकाला माहिती नव्हती का? या अशा एक ना अनेक प्रश्नांनी डोकं भंडावून सोडतानाच दरवाजातून बाहेर बघत मी तेथून पळ काढला. रात्री आठ वाजता बिना चपलाची तेथून बाहेर पळालेली मी रात्री कशीबशी बारा वाजता आमच्या घरी पोहचले.

खरं सांगायचं तर पुढे तीन महिने त्याच शॉकमध्ये होते म्हणून स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं. नंतर समजलं की सासरच्या लोकांनी त्यांचं पितळ उघडे पडेल म्हणून माझ्याबद्दल नाही नाही त्या अफवा पसरवल्या होत्या. मला कॅरक्टरलेस सिद्ध करण्यासाठी माझ्यावर नको नको ते आरोप केले होते आणि शेवटी मला घरातून का हकलण्यात आलं याची एक पूर्ण स्टोरी पुराव्यानिशी आई दादासमोर सादर करण्यात आली.

तो प्रकार होईन आता दोन वर्षे उलटत आली आहेत. मला त्यातून बाहेर पडायला एक वर्षाचा कालावधी लागला. आता मी पुन्हा शाळेत रुजू झालीये. लोकांच्या, माझ्या काम करणाऱ्या शिक्षकांच्या एवढंच काय तर विद्यार्थ्यांच्याही प्रश्नांना उत्तर देणे आणि त्यांच्या नजरा झेलत आयुष्य पुढे ढकलत राहणं आता नित्याचच झालय.

तुझ्या कथा वाचल्या आणि जाणवलं की जे माझ्यासोबत झालं ते इतर कोणासोबत व्हायला नको म्हणून तुझ्याशी बोलायला हवं किंवा मी जे भोगले ते इतरांच्या वाट्याला यायला नको एवढीच इच्छा आहे. मान्य आहे की माझं लग्न व्हायला हवं होतं, घरच्यांची घाई मी ही समजू शकते मात्र या सर्वात मला अजूनही उमगलं नाही की घडलेल्या प्रकारात नेमकी चूक कोणाची?

मित्रानो लेख आवडला असेल तर आवर्जून शेअर करू शकता. फोटो प्रतिकात्मक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *