जेवण करताना पाणी प्यायल्याने होतात हे आजार जाणल्यावर थक्कच व्हाल….

जेवण करत असताना आपण लहान लहान गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यानंतर याच लहान गोष्टी आपल्यासाठी मोठे संकट ठरू लागते. जेवण करताना जर आपण पाणी प्यायल्याने आपल्याला अनेक आजार होतात त्याचबरोबर पोटाचे अनेक आजार सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. शरीरामध्ये वाढलेला अति लठ्ठपणा हे सुद्धा जेवण करताना पाणी पिण्याचे एक कारण आहे. जर तुम्ही जेवण करत आहात तर अशा वेळी गरज नसताना पाणी पिऊ नये.

तसे पाहायला गेले तर आपल्या शरीराचे जे केंद्र आहे ते पोट आहे. हे आपले पूर्ण शरीर चालवते आणि पोटामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि त्याच बरोबर पोटाला ऊर्जा ही जेवणामुळे प्राप्त होत असते म्हणून जेवण आणि आपले पोट यांचे नाते अतिशय घट्ट आहे म्हणूनच आपण जे काही पदार्थ खातो त्या पदार्थाच्या सहाय्यानेच आपले पोट कार्य करू लागते आणि त्याद्वारे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते.

आपल्या स्वयंपाक घरातील गॅस जेव्हा आपण चालू करतो तेव्हा त्यातून फ्लेम बाहेर पडते त्याच पद्धतीने जेव्हा आपण अन्न पोटा मध्ये टाकतो तेव्हा आपली जठराग्नी सुद्धा चालू होते. या सगळ्या गोष्टी आपोआप सुरू होतात जेव्हा आपण आपल्या अन्नाचा पहिला घास पोटा मध्ये टाकू लागतो तेव्हाच आपल्या शरीरातील जठराग्नी चालू होऊन जाते. हे अग्नी तोपर्यंत चालू असते जोपर्यंत आपले अन्नपचन पूर्णपणे व्यवस्थित होत नाही. आपण अन्न खाल्ले आणि जठराग्नी चालू झाली आणि जठराग्नी चालु झाल्यामुळे आपले अन्न पचन सुद्धा होते.

आता आपण अन्न खाल्ल्यानंतर गटागटा पाणी प्यायल्यावर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. बहुतेक वेळा आपण ठंड पाणी पीत असतो काहि जण तर बॉटल च्या बॉटल पाणी पीत असतात. यामुळे आपल्या शरीरामध्ये जी जठराग्नी चालू असते ती विझून जाते आणि अशावेळी जर आपली जठराग्नी विझून गेली तर पचनाचे कार्य असते ते सुद्धा थांबून जाते. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की अन्न पचले नंतर आपल्या पोटामध्ये दोन क्रिया प्रामुख्याने घडत असतात. एक तर आपले अन्न पचन होते नाही तर दुसरी क्रिया म्हणजे आपले अन्न सडून तरी जाते.

जेवण करते वेळी जर आपण सातत्याने पाणी पितो अशावेळी आपले पोट भरून जाते आणि शरीरामध्ये द्रव्य पदार्थ अधिक प्रमाणात जमा झाल्यामुळे खाल्लेले अन्न पोटामध्ये मावत नाही आणि अशा वेळी भूक लागून सुद्धा आपल्याला अन्न खाण्याची इच्छा होत नाही. अशातच पोटामध्ये अन्नपचन होण्यासाठी काही गॅस्ट्रिक प्रक्रिया होणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

परिणामी आपले अन्न पचत नाही आणि अनेकदा छाती मध्ये जळजळ सुद्धा होऊ लागते. म्हणूनच अनेक तज्ञ मंडळी आपल्याला सल्ला देत असतात की जेवण करण्यापूर्वी कमीत कमी 30 मिनिटे तरी पाणी टाकायला नाही पाहिजे त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटानंतर आपल्याला पाणी द्यायला हवी असे केल्याने आपल्या शरीराचे व पोटाचे संतुलन व्यवस्थित राहते आणि आपली अन्न पचन प्रक्रिया सुद्धा नीट राहण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *