जेवणानंतर याचा १ चमचा खा, रात्री-अपरात्री लघवीला उठावे लागणार नाही…

नमस्कार…

मित्रांनो आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास अशी वारंवार सतत लघवीला येण्याची समस्या उद्भवते. अनेक व्यक्तींना रात्री अपरात्री लघवीला जावे लागते. तसेच अनेक व्यक्तींचा घासा कोरडा पडून तहान देखील लागते. म्हणूनच तुम्ही अश्या समस्यांना त्रस्त झाला असाल तर आजचा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पाहा. तुमची ह्या त्रासापासून नक्कीच सुटका होईल.

मित्रांनो रात्री उपरात्री लघवीला जाण्याच्या या समस्येपासून सुटका करणारा हा आजचा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम लागणार आहे “आवळा पावडर ” आवळ्याला आयुर्वेदामध्ये रसायन संबोधले आहे. म्हणजेच आवळा शरिरातील सक्त धातूंचे पोषण करून ते बलवान बनवतो. आजच्या उपायांसाठी आपण अर्धाचमचा आवळा पावडर घेणार आहोत.

या नंतर चा दुसरा घटक आहे “हळद पावडर ” हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बायोटिक हे गुणधर्म असतात. युरिनरी ट्रक मधील इन्फेक्शन कमी करण्यासाठी हळद ही उपयुक्त असते. आपल्या ह्या उपायासाठी पावचमचा हळद ही घ्यायची आहे. या नंतर तिसरा आणि शेवटचा घटक आहे ” मध “, बहूमूत्रतेची ही समस्या चयापचय क्रियेतील बिघाडामुळेच उद्भवत असते.

घरगुती शुद्ध मध असेन तर ती बिघडलेली क्रिया सुरळीत करते. मध आपण एक चमचा या प्रमाणामध्ये घेत आहोत. आता हे मिश्रण व्यवस्थित पणे मिक्स करून घ्यायचे आहे. मित्रांनो शुद्ध घरगुती असलेला मध डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींनासाठी देखील उपयुक्त असते. फक्त तो शुद्ध मध जुना असावा.

आवळा पावडर तुम्ही तुमच्या सहनशक्ती नुसार, पचनशक्ती नुसार एक चमचा वाढवू अगर कमी करू शकता. हे तिन्ही घटक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला. याचे सेवन सकाळ, संध्याकाळी जेवणा नंतर अर्ध्या तासाने करायचे आहे. दोन ते तीन दिवसानंतर तुमच्या ह्या सतत लघवीला जाण्याच्या त्रासापासून सुटका होईल.

अनेक व्यक्तींना रात्री दूध पिण्याची सवय असते ती सवय पूर्ण पणे बंद करावी. किंवा झोपण्यापूर्वी
तीन तास आधी दुधाचे सेवन करावे. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवणारे अन्न पदार्थ जसे भात आणि दही हे देखील आहारातून टाळावेत.

मित्रांनो आजच्या ह्या उपायाने सतत तहान लागण्याची व सतत लघवीला येण्याची समस्या पूर्ण पणे कमी होते. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *