जेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा पदार्थ खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल! पोटाची चरबी, गॅस बंद..

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना पोट साफ न होणे, अपचन, करपट ढेकर येणे, मूळव्याध, वजन वाढणे, नेहमी थकवा येणे, वारंवार पोटात गॅस होणे, लघवी साफ न होणे, या सर्व समस्या कमी करण्यासाठी घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्था पासून आज आपण उपाय बनवणार आहोत. चला तर उपयाला सुरुवात करूयात.

मित्रांनो सर्व आजारांचे मूळ हे पोट आहे. पोटाच विकारांचे अजून वाढण्यास कारणीभूत ठरते अपचन. आयुर्वेद अस सांगतो की 90% आजार हे अपचनामुळे होतात. हे अपचन मुळापासून जाण्यासाठी आज आपण उपाय पाहणार आहोत.  मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सेंधव मोठं. सेंधव मीठ हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त होते. त्यातल्या त्यात अपचनाच्या सर्व समस्या कमी करण्यासाठी खूपच उपयोगी आहे.

या मध्ये भरपूर प्रमाणात झिंक, लोह, मॅग्नेशियम, तसेच पोटॅशियम हे घटक असतात. ज्या प्रकारे शरीरातील ब्लड प्रेशर स्थीर ठेऊन शरीरातील इलेक्ट्रॉलाईट च संतुलन साधल जात. तसेच ताणतणाव,भूक न लागणे, या समस्या सुद्धा या मिठाने दूर होतात. म्हणून मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेंधव मीठ लागणार आहे.

आपल्याला एक चमचा हे मीठ घ्यायचं आहे. पुढचा पदार्थ लागणार आहे पाणी. त्या एक चमचा मीठा मध्ये एक चमचा पाणी टाकायचे आहे. त्यानंतर हे एकजीव करायचे आहे. चांगल्या प्रकारे हे मिश्रण एकजीव केल्यानंतर पुढचा पदार्थ आपल्याला लागणार आहे ओवा. ओवा हा पोटाच्या विकारावरती रामबाण उपाय आहे.

मित्रांनो या मध्ये असणारे घटक छातीमध्ये असणारा कप, छातीत व पोटात होणारी जळजळ, गॅस, आमलपित्त, हे विकार कमी करण्यासाठी तसेच मित्रांनो घरातील माता बहिणींना पाळी मध्ये रक्त स्त्राव ज्यास्त होतो तो कमी करण्यासाठी तसेच हार्मोन्स पुंन्हा सुरळीत होण्यासाठी हा ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो. म्हणून आपण या साठी आपण ओवा घेणार आहोत. त्या एकजीव केलेल्या मिश्रणात आपल्याला दोन चमचे ओवा टाकायचा आहे.

या नंतर आपल्याला पुढचा पदार्थ लागणार आहे बडीशोप. बडीशोप शरीरातील चरबी कमी करण्यासाठी, अन्न पचनासाठी, अत्यंत लाभदायक असते. म्हणून आपण बडीशोप घेणार आहोत दोन चमचे. तर मित्रांनो असे ही चारही पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण ते तव्यावरती गरम करून घ्यायचे आहे. हे आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. हे चांगले भाजून घेतल्यानंतर ते एका बाउल मध्ये काढून घ्या. हे मिश्रण गरम असतांनाच आपण ते काचेच्या बाटलीत ठेवायचे आहे.

तर मित्रांनो हे काचेत ठेवलेले मिश्रण आपल्याला दररोज जेवणानंतर 15 मिनिटांनी खायचे आहे. हे खाल्या नंतर साधारण 15 मिनिटांनी तुम्ही कोमट पाणी प्या. सकाळी उठल्याबरोबर तुमचे पोट साफ होण्यास अत्यंत उपयोगी ठरते. तसेच इतरही समस्या कमी होतील. हा साधा सरळ उपाय तुम्ही करून पहा नक्की तुम्हाला फरक जाणवेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *