Monday, November 21
Shadow

जुन्यात जुने असे मुरूमाचे डाग, सुरकुत्यांची चिन्ह, शरीरावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा जबरदस्त उपाय…

नमस्कार मित्रांनो. तुमचे परत एकदा स्वागत आहे “रुद्र होम रेमिडीस” मधील हेल्थ आणि ब्युटि टिप्स मध्ये. मित्रांनो, या चॅनलमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो दादीअम्माचे उपाय म्हणजेच घरगुती उपाय. तर आज आम्ही तुमच्यासाठी मुरूमे, त्याने चेहर्यातवर पडणारे डाग, भाजल्यामुळे होणारे डाग, कापल्यामुळे पडणारे डाग किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरील डाग यापासून सुटका करून घेण्यासाठी एक रामबाण उपाय. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय करण्याची पद्धत व त्याचा उपयोग. हा उपाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लागणार आहे नारळ तेल म्हणजेच खोबरेल तेल., कापुर. कापुर जो प्रत्येक घरात पूजेसाठी वापरला जातो.

आता हे बनवायचे कसे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी थोड्या प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवितो आहे. तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता. मी एका काचेच्या बाउल मध्ये २ चमचे नारळ तेल घेतो आहे. आता यामध्ये कापुर किती मिसळायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी दाखवितो आहे तसा कापुर जर तुमच्याकडे असेल, तर तो ३ ग्राम कापुर यामध्ये मिसळायचा आहे. हे १० एमएल नारळ तेल आहे त्यामध्ये मी ३ ग्राम कापुर घातला आहे म्हणजेच ३० टक्के कापुर मिसळला आहे. ३ कापुराच्या गोळ्या आपण यामध्ये मिक्स करूया. हाताने थोडे चुरुन मिक्स करा.

दोन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्या. कापुर हे त्वचेसाठी वरदान आहे. जुन्यात जुना जरी घाव असेल व त्याचा डाग असेल, तरी कापुर तो डाग मिटवितो. हे तयार झाले आहे. आता हे त्वचेवर कसे लावायचे आहे ते मी दाखवितो. त्वचेवर लावण्यासाठी तुम्ही कापसाचा वापर करा. जिथे मुरूमे आहेत, मुरुमांचे डाग आहेत, भाजल्याचे डाग आहेत, कापल्याचे डाग आहेत तिथे हलक्या हाताने २ मिनिट हा कापूस त्या मिश्रणात भिजवून त्याने मालीश करा. मालीश केल्यामुळे तुमच्या त्वचेची जी मृत त्वचा आहे ती निघून जाईल व त्वचा स्वछ होईल. कापुर व नारळ तेल त्वचेमध्ये चांगल्या प्रकारे मुरेल.

याच्या नियमित उपायाने तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. याचा अजून एक उपयोग आहे तो मी तुम्हाला दाखवितो. हे तेल केसांसाठी पण उपयोगी आहे. आपल्या आजीला तुम्ही विचारू शकता की सुंदर केसांसाठी ती काय लावत असे. तर ती तुम्हाला जरूर सांगेल की ती कापुर व नारळ तेल मिक्स करून केसांना मालीश करीत असे. तुमचे केस गळत असतील, रुक्ष होत असतील, तर याचा वापर करा आठवड्यातून ३ वेळा. एक आठवड्यात तुम्हाला फरक दिसून येईल. आमची माहिती आवडली तर जरूर लाइक व शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.