जुन्यात जुना नायटा, खरूज, खाज याला समाप्त करण्यासाठी एक परिणामकारक उपाय…

मित्रांनो तुमचे खूप स्वागत आहे. कितीतरी वेळा आपल्या त्वचेवर खाज, खरूज, नायटा यासारखे त्रास होतात जे सहज ठीक होऊन जातात. पण कितीतरी वेळा याचे उपाय करूनही हे लवकर ठीक होत नाही. आपण महागडी औषधे लावतो, मलम लावतो पण तरी हा आजार मूळापासून नाहीसा होत नाही.

तर या अशा जंतुसंसर्गाला मूळापासून कसे नाहीसे करायचे तसेच या संसर्गामुळे आपल्या त्वचेवर जे डाग पडतात ते कसे मिटवायचे यासाठीचा उपाय आज आम्ही घेऊन आलो आहोत. जंतुसंसर्ग किंवा फंगल इन्फेकशन त्याच जागी होते, जिथे आपल्या शरीराला हवा कमी लागते, घाम जास्त येतो, त्वचा चिकट होते. काही लोकांना मांड्यांजवळ हे इन्फेकशन होते.

खाज येते, आग होते त्यामुळे आपण त्रासून जातो. आज मी जो उपाय सांगणार आहे तो १०० टक्के फायदा करणारा आहे. माझ्या सांगण्यानुसार एकदा जरूर करून बघा नक्की फायदा होईल. मी इथे केळे घेतले आहे व त्याची साल पण घेतली आहे, दोन्ही गोष्टी खूप फायदेशीर आहेत., खरूज, खाज व नायटा यांना नाहीसे करण्यासाठी.

हे फंगल इन्फेकशन दूर करण्यासाठी केळ प्रथम खाज कमी करते त्याचबरोबर जंतुसंसर्ग वेगाने कमी करण्याचे काम केळ करते. त्वचेसंबंधी कोणताही आजार असेल, तर केळ लावल्यामुळे फायदा होतो. केळ सोलून फक्त अर्ध्या केळ्याचे तुकडे करून घ्या व त्याची हाताने किंवा चमच्याच्या मदतीने चिकट पेस्ट तयार करा. आयुर्वेदीक पद्धतीने मी हा उपाय तुम्हाला सांगणार आहे.

नैसर्गिक हा उपाय असल्यामुळे १०० टक्के परिणामकारक आहे. बाजारात मिळणार्याा क्रीमपेक्षा खूपच परिणाम करणारा आहे. साफसफाईकडे जरूर लक्ष द्या. स्नान केल्यानंतर संपूर्ण अंग कोरड्या टॉवेलने पुसा व पाणी जास्तीत जास्त प्या. कधीही दुसर्यागचा टॉवेल, साबण वापर करणे टाळा. विटामीन ई ऑइलची कॅप्सुल घ्यायची आहे, जी तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये सहज मिळू शकते.

एक कॅप्सुल घेऊन अर्ध्या केळात घाला. जर कॅप्सुल नाही मिळाली तर १ चमचा एलोवीरा जेल त्यामध्ये मिसळा. आपल्या शरीरावर पडणार्याज डागांपासुन सुटका मिळेल. त्वचारोगासाठी हा रामबाण उपाय आहे. तुम्हाला हे जिथे तुम्हाला फंगल इन्फेकशन आहे तिथे ही पेस्ट लावायची आहे. शेवटची वस्तु मिसळायची आहे ती म्हणजे हळद. हळद अॅंटी-सेप्टिक औषधाचे काम करते.

हळदीत अॅंटी-इन्फ्रामेटरी गुणधर्म असतात जे त्वचासंबंधी कोणतेही आजार यामुळे दूर होतात. मी हळद १/४ टी स्पून घातली आहे. जेवणात म्हणून आपण हळद वापरतो. फोड, खाज, खरूज दूर होते. फंगल इन्फेकशन जिथे आहे, ती जागा कोमट पाण्याने स्वछ करा, पुसून कोरडी करा व नंतर ही पेस्ट त्याच्यावर लावा. शक्यतो साबण वापरू नका.

बोटाने ही पेस्ट लावू नका तर त्यासाठी कापसाचा वापर करा. कोणत्याही शरीराच्या भागावर चर्मरोग असेल, तर तिथे हे लावा. थंड वाटेल, त्याचबरोबर जंतुसंसर्ग मूळापासून नाहीसा होईल. अर्धा तास लावून ठेवा तर हा आजार मूळापासून नष्ट होईल. डाग जर पडला असेल, तर तिथे एलोवीरा जेल लावा किंवा विटामीन ई ऑइल ची कॅप्सुल लावा. नारळ तेल लावून मालीश करू शकता. आमची ही माहिती जर तुम्हाला आवडली तर शेअर व लाइक जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *