जी पत्नी ही 5 कामे करते तिच्या पतीचं नशीब उजळतं, दुर्भाग्य सौभाग्यात बदलत…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रत्येक घरातील स्त्रीने किंव्हा पत्नीने आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, आपल्या पतीचे नशीब उजळण्यासाठी कोणती 5 कामे ही करायला हवीत. मित्रांनो पती पत्नी हे जे नात आहे संसाराच्या रथाची ही दोन चाके मानली जातात आणि आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी, त्याच भाग्य जर त्याला साथ देत नसेल, नशीब जर त्यांच्यावर रुष्ट असेल, नशीबाची साथ मिळत नसेल, तर ही पाच काम आपण नक्की करा.

त्यामुळे आपल्या पतीला त्याच्या कामामध्ये यश लाभेल, तसेच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थीर होईल. चला तर पाहुयात ही पाच कामे कोणती आहेत.? पहिलं जे महत्वाचं काम आहे की जे प्रत्येक स्त्रीने करायला हवे ते म्हणजे दररोज आपण तुळशीमातेची सेवा करायला हवी.

तुळस की जिला विष्णू प्रिया असे म्हणतात कारण भगवान श्री विष्णू जे या जगाचे पालन कर्ता आहेत त्यांना सर्वात प्रिय तुळशी माता आहे आणि म्हणून जर तुम्ही तुळशी मातेची सेवा करत असाल, पूजा करत असाल तर त्या मुळे भगवान श्री विष्णू आपल्या वरती प्रसन्न होतात. माता लक्ष्मी ची कृपा आपल्यावर बरसते आणि मग तुमच्या पतीचे नशीब नक्कीच तुमच्या पतीचे साथ देऊ लागत.

तुळशी मातेची सेवा करण म्हणजे काय? तर सकाळी लवकर उठून आपण देवपूजा करतच असाल, तर ही देवपूजा झाल्यानंतर आपण माता तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यांना एक तांब्यावर जल अर्पण करायचे आहे. मनोभावी हात झोडायचे आहेत. तसेच जे सूर्यास्त होईल त्या वेळी एक तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ लावायचा आहे. जर तुम्ही अस दररोज केलं तर तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थीर होईल.

मित्रांनो दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे प्रत्येक शनिवारी आपण खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये साखर घालायची आहे आणि ही वाटी पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे. प्रत्येक शनिवारी सायंकाळी ही वाटी आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे. यामुळे तुमच्यावरती जे ही संकट असेल ते तर दूर होईलच मात्र तुमचे वैवाहिक जीवन आहे ते सफल बनत. पती आणि पत्नी मध्ये जर वारंवार भांडणे होत असतील, वारंवार वाद होत असतील, तर हा उपाय आपण नक्की करा. वैवाहिक जीवन सुखी करणारा अशा प्रकारचा हा उपाय आहे.

तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे प्रत्येक शनिवारी आपण मोहरीच्या तेलामध्ये गोड भजी तळायची आहेत. आपण जी तिखट भजी बनवतो तर तिखट न बनवता साखर घालून किंव्हा गूळ घालून आपण गोड भजी मोहरीच्या तेलात तळायची आहेत आणि अशी ही भजी आपण एखाद्या गरिबाला एखाद्या गरजू ला दान म्हणून द्यायची आहेत किंव्हा भिक्षा म्हणून ती वाढायची आहेत. शनिवारी आपण हा उपाय करायचा आहे. त्यामुळे शनी ग्रहाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्या समस्यांपासून आपली सुटका होते. बऱ्याच वेळी अस होत की तुमचा पती खूप मेहनत करतोय, कष्ट करतोय मात्र त्याला पाहीजे अस फळ मिळत नाही. तर या मध्ये राहू, शनी यांचा अडथळा असू शकतो. तर या उपाय तुम्ही नक्की करा तुमचा शनी दूर होईल.

चौथा जो उपाय आहे तो म्हणजे तुमच्या जवळ पास किंव्हा तुमच्या दारामध्ये जर जर एखादा किन्नर आला तर ज्या ज्या वेळी किन्नर तुम्हाला दिसेल तिला काही ना काही तरी दान नक्की करा. अशा प्रकारे दान केल्याने किन्नरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आशीर्वाद अत्यंत लाभदायक असतात. त्यांची शक्ती इतकी मोठी असते की त्या आशीर्वादाच्या बळाने तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठी संकटे दूर होऊ शकतात. माता लक्ष्मी ची कृपा तुमच्यावरती होऊ शकते.

पाचवा उपाय म्हणजे तुम्ही माता पार्वतीची पूजा नक्की करा. या पूजेमध्ये माता पार्वतीस सिंदूर लावण्यास विसरू नका. अस केल्यास माता पार्वतीची असीम कृपा तुमच्यावरती बरसते. ज्या स्त्रिया माता पार्वतीची पूजा करतात त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे व्यथीत होत. तुमचा पती जर तुमचे म्हणणे ऐकत नसेल, तुमच्या मध्ये जर वादविवाद होत असतील तर हा उपाय नक्की करा.

मित्रांनो हे पाच उपाय तुम्ही नक्की करा तुमचा व तुमच्या पतीचे नशीब नक्की बदलून जाईल… टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *