जिवंत असेपर्यंत दातांमधील वेदना, कंबरदुखी, अंगदुखी, केस गळणे, खाज, खरूज, नायटा एका झटक्यात समाप्त होईल…

मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा औषधी झाडाबद्दल माहिती देणार आहे कदाचित तुम्हाला याबद्दल एवढी चांगली माहिती नसेल. तर इथे मी तुम्हाला आज सांगणार आहे एरंडीच्या झाडाच्या बद्दल. हो मित्रांनो, हे जागोजागी उगवलेले असते व पावसाळ्याच्या दिवसात तर हे खूप लवकर उगवते.

तसे तर आपला देश वनौषधींचा देश आहे., जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनौषधी आढळतात. ह्या वनौषधींचा उपयोग हजारो वर्षांपासून केला जातो आहे. हे झाड आहे एरंडीचे. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेन्ट करून मला नक्की सांगा. काही ठिकाणी तर एरंडीची शेती केली जाते. हे जे झाड आहे, ते औषधी आहे. याला फुले येतात व नंतर बिया येतात.

एरंडीच्या बियांपासूनच एरंडीचे तेल काढले जाते. ज्याला आपण “कैस्टर ऑइल” म्हणतो. कैस्टर झाड तुम्ही बघू शकता याप्रमाणे असते. मी इथे एक पान तोडले आहे. याचा कितीतरी औषधांमध्ये उपयोग केला जातो. आयुर्वेदात याचे खूप महत्व आहे. समजा तुम्हाला खरूज, नायटा याप्रकरचा कोणताही आजार असेल तर त्यावर हे तेल उपयोगी आहे. तुम्हाला यापासून लगेच आराम मिळेल, इतके हे फायदेशीर आहे.

मी हे झाड कुंडीत लावून ठेवले आहे. याची जे पाने आहेत ती जर तुम्हाला गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल तर ह्या पानाने शेक घेतला तर ह्या सगळ्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. सूज पण ठीक होईल. याच्या तेलाची मालीश केली तर सांधेदुखी, गुडघेदुखी तसेच कंबरदुखी यापासून आराम मिळेल. तुम्हाला पाने कशी लावायची आहेत ते दाखवते.

ही नुसती लावायची नाहीत तर गावामध्ये ही पानांना तेल लावून हलकी गरम करून जिथे वेदना होते आहे तिथे ही पाने लावतात. त्यामुळे आराम वाटतो. कोणतेही तेल लावू शकता. एरंडेल तेल हे थोड्या गडद रंगाचे असते. एरंडेल तेल दोन रंगाची येतात एक खूप हलक्या रंगाचे व एक गडद रंगाचे.

गडद रंगाच्या तेलाला ब्लॅक कैस्टर ऑइल म्हणतात व हलक्या रंगाच्या “कैस्टर ऑइल पेक्षा १० पट फायदेशीर असते. हे ऑइल आपल्या केसांसाठी पण खूप उपयोगी आहे. ज्यांना मासिक पाळीच्या वेळी पोट दुखण्याचा त्रास आहे त्यांनी हे पान तेल लावून हलके गरम करून पोटावर ठेवावे. मुलांचे पोट दुखत असेल तरी आराम पडतो.

पानाच्या चारी बाजूला पानावर तेल घाला व तव्यावर हे पान हलके गरम करा व जिथे दुखते आहे तिथे हे पान लावा दोर्यामने पान गुंडाळून ठेवा. लवकर आराम पडतो. गहू अधिक काळ टिकण्यासाठी पण एरंडेल तेल गव्हाला लावून ठेवत असत. असाही कैस्टर ऑइलचा उपयोग आहे. ज्यांना बद्धकोष्टता ही समस्या आहे त्यांनी एक ग्लास कोमट पाण्यात कैस्टर ऑइल घालून घेतल्यास ही समस्या दूर होते. हे पोटात घेतले तर फायदाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *