जिरे धने पाणी असे प्या, किडनी स्वच्छ ते थायरॉईड, 11 आजार जीवनभर होणार नाहीत…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आजचा उपाय खास असून सर्वाना करता येण्यासारखा आहे. यामध्ये लागणारे साहित्य घरच्या घरी उपलब्ध होणार आहे. किडनी हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव असून या किडनीचे काम आहे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे. त्याचप्रमाणे शरीरात पाण्याचे नियंत्रण करणे म्हणजे पाणी कमी किंवा जास्त ठेवणे.

जर आपली किडनी खराब झाली तर आपलं मरण निश्चित आहे असं समजून घ्यायला हरकत नाही. कारण किडनी ही आपल्या शरीरातील जे खराब किंवा विषारी घटक बाहेर काढते, ते साचून राहतील व नसा ब्लॉक होतील आणि परिणामी मरण येईल. म्हणून किडनी स्वच्छ राहणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा या किडनी खराब न होता स्वच्छ ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे थायरॉईड कंट्रोल मध्ये आणण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे.

यासाठी प्रथम दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे. तुम्ही जास्तही पाणी घेऊ शकता. यासाठी लागणारा पहिला पदार्थ प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध असतो ते म्हणजे धने. याला हिंदीत धनिया म्हणतात. धन्यामध्ये अस्कॉरबीक ऍसिड असते. धन्यामध्ये भरपूर घटक आहेत जे लिव्हरचे रोग दूर करतात, आतांड्यामधील अल्सर कमी करतात आणि कमी पडलेले रक्त वाढवतात. म्हणून धने आरोग्यासाठी उपयुक्त घटक आहे.

या मिश्रणात दुसरा घटक टाकायचा आहे जिरे. जिऱ्याला क्युमीन सिड्स असे म्हणतात. जिऱ्यात व्हिटॅमिन E मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे जिऱ्यामध्ये असे काही घटक आहेत जे पचनशक्ती वाढवतात, सर्दी कमी करतात, प्रतिकार क्षमता वाढवतात आणि आपलं पोट साफ ठेवतात. तसे अनेक रोगांसाठी जिरे वापरले जातात. हे देखील एक चमचा या मिश्रणात टाकायचे आहे.

आता या मिश्रणात शेवटचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे अर्धा चमचा ओवा. ओवा पोटात गॅस होऊ देत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीस गॅस झाला असेल तर झटपट कमी करतो. अपचन कमी करतो. शरीरातील चरबी देखील कमी करण्यासाठी ओवा उपयोगी आहे. हे मिश्रण तयार झाले आहे. हे मिश्रण साधारणतः एक चतुर्थांश म्हणजे या मिश्रणाचा चौथा भाग राहीपर्यंत उकळू द्यायचे आहे.

ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी एक महिना या मिश्रणाचे तीन भाग करायचे म्हणजे हे पाणी शिल्लक राहिले किंवा जो काढा शिल्लक राहिला आहे त्याचे तीन भाग करून सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्यायचे आहेत. ज्यांना मुळव्याध, उष्णता यांचा त्रास आहे यांनी या मिश्रणामध्ये एक चमचा खडीसाखर टाकून रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे.

ज्यांना थकवा येतो, नेहमी अशक्तपणा येतो त्यांनी हे मिश्रण काही न टाकता संध्याकाळी झोपण्यापूर्वी घ्यायचे आहे. हे मिश्रण साधारणतः एक महिना सलग घ्यायचे आहे तेव्हा तुम्हाला परिणाम जाणवतील आणि आपल्या या समस्या दूर होतील. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल . अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi Asmita हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *