जास्त मेहनत न घेता जळलेल्या तव्याला एकदम नवीन दिसेल असा चमकवा…

जास्त मेहनत न घेता जळलेल्या तव्याला एकदम नवीन दिसेल असा चमकवा- जाणून घ्या उपाय, मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे लोखंडाच्या तव्याची सफाई तुम्ही काहीच मिनिटात कशी करू शकता. पराठे, भाजी करताना, भाजताना,  आपला तवा थोडा जळतो. तर हा साफ करण्यासाठी खूपच सामान्य असा उपाय आहे. आपल्याला फक्त लिंबू पाहिजे आहे. आपल्याला त्यासाठी २ लिंबांची जरूर पडेल. जर लिंबू मोठे असेल, तर एका लिंबाने तुम्ही तवा स्वछ करू शकता. लहान लिंबू असेल तर मात्र तुम्हाला २ लिंबे जरूर लागतील.

यासाठी आपल्याला तव्याला हलके गरम करायचे आहे. गरम तव्यावरच आपण हे काम करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला लागेल अर्धा छोटा चमचा मीठ. म्हणजेच घरातील वस्तूने आपण तवा साफ करू शकतो. हा तवा तुम्ही बघू शकता, खूपच जळलेला आणि खराब दिसतो आहे.

आता आपण हलके हलके लिंबू त्याच्यावर चोळूया फोकच्या मदतीने. मी त्यावर थोडे लिंबू पिळून त्याचा रस टाकणार आहे. जिथे मला काळे डाग दिसत आहेत, तिथे मी फोकच्या मदतीने जरा जास्त घासत आहे. गॅस बंद आहे, परंतु तवा गरम आहे. परत परत थोडे मीठ घालून तवा घासायचा आहे.

याच प्रकारे तुम्ही लोखंडाची कढई पण साफ करू शकता. तसेच लोखंडाचे कोणतेही भांडे तुम्ही या प्रकारे स्वछ करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता, की २ लिंबाने माझा तवा खूपच चांगला दिसत आहे. परत परत मीठ घालत राहा. झालेला भाग सुटून येत आहे व तवा स्वछ होतो आहे. नंतर आपण तो भांड्यांच्या साबणाने धुणार आहोत.

म्हणजे आपला तवा एकदम साफ व चमकदार दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही मधून मधून तवा साफ करत राहा. साधारण पराठा किंवा मक्याची चपाती केली, की तवा तूप किंवा तेल सोडल्यामुळे जळतो. अजून कोपर्या त थोडे मोठे डाग दिसत आहेत, त्यावर लिंबू घासले, की आपला तवा एकदम चमकदार होणार आहे.

तर बघितलत मित्रांनो, लोखंडाचा तवा घरगुती उपायांनी किती सहज स्वछ व चमकदार होऊ शकतो. लोखंडाच्या भांड्यात जेवण बनवणे खूपच फायदेशीर असते, कारण त्यामध्ये आयर्नची मात्रा जास्त प्रमाणात असते. म्हणून, लोखंडाची कढई जरूर वापरा.

आता मी त्याला साबण लावून धुतला आहे. आता बघा माझा तवा किती चमकदार दिसतो आहे. मला फक्त ५ मिनिटे लागली आहेत. कॉटनच्या कपड्याने तवा जरूर पुसून ठेवा. मित्रांनो, माहिती आवडली तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्ही उपाय करू शकता…. https://youtu.be/RiUvsBWIk4g

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *