जाणून घ्या किती मालमत्तेचे मालक आहेत, ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा…

भारतीय एथलीट नीरज चोप्रा एक ट्रॅक व फील्ड एथलीट आहेत ज्यांनी “भाला फेक” या खेळामध्ये खूपच प्राविण्य मिळविले आहे. एशियाई खेळांमध्ये नीरजला २०१८ साली भारताच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी हातात तिरंगा घेऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले होते. खरे तर त्याच्याकडे ऑलिंपिकचा अनुभव नाही. पण त्याला त्याची कामगिरी खुणावत होती व तो अतिशय आत्मविश्वासाने खेळला देखील.

ऑलिंपिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव ब्रिन्द्रानंतर नीरज हा दूसरा भारतीय आहे. नीरजने ८८.०७ मिटर लांब भाला फेकून हा आपला रेकॉर्ड बनविला आहे व भाला फेकण्यामध्ये राष्ट्रीय रेकॉर्ड हा नीरजच्या नावावर आहे. नीरजची प्रतिक्रिया होती “ हे सारे अविश्वसनिय आहे” माझ्यासाठी तसेच माझ्या देश बांधवांसाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे”.

मी कामगिरी चांगली केली होती पण सुवर्णपदक लाभेल असे वाटले नव्हते. “ मला खूप आनंद झाला आहे” असे त्याने सांगितले. नीरजने गेल्या काही वर्षामध्ये आपल्या खेळात खूपच सुधारणा दाखविली आहे व टोकियो येथील ऑलिंपिक २०२० मध्ये भारताला पदक मिळवून दिले.

भारताने गेल्या वेळी १९०० मध्ये एथलीटमध्ये पदक जिंकले होते. पण या वेळी नीरज टोकियो मध्ये १२१ वर्षाचे अंतर (म्हणजेच दुष्काळ) भरून काढला.

नीरज चोप्राचे निव्वळ मूल्य: नीरजची अंदाजे एकूण संपत्ति $ १- $ ३ मिलियन आहे. हे स्पष्ट आहे, की भालाफेक करणारी त्यांची यशस्वी कारकीर्द हे त्यांच्या उत्पन्नाचे मोठे स्त्रोत आहे. त्याशिवाय, त्यांना जे.एस. डब्लु (JSW) स्पोर्ट्स अँड अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) हयाच्याकडून पूर्ण पाठिंबा मिळतो, ज्यांनी त्यांच्या ऊज्वल भविष्यासाठी खूप मदत केली आहे.

३१ मार्च, २०२० मध्ये त्यांनी कोविड १९ महामारीसाठी PM केअर फंड मध्ये २ लाख रुपये दान दिले होते. नीरज चोप्राची कामगिरी: नीरज केवळ उच्च स्तरावरील राष्ट्रमंडळ आणि आशियाई चॅम्पियन आहे, तर त्याने कनिष्ठ वर्तुळात पण खूप मोठे नाव कमावले आहे.

नीरज २०१६ चा विश्व U२० चॅम्पियन होता आणि त्यांनी ८६.४८ मिटरचा २० वर्षाखालील विश्व रेकॉर्ड केला होता, जो अजूनही टिकून आहे. त्याशिवाय, नीरज २० वर्षाखालील श्रेणीमध्ये ट्रॅक आणि फील्ड मध्ये जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय एथलीट आहे.

नीरजचा परिवार: नीरज चोप्रा हा क्षत्रीय परिवारातील आहे आणि हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात खंडरा हे त्याचे गाव आहे. त्याचे शिक्षण डी.व्ही. कॉलेज, चंदीगड येथे झाले आहे. २०१६ मध्ये नायब सुभेदार या पदाबरोबर भारतीय सेनेमध्ये कनिष्ठ कमिशन अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *