चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, तीळ आणि चामखीळ, काढून टाकून चेहरा उजळविण्याचा प्रभावी मार्ग…

चेहर्याजवर जर सुरकुत्या, मुरूमे, काळे तीळ, काळे डाग आहेत व सगळे करून तुम्ही बघितले, पण तरी हे तुमच्या चेहर्यारवर कायम आहे तर आज मी तुमच्यासाठी खूपच चांगला असा आयुर्वेदिक उपाय घेऊन आले आहे, जो १०० टक्के परिणामकारक आहे.

सगळ्यात पहिले तुम्हाला यासाठी घ्यायचे आहे जायफळ. जायफळ ज्याला इंग्लिशमध्ये पण “नटमेग” म्हणतो. आपल्या चेहर्याढसाठी जायफळ खूपच फायदेशीर आहे जे आपल्या चेहर्याशवरील डाग, काळेपणा काढून टाकते. जायफळ हे गुणांचे भांडार आहे. बर्याेच औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो.

जायफळाचे तेल बनविले जाते,जायफळ फेस पॅक म्हणून उपयोगी आहे, सौदर्याशिवाय जायफळचा उपयोग खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. खाण्याचा स्वाद वाढविण्याबरोबरच आपल्या कितीतरी शारीरिक आजारांना जायफळ दूर करते. जायफळची पाऊडर मार्केटमध्ये मिळते. पण काही वेळेस त्यात भेसळ असू शकते. म्हणून घरीच जायफळची पाऊडर मी बनविते.

खूपच स्वस्त असते साधारण ५ ते ६ रुपयाला एक जायफळ मिळते. तुम्हाला फक्त १/४ जायफळ वापरायचे आहे. ते छोट्या किसणीवर किसून घ्या. आपल्या चेहर्याळवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी जायफळचा फेस पॅक खूपच उपयोगी आहे. १००% हा उपाय तुमचा चेहरा उजळून टाकेल. पाऊडर नको असेल तर ते तुम्ही कुटून घेऊ शकता.

जायफळ मऊ आल्यामुळे ते कुटून त्याची पाऊडर आपण घरी तयार करू शकतो. ताजी पाऊडर बनवून घ्या. १/४ टी स्पून जायफळ पाऊडर घ्यायची आहे. जायफळ पाऊडर जर रात्री गरम दुधात घालून प्यायली तर सर्दी, खोकला, अंगदुखी यापासून आराम मिळतो. सौंदर्यासाठी तर हे उपयोगी आहेच. तुमच्या चेहर्यालवर इतकी चांगली चमक येईल, जुन्या सुरकुत्या निघून जातील.

काळ्या तिळाचा जास्त त्रास असेल, तर ते पण निघून जातील. जर तुमची त्वचा कोरडी व रुक्ष असेल, तर तुम्हाला इथे दही घ्यायचे आहे. दही आपल्या चेहर्यािवरील डाग घालविते. आता त्यात तुम्हाला जायफळ पाऊडर घालायची आहे. १ टेबलस्पून दही घ्यायचे आहे त्यात १/४ टीस्पून जायफळ पाऊडर घाला. त्यात १/२ छोटा चमचा मध घालायचा आहे.

मधामुळे आपली त्वचा घट्ट होते. त्याचबरोबर चेहर्यायवर सुरकुत्या पडत नाहीत. या तिन्ही वस्तु व्यवस्थित एकत्र मिसळून घ्या. काही दिवस हा वापरुन बघा. आठवडाभर हा लावला तर नक्की फायदा होईल. आम्ही हे वर्षानुवर्षे हे वापरत आहोत. तुम्ही हा पॅक पूर्ण चेहर्यालवर लावू शकता किंवा जिथे तुम्हाला मुरूमे आहेत, काळे डाग आहेत तिथे तुम्ही लावू शकता.

ज्यांची त्वचा ओईली आहे, त्यांनी एलोवीरा घेऊन त्यात जायफळ पाऊडर मिसळून लावू शकता. जास्त ओईली त्वचा असेल तर विटामीन ई कॅप्सुल घालू नका. जर नसेल तर कॅप्सुल घालू शकता. डोळ्याभोवती काळी वर्तुळे असतील तर हे लावू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *