चेहरा इतका गोरा होईल चार लोकांत उठून दिसाल….

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सर्वानाच वाटत असते की आपण सुंदर असावं, परंतु वयानुसार किंव्हा निसर्गाच्या बदलानुसार आपल्यात देखील परिणाम होत असतो. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, पिंपल्स येणे, किंव्हा कोणत्याही प्रकारचे डाग येणे या समस्या निर्माण होत जातात. हे डाग, पिंपल्स, सुरकुत्या घालवण्यासाठी आपण सर्रास केमिकल युक्त क्रिम चा वापर करत असतो.

परंतु केमिकल मुळे तर साईड इफेक्ट तर होतातच त्याचबरोबर आपला खर्च देखील जास्त होत असतो. म्हणूनच या सर्व समस्यांवर आम्ही आपल्याला एक घरगुती उपाय सांगणार आहे. या उपयामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुंदरता टिकून राहील व चेहरा सतेज, तेजस्वी, व चमकदार दिसण्यास खूप खूप मदत होईल. चला तर पाहुयात हा उपाय..

मित्रांनो या साठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो, लिंबू, हळद पावडर, आणि साखर…  मित्रांनो सर्व प्रथम टोमॅटो मधून कापून घ्यावा. म्हणजे टोमॅटो चे दोन भाग करावेत. एका भागाला हळद पावडर लावावी. थोडी जास्त हळद लावावी. आता ह्या हळद लावलेल्या टोमॅटोने चेहऱ्यावर मसाज करा. या मसाज मुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वच्या सुंदर, सतेज, होण्यास खूप खूप मदत होईल.

टोमॅटो ने चेहऱ्यावर मसाज करत असताना टोमॅटो मधून मधून दाबत चला. टोमॅटो ला दाबल्यामुळे त्यातील रस बाहेर येईल व हळदी व टोमॅटो च्या रस ने आपल्या चेहऱ्याची मसाज होण्यास मदत होईल. ही मसाज तुम्हाला पाच मिनिटे करायची आहे. पाच मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवायचा आहे. मित्रांनो हळदी मध्ये अँटी बॅक्टरीयल प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढण्यास खूप खूप मदत होते.

आता तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. ती म्हणजे तुम्हाला आता स्क्रब करायचा आहे. तो कसा करायचा ते आपण आता पाहुयात. या साठी तुम्हाला टोमॅटो चा दुसरा भाग घ्यायचा आहे. त्या टोमॅटो वर तुम्हाला साखर टाकायची आहे. किंव्हा तो टोमॅटो तुम्हाला साखरेमध्ये डीप करून घायचं आहे. आणि त्या वर तुम्हाला अर्धा लिंबू रस पिळायचा आहे. लिंबू चा रस पिळून झाल्यानंतर आता तुम्हाला चेहऱ्यावर स्क्रब करायचा आहे.

या टोमॅटो ने चेहऱ्यावर गोलाकार प्रमाणे मसाज करत चला. या प्रमाणे तुम्हाला पाच मिनिटे मसाज करायचे आहे. पाच मिनिटे मसाज केल्यानंतर तुम्हाला चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो लिंबू व साखरेच्या स्क्रब ने तुमच्या चेहऱ्यावरील पूर्ण डेड स्कीन निघून जाण्यास खूप मदत होईल. मित्रांनो हा उपाय केला तर तुमचा चेहरा उजळून जाईल. नक्की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक पडलेला जाणवेल. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा…

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *