चाणक्य नीती घरात दररोज ही कामे जरूर केली पाहिजेत…

चाणक्यनीती हे चाणक्यद्वारा रचित एक निती ग्रंथ आहे, ज्यामध्ये जीवन सुखमय आणि सफल बनवण्यासाठी उपयोगी सूचना दिलेल्या आहेत. ज्या ग्रंथाचा मुख्य विषय मानव समाजाला जिवनातील प्रत्येक पैलुंचे व्यवहारिक शिक्षण देणे हा आहे. चाणक्य एक महान ज्ञानी होते, ज्यांनी आपल्या नितीमूल्यानुसार राजा चंद्रगुप्त मौर्य याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया, चाणक्य नितीनबद्दलची काही मूल्ये जी तुम्हाला जीवनात कोणत्याही वेळी उपयोगी पडतील

चाणक्य नीतिनुसार महिलांनी ही कामे जरूर केली पाहिजेत, कोणती आहेत ती कामे: महिला घरातील सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत असतात. त्या आपल्या स्वभावाने व वास्तुशास्त्रानुसार घरात समृद्धि, शांतता आणू शकतात. वास्तुप्रमाणे महिलांनी काय केले पाहिजे.

घराची स्वछता: घराची स्वछता करणे ज्यामुळे घरात धूळं, किटाणू येत नाही. त्यामुळे घरात माता लक्ष्मी येते. घरात सुख-समृद्धि राहते. मुख्य दरवाजा: मुख्य दरवाजाची रोज सफाई करणे. आठवड्यातून एकदा गंगाजल आणि दूध ह्याने घरचा उंबरठा स्वछ करणे. त्यामुळे नकारात्मक शक्ति घरात प्रवेश करत नाहीत.

घराची सफाई: सफाई झाल्यानंतर आंघोळ किंवा स्नान करणे अत्यंत जरूरी आहे. महिला नेहमी सफाईच्या आधी स्नान करणे पसंत करतात. पण त्यांनी स्वछतेनंतर स्नान केले पाहिजे. त्यामुळे तन आणि मन दोन्ही स्वछ होते आणि आळस येत नाही व मन उत्साही राहाते. नवीन काम करण्याची ऊर्जा मिळते.

जेवणाच्या आधी स्नान: जेवण बनवण्याच्या आधी स्नान करावे. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार, हे खूप आवश्यक आहे, की जेवण स्नान केल्यावर तयार करणे, त्यामुळे तन आणि मन दोन्ही स्वच्छ होते. त्यामुळे जेवण पौष्टिक व सकारात्मक उर्जेने तयार होते. केस विंचरणे: महिलांनी सूर्यास्तानंतर कधीही केस विंचरू नयेत. त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते. झोपताना केस नेहमी बांधून झोपावे. मोकळे केस आपल्या परिवारासाठी चांगले नाहीत.

तुळशीची पुजा: जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल, तर त्याची सकाळ आणि संध्याकाळ पुजा केली पाहिजे. त्याच्यासमोर दीपक प्रज्वलित केला पाहिजे, असे केल्यामुळे घरात पैशाची कमतरता कधीच पडणार नाही. घरात सुख समृद्धि व शांतता येते. देवाला नैवेद्य: जेवणाच्या आधी देवाला नैवेद्य दाखवणे. मित्रांनो, नेहमी महिलांनी जेवणाच्या आधी नैवैद्य दाखवला पाहिजे. म्हणजेच, सगळे देव देवता प्रसन्न राहतात. घरात खुशी

राग राग करणे: घरात विनाकारण चिडचिड करणे चांगले नाही. घरात प्रत्येक व्यक्तीने शांत राहिले पाहिजे. घरात नकारात्मक ऊर्जा येते. महिला या घरची लक्ष्मी असतात. महिलांनी शांत राहाणे जरूरी आहे, त्यामुळे घरात सुख शांति राहते व सकारात्मक ऊर्जा कायम राहाते.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *